बाबिलोनियन संस्कृती मराठी माहिती Babylonian Civilization Information in Marathi
Table of Contents
बाबिलोनियन संस्कृती (बाबिलोनियन सभ्यता) जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक समजली जाते.बाबिलोनियन संस्कृती एक उन्नत आणि वैज्ञानिक दृष्टीने सक्षम अशी संस्कृती होती.बाबिलोनियन संस्कृती मराठी माहिती Babylonian Civilization Information in Marathi आपण या लेखात घेणार आहोत.

Image Source istockphoto
बाबिलोनियन संस्कृतीचा कालखंड Babylonian Civilization Information in Marathi
बाबिलोनियन संस्कृतीचा(बाबिलोनियन सभ्यता) कालखंड इसवीसन पूर्व 3500 ते 2000 असं सांगता येईल. तैग्रिस व युफ्रेटीस या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये जो प्रदेश प्राचीनकाळी ओळखला जाई त्याला मेसापोटेमिया असे म्हणत. त्या प्रदेशा तच आता इराक हा देश आहे. ही भूमी अतिशय सुपीक होती. या भूमीवर सुमेरियन संस्कृतीचा विकास घडवून आला. इसवी सन पूर्व 4500 च्या सुमारास या भागामध्ये ज्या मानवी समाजाच्या वसाहती होत्या. त्यांना सुमेरियन असे म्हटले जाईल.ते मानव सेमेटिक वंशातील होते असे इतिहास सांगतो.
तक्षशिला जगातील पहिले विद्यापीठ World’s First University Taxila
बाबिलोनियन संस्कृतीचा उदय (Babylonian Civilization Information in Marathi)
याच सुमेरियन संस्कृतीचा पुढे अकेडीयन नावाच्या संस्कृतीशी संबंध आला. इसवी सन पूर्व 3500 ते इसवी सन पूर्व 2018 या कालखंडाच्या दरम्यान बाबिलोनियनाच्या नैऋत्य भागामध्ये या दोन संस्कृतींच्या संगमातून बाबिलोनियन नावाची एक नवीनच संस्कृती उदयास आली.
महाकवी कालिदास दिन का साजरा करतात Mahakavi Kalidas Din
कृषी आधारित बाबिलोनियन संस्कृतीचा विकास व आर्थिक जीवन
हामुराबी या राजाने एक विधी संहिता तयार केली होती. हामुराबी हा जगातील पहिला कायदा निर्मिती करणारा शासक समजला जातो. हामुराबीची विधीसंहिता आजही प्रसिद्ध आहे.सर्वत्र कालवे बांधून त्याने त्या भौगोलिक प्रदेशाची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी सुधारली होती. शासकीय दृष्ट्या सुमेरियन व अकेडीयन या दोन्ही संस्कृतींचे एकत्रीकरण किंवा एकीकरण त्याने घडून आणले.
Babylon ancient city, Mesopotamia, Asia
येथील लोक शेती करणारे होते. शेतीवर आधारित त्यांची अर्थव्यवस्था होती. जमीनही सुपीक असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकवण्यास फारशी कठीण जात नसे. त्याचप्रमाणे सर्वत्र कालव्यांचे असलेले जाळे यामुळे शेतकरी समृद्ध होते. त्यांचा तेथील शासकांना आर्थिकदृष्ट्या फायदा होत असे.
बाबिलोनियन संस्कृतीने प्रथम वर्णमाला शोधली
जगामध्ये प्रथम वर्णमाला तयार करण्याचे श्रेय या बाबिलोनियन संस्कृतीकडे जाते असे म्हणतात. लेखन पद्धतीचा ही विकास आणि प्रारंभ केला. बोरुने टोचून कोरून लेख उठवण्यात येई. हे ठोकळे भाजून भाजून काढले जात.हे ठोकळे म्हणजेच इष्टिकालेख तयार केली जात. अशा पद्धतीने विटांवर लिहिलेल्या पुस्तकांची एक ग्रंथशाळा किंवा ग्रंथालय निनवी नावाच्या शहरात इसवी सन पूर्व सातव्या शतकात अस्तित्वात होते.
बाबिलोनियन संस्कृतीच्या कालखंडात मातीच्या टोलेजंग इमारतीही त्यांनी बांधल्या. रत्नांना मुलामा देण्याची पद्धत त्याचप्रमाणे भोके पाडण्याची आणि त्यावर खोदकाम करण्याची कलाही बाबिलोनियन संस्कृतीतील लोकांनी शोधून काढली.
माणसासारख्या प्राण्यांचे हुबेहुब चित्र त्या संस्कृतीतील लोक काढीत.विणकाम करण्याची कलाही त्यांना अवगत होती. कालमापनासाठी त्यांनी छायायंत्र तयार केले होते. त्याचप्रमाणे पंचांग अर्थात कॅलेंडरही तयार केले होते. संख्यागणनासाठी 60 या आकड्यावर आधारित षष्ठीक ही पद्धती त्यांनी स्वीकारली होती.
जमिनीच्या मोजमापासाठी ज्या आकृती बनवल्या त्यातून भूमिती तयार झाली. इतके बुद्धिमान असूनही भावीलो नियम लोकांनी आपली सर्व बुद्धी फलज्योतिष्य व जादूटोणा अशा विषयांमध्ये खर्च केलेली दिसते असे म्हटले जाते.
बाबिलोनियन संस्कृती मराठी माहिती Babylonian Civilization Information in Marathi आपण या ठिकाणी वाचली.