फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्तवर मराठीत निबंध Fatakya Pustakache Atmavrutta Essay

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्तवर मराठीत निबंध Fatakya Pustakache Atmavrutta Essay

Fatakya Pustakache Atmavrutta Essay

बरेच दिवस झाले.मला माझे मन मोकळे करायचे होते.मला माझ्या मनातील दुःख व्यक्त करण्याची संधी पाहिजे होती. ती मला एका पुस्तकप्रेमी व्यक्तीने आज मिळवून दिली.

काय झाले, एक पुस्तकप्रेमी व्यक्ती एका जुन्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये आली. मला त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेलं होतं. माझे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ फाटलेले होते. मधली काही पानेसुद्धा फाटून गेलेली होती. पाण्याने भिजल्यामुळे काही भागाला वेगळाच रंग तयार झाला होता.माझी अवस्था दयनीय झाली होती. या दयनीय अवस्थेला सावरणे माझे मला शक्य नव्हते.

दुकानात आलेल्या त्या व्यक्तीने मला पाहिले.अनेक पुस्तके चाळता चाळता मी त्याच्या हाती लागलो होतो.त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जुने आणि फाटके असले तरी त्याला पाहिजे तेच पुस्तक मिळाले होते. त्याने दुकानदाराकडून मला विकत घेतले आणि घरी घेऊन गेला.

घरी जाताच त्याने माझ्याकडे पाहिले. माझी दुर्दशा त्याच्या लक्षात आली. त्याने डिंक,कागद, कात्री घेतली. माझी फाटलेली पाने व्यवस्थित चिकटवली. बाहेरच्या बाजूने मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाचे ठिकाणी जरा जाड कागदाचे वेष्टन घातले. मला खूप बरे वाटले आणि माझे मन मोकळे करण्यासाठी मी त्या पुस्तक प्रेमी व्यक्तीबरोबर बोलू लागलो.

तुम्ही म्हणाल एक पुस्तक ते काय निर्जीव असते. ते कसे बोलणार? असं काही नाही बरं का. आम्ही पुस्तकेही बोलू शकतो. पण आमचा आवाज ऐकण्यासाठी तुमच्याकडे वेळ असला पाहिजे आणि तुम्हाला आमचे दुःख कळले तर तुम्ही निश्चित कान देऊन आमचा आवाज ऐकाल.

मी म्हणालो, ‘बरे झाले तुम्ही मला भेटला. तुमच्यासारखा फक्त प्रेमी माणूस भेटला की आनंद होतो समाधान वाटते.अहो माझी निर्मिती झाली तेव्हा माझ्या लेखकाला किती आनंद झाला म्हणून सांगू? त्याने वेळात वेळ काढून, खूप चिंतन, मनन करून, विद्येचा व्यासंग करून लिहिले होते. आता त्याला एका प्रकाशकाची गरज होती. प्रकाशक मंडळी व प्रकाशक त्याला ना ना करीत होती. नाना कारणे सांगून बोळवीत होती.

शेवटी एक भला माणूस म्हणजेच प्रकाशक भेटला. त्याने त्या लेखकाचा आदरपूर्वक मान ठेवण्यासाठी ते पुस्तक वाचून काढले.अर्थात ते हस्तलिखित होते.अहो ते वाचून झाल्यावर त्या लेखक महोदयांना म्हटले की खूपच सुंदर पुस्तक लिहिले आहे.ते म्हणाले,” मला तुमचे लेखन खूप आवडले. आता आपण हे पुस्तक प्रकाशित करूया.”

तो प्रकाशक एक बुद्धिमान माणूस होता. त्याने एका चित्रकारांकडून माझ्या मुखपृष्ठासाठी मलपृष्ठासाठी सुंदरशी चित्रे काढून घेतली. आतमध्ये सुद्धा काही रेखाचित्रे त्याने काढून घेतली. छापखाणन्यातील लोकांना कामाला लावून पुस्तकाची छान छपाई तयार करून घेतली. माझे ते सुंदर रूप त्या प्रकाशाने प्रकाशकाने पाहिले. त्याला खूप आनंद झाला. त्याने ताबडतोब लेखक महोदयांना बोलावून घेतले आणि त्यांच्या हाती मला ठेवले.

आता त्या लेखकाला इतका आनंद झाला की त्याने त्या प्रकाशन संस्थेमध्ये पेढे वाटले. आनंद साजरा केला. एका सन्माननीय व्यक्तीच्या हस्ते माझे प्रकाशन झाले.गावोगावीच्या पुस्तकालयांमध्ये माझी रवानगी झाली. पुस्तकांच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी मला ठेवले गेले.

त्यापैकीच एका पुस्तकातील दुकानात मी होतो. मला एका गरजू विद्यार्थ्याने विकत घेतले. त्याला पुस्तकाची खूप गरज होती.त्याने ते पुस्तक अभ्यासले. अभ्यासून झाल्यानंतर मला त्याने त्याच्या एका मित्राकडे सोपवले. त्याला पुस्तकांची आवश्यकता होती.

पण आता हा विद्यार्थी एक आळशी विद्यार्थी होता. हे माझ्या लक्षात आहे.माझी तो हेळसांड करू लागला.मी कुठेही पडलेला असे.पाने दुमडलेली असत. मला आता दुःख होऊ लागले. एक दिवस तिथे एक लहान मुल आले आणि माझ्याशी खेळू लागले.त्या लहान मुलाला पुस्तक म्हणजे खेळण्याची वस्तूच वाटू लागली.

त्याने हवे तसे माझे मुखपृष्ठ मलपृष्ठ फाडून काढले. आतमध्ये असलेली माझ्या आवडीची सुंदर रेखाचित्रे फाडली. अनेक पानेसुद्धा फाडली. पाण्याचा एक तांब्या त्या ठिकाणी होता. तो त्याने सांडून दिला. त्यातून मी भिजलो गेलो. माझ्याशी सुरू असलेला त्याचा हा खेळ जीवघेणा होता. परंतु त्या अज्ञान मुलाला हे काय समजणार?

इतक्यात तो मुलगा त्या ठिकाणी आला. त्याने माझी दुर्दशा पाहिली आणि मला एका बाजूला ठेवून दिले. त्याने त्याच्या मित्राला सांगितले की माझ्याकडून तुझे पुस्तक हरवली आहे. माझी रवानगी त्याने सरळ रद्दी बरोबर एका रद्दी वाल्याकडे केली.

रद्दीवाला रद्दीतील जुनी पुस्तके बाजूला काढून ठेवत असे. ठराविक किंमतीला तो आलेल्या ग्राहकांना विकत असे.बरे झाले तुम्ही भेटलात. मला तुम्ही विकत घेतले. माझे दुःख जाणले. दुरुस्ती केली. आता मी तुमच्या उपयोगाला येईल.

पुस्तके आपल्याला किती ज्ञान देतात. कोणी तर म्हटले की ग्रंथ हेच गुरु असतात. आम्ही तुमच्या गुरूसारखे आहोत. तुमच्या मित्रांसारखे सुद्धा आहोत. तुमची अखंड ज्ञानरूपी सेवा करण्यात आम्हाला खूप आनंद भेटतो.

वाचाल तर वाचाल असे ज्याने म्हटले, त्याने तर आमच्यावर अनंत उपकार करून ठेवले आहेत. त्याच्या सुविचाराने आम्हा पुस्तक बांधवांना चांगले दिवस आले आणि पुस्तकप्रेमी, वाचकप्रेमी मंडळींना सुद्धा आपले जीवन ज्ञानाने संपन्न करता आले.

आम्ही किती उपयोगी आहोत, आमची उपयुक्तता ज्ञानी माणसे जाणतात. विद्वान माणसे या पुस्तकांची व्यासंगीपणे निवड करतात.संग्रही ठेवत असतात. पुन्हा पुन्हा वाचन करत असतात.

मला आज असे म्हणावे वाटते की, वाचाल तर वाचाल हे बरोबरच आहे. पण पुस्तके वाचवाल तर अधिकाधिक वाचाल असे मला वाटते. कारण पुस्तक निर्माण होणे हे खूप अवघड असते. कागद बनण्यासाठी झाडांचा उपयोग केला जातो. अनेक कामगारांचे श्रम त्यासाठी लागलेले असतात. लेखकाचे बुद्धी आणि प्रकाशकाचे परिश्रम, छापखाणन्यातील कामगारांची कलाकुसर पुस्तक निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावते. त्यामुळे एखादे पुस्तक फाटू लागले की आमचा जीव तुटतो.
दुःख होत.

कृतज्ञपणा खूप चांगला असतो. कृतज्ञता हे एक जीवनमूल्य आहे. पण कृतघ्न व्यक्तींना पुस्तकांचे दुःखे कळणार नाहीत. त्यांना आमचे दुःखे कळाली पाहिजेत असे राहून राहून वाटते.

पण तुम्ही मला भेटला.माझी काळजी घेतली. मला खूप आनंद झाला मला.आता असे वाटते की मला एक सोबती भेटला. तुम्हालाही नक्कीच खरा मित्र भेटल्याचा आनंद झाला असेल. तर ते बरोबरच आहे. आम्ही पुस्तके वाचकाला कधीही दुःख देत नाही.

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या वाचकाची आम्ही साथ देत असतो आणि त्याचे साथीदार होत असतो. त्याच्या ज्ञानामध्ये कणाकणाने क्षणाक्षणाला भर टाकीत असतो. त्याचे जीवन ज्ञानसंपन्न करीत असतो तुमचे खूप खूप धन्यवाद.

असे बोलताच तो पुस्तकप्रेमी मनुष्य अधिकच भावुक झाला. त्यालाही गहिवरून आले. त्याने माझ्या मुखपृष्ठावर हात फिरवला. जणू काही तो माझ्या दुःखाने दुःखी होता. मी कृतार्थ झालो. धन्य झालो.

तेव्हा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या पुस्तकांना जिवंत प्राण्याप्रमाणे दुःखी असतात. भावना असतात.त्या मोजण्यासाठी तुमच्याकडे भावना असल्या की झाले. आमची तुम्ही नक्कीच काळजी घ्याल. आम्हाला एका मित्रासारखे वागवाल.

त्या ग्रंथप्रेमी माणसाने मला उचलून त्याच्याकडच्या कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून दिले. त्या ठिकाणी माझे काही भाऊ अगदी आनंदात बसलेले होते. सगळे मात्र ठणठणीत होते. म्हणजेच कोणाचेही एकही पान फाटलेले दिसत नव्हते.मुखपृष्ठही व्यवस्थित होती.मला आता चांगल्या घरी पडल्याचा आनंद झाला. खूप छान वाटले. आता मी काही दिवसापूर्वी फाटक्या अवस्थेत होतो. पण एक चांगला पुस्तकप्रेमी मित्र भेटल्याचा आनंद मला झाला. मी दुरुस्त झालो. तंदुरुस्त झालो आणि आता सुखाने या ठिकाणी नांदत आहे.

पुढील निबंध अवश्य वाचा.

मी पाहिलेला महापूर निबंध Essay on flood in Marathi

पडक्या किल्ल्याचे मनोगत वर मराठी निबंध Padakya Killyache manogat

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment