गुरुपौर्णिमा निबंध मराठी Gurupaurnima Essay In Marathi

गुरुपौर्णिमा निबंध मराठी Gurupaurnima Essay In Marathi

गुरुपौर्णिमा निबंध मराठी Gurupaurnima Essay In Marathi निबंध या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेला आहे.

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परम ब्रह्म दस्मै श्री गुरुवे नमः

असे भारतीय संस्कृतीने आपल्या गुरूंविषयी म्हटलेले आहे. इतके मोठे महत्त्व गुरूंचे असल्यामुळे गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि मंगलमय वातावरणात साजरा केला जातो.

Gurupaurnima More Information On Wikipedia

गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते.

गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.

महर्षी व्यासांनी महाभारत आणि अठरा पुराणे, त्याचप्रमाणे महत्त्वाचे असे भागवत पुराण यासारखे अनेक मोठे मोठे ग्रंथ लिहिले. त्यामुळे ते एक प्रकारे गुरु ठरतात.

महर्षी व्यासांसारखे अनेक ऋषीमुनी झाले. त्याचप्रमाणे आजच्या काळामध्ये सुद्धा अनेक महान गुरु विविध क्षेत्रात भारतीय संस्कृतीमध्ये आहेत. त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वरापेक्षा मोठे स्थान देण्यात आले आहे.

गुरुने दिलेला ज्ञानरूपी प्रकाश जपण्याचा आणि वाढवण्याचा वसा शिष्यांनी घ्यावा आणि त्याबद्दल आपल्या गुरूंचे कृतज्ञ राहावे म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आई-वडील हे गुरु असतात त्यानंतर शिक्षक गुरु असतात.

गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत असतात.

गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा आधार घेऊन आपण कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या आधाराने जीवन चांगल्या प्रकारे फुलवू शकतो.

गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर दिवस आहे. समाजातील विविध क्षेत्रातील गुरूंना यावर्षी मानवंदना दिली जाते. त्याचप्रमाणे त्यांना शासकीय आणि समाजातील विविध संस्थांकडून पुरस्कार दिला जातो.

आपले पहिले गुरू म्हणजे आई वडील आणि त्यानंतर शिक्षक यांचे आपल्या जीवनातील महत्त्व खूप मोठे आहे. त्यांच्या ऋणात राहणे म्हणजेच त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे हे भारतीय संस्कृतीचे महान मूल्य आहे हे मूल्य जपण्याची संधी गुरुपौर्णिमा आपल्याला देते.

 

Gurupaurnima Essay In Marathi
Gurupaurnima Essay In Marathi

गुरुपौर्णिमा निबंध मराठी Gurupaurnima Essay In Marathi हा निबंध नक्कीच आपल्याला आवडलेला असेल असेच काही सुंदर निबंध खाली दिले आहेत.

खरा तो एकची धर्म निबंध

माझा शाळेचा पहिला दिवस निबंध

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment