तक्षशिला जगातील पहिले विद्यापीठ World’s First University Taxila

तक्षशिला जगातील पहिले विद्यापीठ World’s First University Taxila

तक्षशिला जगातील पहिले विद्यापीठ World’s First University Taxila याविषयी लेखात माहिती दिली आहे.

जगातील पहिले विद्यापीठ कोणते? Which is world’s First University

भारताला अतिशय गौरवशाली इतिहास आणि दैदिप्यमान सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. तक्षशिला विद्यापीठ (Taxila University)हा त्याचाच एक भाग मानला पाहिजे. प्राचीन भारतात उच्च शिक्षणाची एक अतिशय मोठी आणि भरभराटीला आलेली परंपरा होती.तक्षशिला विद्यापीठ हे जगातील पहिले औपचारिकरित्या शिक्षण देणारे विद्यापीठ World’s First University Taxila होते. ज्या ठिकाणी केवळ धार्मिक शिक्षणच नव्हे तर त्या व्यतिरिक्त असणारे त्या काळातील सर्व विद्यांचे जागतिक मध्यमवर्गीय शैक्षणिक केंद्र होते.

वसुधैव कुटुंबकम् निबंध vasudhaiv kutumbakam The whole world is a family

जगातील पहिले विद्यापीठ तक्षशिला World’s First University Taxila कुठे आहे?

अखंड भारतात पूर्वी तक्षशिला विद्यापीठ भारताचाच एक भाग होते. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तक्षशिला विद्यापीठ हे पाकिस्तानच्या भूगोलाचा भाग बनले. पाकिस्तानातील पोथोहार क्षेत्रात तक्षशिला विद्यापीठ होते.रावळपिंडी शहरापासून 25 मैल अंतरावर तक्षशिला विद्यापीठाचे अस्तित्व होते. सध्याच्या रावळपिंडी जिल्ह्यामध्ये तक्षशिला हे प्राचीन शहर अस्तित्वात आहे.जुने तक्षशिला हे प्राचीन गांधींच्या राजधानीचे शहर होते सिंधू नदीच्या पूरक किनाऱ्यावर तक्षशिला वसलेले होते. आजही तक्षशिला विद्यापीठाचे अवशेष या भागात आढळतात.तक्षशिला जगातील पहिले विद्यापीठ World’s First University Taxila आजच्या भारतात नाही तर पाकिस्तानात आहे.

महाकवी कालिदास दिन का साजरा करतात Mahakavi Kalidas Din

तक्षशिला विद्यापीठ केव्हा स्थापन झाले? When was World’s First University Taxila founded?

तक्षशिला विद्यापीठ इसवी सन पूर्व सुमारे 600 ते 700 च्या दरम्यान स्थापन झाले असावे. रामायण अनुसार भगवान श्री रामचंद्र यांचे बंधू भरताचा मुलगा तक्ष याचे तत्कालीन भूमीवर राज्य होते. तक्ष या नावावरून तक्षशिला हे नाव अस्तित्वात आले असणार. अडीच हजार वर्षांपूर्वीचे हे विद्यापीठ तत्कालीन जगामध्ये हे मध्यवर्ती असे अस्तित्वात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वोच्च केंद्र होते. कुठलाही ठराविक अभ्यास नसला तरी जगभरातून हजारो विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासासाठी येत असत.

7 successful ways of Becoming wealthy श्रीमंत होण्याचे सात प्रभावी मार्ग

तक्षशिला विद्यापीठातील शिक्षक अथवा आचार्य

तक्षशिला विद्यापीठ अनेक आचार्यांची कर्मभूमी होती. वैदिकाने बौद्ध धर्माच्या उच्च शिक्षणाचे ते केंद्र असले तरी त्या ठिकाणी धार्मिक ज्ञानाव्यतिरिक्त अनेक विद्या आणि कौशल्य यांचे सूक्ष्म शिक्षण आचार्यांकडून दिले जात असे.पाणिनी हा जगप्रसिद्ध संस्कृत व्याकरणी हा तक्षशिला विद्यापीठाचा विद्यार्थी होता. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ज्ञानदान करणारा आचार्य देखील होता.

आर्य चाणक्य हे सुद्धा तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी आणि आचार्य होते. विद्यार्थी आणि आचार्य यांची महान परंपरा तक्षशिला विद्यापीठात आढळून येते. इतिहासाला अनेक गोष्टी आजही अज्ञात आहेत असे असले तरी तक्षशिला विद्यापीठाची गणना जगातील पहिले विद्यापीठ म्हणून केली जाते. अर्थात याबाबतीतही तक्षशिला विद्यापीठावर अन्याय होताना दिसतो. काही जगन्मान्य विद्वान तक्षशिला विद्यापीठाला विद्यापीठ मानत नाही.

India’s Ancient University

तक्षशिला विद्यापीठात किती फी घेतली जात असे?

तक्षशिला विद्यापीठात शिकणारी विद्यार्थी आपापल्या गुरूंना आपल्या ऐपतीप्रमाणे गुरुदक्षिणा देत असत. अर्थात ही गुरुदक्षिणा किती द्यावी हे स्वातंत्र्य गुरूंना असे. गोरगरीब विद्यार्थ्यांकडून आचार्य कोणत्याही प्रकारची गुरुदक्षिणा घेत नसत. विद्यापीठ हे राजाश्रय असलेले होते. त्यामुळे बऱ्याचदा अनेक राजांकडून विद्यापीठाला आर्थिक मदत भेटत असे. धनधान्य यांनी समृद्ध असलेले धनाढ्य लोकही तक्षशिला विद्यापीठाला मदत करत. धान्यादी माल आणि वस्तूंच्या स्वरूपात अनेक विद्यार्थी तक्षशिला विद्यापीठाला सहाय्य करत.

तक्षशिला विद्यापीठांमध्ये कोणता अभ्यासक्रम होता?

तक्षशिला विद्यापीठामध्ये कोणताही निश्चित असा अभ्यासक्रम नव्हता. तक्षशिला विद्यापीठामधील आचार्य हे आपापल्या विद्यांमध्ये अतिशय पारंगत आणि उच्च श्रेणी प्राप्त केलेले होते. विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार आचार्य त्यांना ज्ञानदान करीत असत. त्या ठिकाणी गेलेले शिष्य हे साधारणतः आठव्या वर्षापासून वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत शिक्षण घेत.

ब्रह्मचर्याश्रम हा शिक्षण घेण्याचा आश्रम मानला जातो. त्यानुसार या ठिकाणी आयुष्याचा एक चतुर्थांश भाग हा शिक्षणासाठी दिला जात असे. आयुष्यभरासाठी ज्ञान मिळावे यासाठी जगभरातून विद्यार्थी येत आणि उच्चविद्याविभूषित विद्यामार्तंड आचार्य या ठिकाणी ज्ञानदानाचे पवित्र कार्य अतिशय निस्पृह वृत्तीने करीत. त्यामुळे कोणत्याही ठराविक अभ्यासक्रमापेक्षा त्या ठिकाणच्या आचार्यांची कीर्ती ऐकून विद्यार्थी किंवा शिष्य या ठिकाणी विद्या हस्तगत करण्यासाठी येत असत. आणि महत्त्वाचे म्हणजे गुरु किंवा आचार्य शिष्य पारखून घेऊनच विद्यादान करायचे की नाही हे ठरवत असत.

तक्षशिला विद्यापीठामध्ये सुरुवातीला ब्राह्मी लिपी वापरले जात असे.त्यानंतर खरोष्टी लिपीचा वापर सुरू झाला. भारतीय विद्यांचा या विद्यापीठात समावेश असला तरी जगभरातील इतर भागातून आलेले आचार्य नवनवीन विद्यांचा परिचय करून देऊन या नवीन विद्येला विद्यापीठात समाविष्ट करण्यासाठी आग्रह धरीत स्वतः आचारी होऊन त्या ठिकाणी ज्ञानदान करीत असत.

तक्षशिला विद्यापीठ आणि तत्कालीन शासक

तक्षशिला विद्यापीठाला तत्कालीन शासक विविध प्रकारे मदत करत. त्याकाळी ज्ञानदान हे अतिशय पवित्र असे दान समजले जात होते.ज्ञानाच्या क्षेत्रात कोणीही शासनकर्ते हस्तक्षेप करत नसे. याउलट गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन राजे लोक विद्यापीठात पाठवत. शेवटी किंवा मदत मागण्यासाठी आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतीही मदत न करता पाठवणे पाप समजले जात होते.तो विद्येचा अनादर समजला जाई. त्यामुळे राजघराण्यांमधून विद्यार्थ्यांना मदत होत असे.

एवढेच काय तर विद्यापीठही राजे लोकांच्या विचारानुसार नवीन विद्याशाखांचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करत. राजे लोक विद्यापीठातील गुरु शिष्य अधिकारी यांचा यथोचित गौरवही करीत.

तक्षशिला जगातील पहिले विद्यापीठ World’s First University Taxila याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतली आपल्याला निश्चितच आवडली असेल. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपण मला अशाच सुंदर माहितीसाठी प्रोत्साहन द्याल अशी अपेक्षा आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment