वसुधैव कुटुंबकम् निबंध vasudhaiv kutumbakam The whole world is a family

वसुधैव कुटुंबकम् निबंध vasudhaiv kutumbakam The whole world is a family

वसुधैव कुटुंबकम् निबंध vasudhaiv kutumbakam The whole world is a family या विषयावर या ठिकाणी निबंध दिलेला आहे.वसुधैव कुटुंबकम् भारतीय संस्कृतीची शिकवण काय आहे या विषयावर चर्चा केली आहे.

वसुधैव कुटुम्बकम vasudhaiv kutumbakam, The whole world is a family भारतीय जीवनदर्शनाचे सारांश सांगणारे एक महान वाक्य आहे. या महान वाक्यातून संपूर्ण पृथ्वी ही एक कुटुंब आहे. एका परिवाराप्रमाणे संपूर्ण पृथ्वी असण्याची भावना या महान वाक्यातून प्रतिबिंबित होते. हे वाक्य महाउपनिषदातील आहे. भारतीय संस्कृतीचे संपूर्ण सार या लहान परंतु महान वाक्यातून स्पष्ट झाले आहे.

शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला Shivneri Killa Mahiti In Marathi

शांततापूर्ण सहअस्तित्व आणि बंधुत्वाची भावना भारतीय संस्कृतीने हजारो वर्षापासून जोपासलेली आहे. भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती आहे जगाला भारतीय संस्कृतीने जी काही अनमोल अशी शिकवण दिली आहे. त्यातील वसुधैव कुटुंबकम् vasudhaiv kutumbakam हे शिकवण अत्यंत सारभूत आहे.

भारताची पंचाहत्तर वर्षांतील वैज्ञानिक प्रगती निबंध India’s scientific progress in seventy-five years

वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय?

अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैवकुटुम्बकम् ॥ (महोपनिषद्, अध्याय ६, मंत्र ७१)
अर्थ:- हा आपला आणि हा परका असा विचार संकुचित मनोवृत्तीचे लोक करतात मात्र उदार विचारांच्या व्यक्तीसाठी संपूर्ण पृथ्वी ही एका कुटुंबाप्रमाणे असते.

भारतीय संस्कृतीचे उदार शिकवण वसुधैव कुटुंबकम् vasudhaiv kutumbakam The whole world is a family

आजच्या जगामध्ये जवळजवळ 200 देश आहेत. प्रत्येक देशाचे कोणत्या ना कोणत्या देशाबरोबर संघर्षपूर्ण सबंध आहेत. अनेक धर्म जगामध्ये आहेत आणि त्या प्रत्येक धर्मातील लोकांमध्ये काही ना काही वैचारिक संघर्ष आहेच. केवळ धर्मातच नाही तर जाती जातीत आणि माणसामाणसात मतभेद आणि मनभेद आहेत. परंतु भारतीय संस्कृती सांगते की आपले विचार उदार ठेवा. हा आपला हा परका असे विचार ठेवत असाल तर आपण संकुचित मनोवृत्तीच्या आहात. आपण जर संकुचित वृत्तीच्या असाल तर एखाद्या डबक्यातील बेडकाप्रमाणे आपले विश्व अत्यंत छोटे असेल. परंतु आपले विचार उदार असतील तर आपले डोके छोटे असले तरी संपूर्ण विश्व हे आपल्याला एका कुटुंब प्रमाणे असेल आणि विश्वातील जीव हे कुटुंबातील सदस्य असतील.

महाकवी कालिदास दिन का साजरा करतात Mahakavi Kalidas Din

भारतीय संसदेच्या प्रवेशद्वारावर वसुधैव कुटुम्बकम vasudhaiv kutumbakam The whole world is a family

भारतीय संसदेच्या प्रवेश कक्षामध्ये वसुधैव कुटुम्बकम या सुभाषिताच्या ओळी आपल्याला लिहिलेल्या आढळतील. याचे कारण असे की भारतीय संस्कृती ही उदारमतवादी आहे. भारतामध्ये जगभरातून अनेक धर्माचे, वंशाचे, पंथांचे लोक आले.परंतु भारताने या सर्वांना उदारपणाने सामावून घेतले. कोणालाही दूर लोटले नाही त्याचा परिणाम म्हणून भारतीय संस्कृती ही विविधतेत एकता अशा प्रकारची वैशिष्ट्य असणारी महान संस्कृती काळाच्या ओघात बनली आहे. हेच भारतीय संसदेच्या प्रवेशद्वारावर लिहून भारतीयांनी भारतीयांचे प्राचीन काळापासूनचे उदार विचार जगापुढे ठेवले आहेत.

जागतिकीकरण आणि वसुधैव कुटुंबकम Globalisation and vasudhaiv kutumbakam The whole world is a family

सध्या जागतिकीकरणाचे (Globalisation)वारे वाहत आहेत. या जागतिकीकरणाचा खरा मतितार्थ वसुधैव कुटुंबकम असाच आहे. संपूर्ण जग हे एक कुटुंब असणे आणि आपण त्या कुटुंबातील सदस्य असणे ही एक फार सुंदर संकल्पना आहे. अशीच वृत्ती प्रत्येक व्यक्तीची जगभरात व्हावी तरच जागतिकीकरणाला काहीतरी मूल्य प्राप्त होईल.

संत कबीर जयंती 2023 Kabir Jayanti in Marathi

G-20 आणि वसुधैव कुटुम्बकम् थीम

G-20 ज्या जागतिक परिषदेचे थीम वसुधैव कुटुम्बकम अशीच होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोगो आणि थीमचे उद्घाटन केले वसुधैव कुटुंबकम या थीम मधून जगाला भारताने भारताच्या महानतम वारशाचा परिचय करून दिला आहे.

जगभरात आज कुटुंब व्यवस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. औद्योगीकरणाने संयुक्त कुटुंब पद्धतीवर मोठा आक्रमक हल्ला झाला. विभक्त कुटुंब पद्धती उदयास आली. परिणामी माणूस माणसापासून अधिक दूर झाला. विभक्त कुटुंबातूनही आजच्या 21 व्या शतकात माणूस एकटेपणाचा अनुभव घेत आहे.

भारतीय संस्कृतीचे सारतत्व वसुधैव कुटुम्बकम् Vasudhaiv kutumbakam

विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे सार आहे. देशभरात वेगवेगळ्या धर्माचे आणि रंगाचे लोक, वेगवेगळ्या चालीरीती आणि प्रथा पाळणारे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे आणि विविध प्रकारचे कपडे परिधान करणारे लोक आपल्याला दिसतात. ही विविधता कोणालाही भारतीय किंवा या भव्य राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांची राष्ट्रीय ओळख मागे घेण्यास प्रतिबंध करत नाही. या राष्ट्रीय भावनेचे प्रकटीकरण आपल्यासाठी नवीन नाही. फार पूर्वीपासून, हा उपखंड विविध वंश, धर्म आणि चालीरीतींच्या लोकांसाठी एक सामान्य घर होता. ते सर्व एकोप्याने आणि शांततेचे जीवन जगत आहेत. त्यामुळे या संस्कृतीला सर्व जग व्यापून टाकण्यासाठी ही एकात्मतेची भावना वाढवणे कधीच अवघड नव्हते.

भारतीय संस्कृती का मूलमंत्र वसुधैव कुटुंबकम

वसुधा म्हणजे पृथ्वी ही सर्वांची म्हणजेच मानव जातीसह सर्व सजीवांची माता आहे. आज संपूर्ण पृथ्वीवर निसर्गाचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. पृथ्वीवरील भारतासारख्या देशाने वसुधैव कुटुंबकम (vasudhaiv kutumbakam The whole world is a family )अशी हजारो वर्षांपूर्वी मानवाला साथ घातली आजही तो घालत आहे. पृथ्वीवरचे हे मानवाचे कुटुंब हे संपूर्ण जीव जंतू सहित असणारे कुटुंब आहे. सर्व प्राण्यांप्रती असणारी भूतदया ही तर भारतीय संस्कृतीची मोठीच देणगी आहे.

भारतीय संत आणि वसुधैव कुटुम्बकम्

जे जे भेटे भूत।ते मानिजे भगवंत॥ असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. प्रत्येक जीवांमध्ये परमेश्वर पहा त्यामधील चैतन्य पहा आणि त्याला नमस्कार करा. वंदन करा. शेवटी संपूर्ण पृथ्वी हे आपले कुटुंबच आहे असे ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायचे आहे. संत ज्ञानेश्वर माऊली तर असे म्हणतात की हे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचरा । आपण पै झाला॥ याचे कारण असे की भारतीय धर्म हे पृथ्वीला आपले कुटुंब मानले पाहिजे या उदार विचाराचे पाईक आहेत.

सारांश

संपूर्ण पृथ्वी हा आपला परिवार असून संपूर्ण जीवांशी असलेले नाते हे बंधुत्वाचे आहे. हेच विश्वबंधुत्व भारत हजारो वर्ष मानत आलेला आहे आणि संपूर्ण विश्वाला विश्वबंधुत्वाची शिकवण देत आलेला आहे. वसुधैव कुटुंबकम vasudhaiv kutumbakam The whole world is a family ही विश्वबंधुत्वाची अमर अशी अनमोल शिकवण आहे. ही शिकवण संपूर्ण विश्वाला सतत साथ घालीत राहील आणि विश्वबंधुत्वाची शिकवण देत राहील.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment