माझा मराठाची बोलू कौतुके अर्थ Maza Marathachi Bolu Kautike Arth

माझा मराठाची बोलू कौतुके अर्थ Maza Marathachi Bolu Kautike Arth

माझा मराठाची बोलू कौतुके Maza Marathachi Bolu Kautike Arth या संत ज्ञानेश्वरांच्या उद्गाराचा भावार्थ या लेखांमध्ये चर्चिला आहे.

माझा मराठाची बोलू कौतुके।
परी अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके ।
मेळविण।।”

वरील ओळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील आहेत. मराठी भाषेत लिहिलेल्या साहित्याला समृद्ध अशी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेबद्दल सार्थ अभिमान होता. म्हणूनच मराठी भाषेची महती वर्णन करताना संत ज्ञानेश्वर महाराज वरील उद्गार ज्ञानेश्वरी या जगप्रसिद्ध ग्रंथात काढतात.

वसुधैव कुटुंबकम् निबंध vasudhaiv kutumbakam The whole world is a family

मराठी भाषा कोणत्याही दृष्टिकोनातून कमी दर्जाची नाही. सर्वच अभिजात भाषांना पुरेपूर स्पर्धा करू शकणारी आहे.

माझ्या मराठी भाषेतील शब्दांचे कौतुक काय सांगू ती इतकी श्रेष्ठ आहे की अमृताबरोबर पैज लावली तरीही त्यापेक्षा जास्त गोडी मराठी भाषेत आढळून येईल.अमृताबरोबर मराठी भाषेची पैज लावली तर नक्कीच मराठी भाषा जिंकेन. असंच ज्ञानेश्वर महाराजांना या ठिकाणी म्हणायचे आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मराठी भाषा ही हलक्या दर्जाची आहे तर इतके रसपूर्ण अक्षरांचे संयोग घडवून मी अशी रचना करीन की निश्चितच मराठी भाषा अमृताहुन गोड आणि मधुर वाटल्याशिवाय राहणार नाही.

गीत : माझा मराठाचि बोलु

अमृतापेक्षाही मराठी भाषेत जास्त माधुरी आहे. आणि माझ्या साहित्यामधून तुम्हाला अनुभवायला यावं हीच माझी इच्छा आहे. सर्वसामान्यांना कळावं म्हणून भगवद्गीतेतील अध्यात्म ज्ञानेश्वरांनी मराठीतून जनसामान्यांना सांगितले. त्यानंतरही पुढे अनेक संत महंतांनी, कवी-लेखकांनी मराठी भाषेत समृद्ध अशी साहित्याची परंपरा निर्माण केले.

तेराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्यावेळी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी सरकार ग्रंथ लिहिला किंवा सांगितला त्या वेळचा धर्माभिमानी समाज संस्कृत भाषेचा अभिमानी आणि पुरस्कार होता. धर्माचे ज्ञान केवळ संस्कृत भाषेतच सांगितले जाऊ शकते. इतकी गोडी इतर भाषांना कुठून असणार. मराठी प्राकृत भाषा ही धर्म सांगण्यास अत्यंत हलक्या दर्जाची आहे.

सर्वसामान्यांच्या भाषेत ग्रंथ लेखन करणे हे काही संस्कृत भाषेशी स्पर्धा करण्यासारखं नाही. इतकी संस्कृत किंवा अन्य धर्मभाषा आहे. असे काही धर्मपंडितांना वाटत होते. हा आक्षेप संत ज्ञानेश्वरांना मान्य नव्हता. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेची थोरवी आणि गौरव वेळोवेळी दाखवून देणाऱ्या ओव्या अतिशय रसपूर्ण भाषेत लिहिल्या आहेत.

संस्कृत ही जगातील एक श्रेष्ठ भाषा आहे. संस्कृत अभिजात अशी भाषा आहे. हिंदूधर्मियांच्या सर्व ग्रंथाचे ज्ञान प्रामुख्याने संस्कृत भाषेतून आले आहे. परंतु काळाच्या ओघात संस्कृत भाषा सर्वसामान्य जणांना अत्यंत अवघड वाटू लागली. ती अनाकलनीय होऊ लागली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत अर्थात प्राकृत मराठी भाषेत ग्रंथ निर्मिती करून धर्माचे गाभाभूत ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते.

यासाठी संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी व हरिपाठ यासारखे श्रेष्ठ ग्रंथ लिहिले. त्यातून मराठी भाषेचा गौरव वाढवला. सातशे वर्षे होऊन गेले तरी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा लौकिक कमी झाला नाही. या उलट तो अधिकच वाढू लागला आहे.

मराठी भाषेची थोरवी इतकी आहे की एखाद्या भाषेला जर तुम्ही अमृत म्हणत असाल तर त्या अमृताबरोबरही पैज जिंकण्याची समृद्धी आणि शक्ती मराठी भाषेत आहे. असे संत ज्ञानेश्वरांनी अतिशय स्पष्ट शब्दात उच्चरवाने सांगितले आहे. आणि जरी कोणाला असे वाटत असेल की हे चुकीचे आहे तर मी रसपूर्ण अशा मराठी शब्दांमध्ये काव्य लिहील…. ज्यामुळे मराठी भाषेचा गोडवा तुमच्या लक्षात येईल. मराठी भाषेची थोरवी तुम्हाला समजून येईल असेच संत ज्ञानेश्वरांना या ठिकाणी म्हणायचे असावे.

संत ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठी भाषेचे कौतुक इतके आहे की अमृता बरोबरही ती पैज जिंकू शकते आणि जर तुम्हाला असेच वाटत असेल की हे शक्य नाही तर पहा अत्यंत रसपूर्ण अशा शब्दांमध्ये मी रचना करीन आणि तुम्हाला हे दाखवून देईल की मराठी भाषा ही कोणत्याही प्रकारे कमी नसून ती श्रेष्ठ आहे.

मराठी भाषेचा गौरव करताना संत ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात की,” इये मराठीचिये नगरी । ब्रह्म विद्येचा सुकाळूकरी।।” यातूनही ज्ञानेश्वर महाराजांना हेच म्हणायचे आहे की ब्रह्मविद्या किंवा आध्यात्मिक विद्या किंवा धर्माची विद्या ही मराठीसारख्या प्राकृत भाषेतून सांगणे सहज शक्य आहे इतकी मराठी भाषा समृद्ध आहे. इतका गोडवा, माधुर्य मराठी भाषेत आहे की संस्कृत भाषेत ज्याप्रमाणे ज्ञान देता येते… त्याचप्रमाणे किंवा अधिकच सरस ज्ञानदान किंवा ज्ञान देण्याची क्षमता मराठीसारख्या भाषेत आहे आणि हे मी सिद्ध करून दाखवीन.

खरे तर आपली मराठी भाषा ही जगाच्या पाठीवर एक श्रेष्ठ भाषा म्हणून ओळखली जाते. आज आपल्याला आपल्याच या मराठी भाषेचा अभिमान वाटणे ऐवजी लाज वाटू लागली आहे असे काही मूर्ख महाभाग म्हणतात. परंतु मराठी भाषा ही किती श्रेष्ठ आहे हे मराठी भाषेतील साहित्य वाचले की लक्षात येईल.

मराठी भाषेत सुरुवातीला संतांनी शतकानुशतके काव्यरचना केली. त्यानंतर पंत कवींनी काव्यरचना केली. पुढे अर्वाचीन काळात अनेक साहित्यिक उदयास आले. त्यांनीही मराठी भाषेत मराठी भाषेला ललामभुत ठरणारे गद्य आणि पद्य लेखन केले. मराठी भाषा ही कोणत्याही प्रकारे कनिष्ठ दर्जाची नसून ती एक अभिजात अशी भाषा आहे याचे पुरावे ठिकठिकाणी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही सापडतात.

महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव देऊन त्याचा पाठपुरावा चालवला आहे. लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. जरी तो मिळाला नाही तरी त्याने मराठी भाषेची थोरवी निश्चितच कमी होणार नाही. कारण आपले पूर्वाचे संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा अभिजात आहे किंवा अभिजात भाषेवर श्रेष्ठ आहे हे “माझा मराठाची बोलू कौतुके” या उद्गारातून मराठीजनांना सांगितले आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment