पतेती,नवरोज उत्सव किंवा जमशेदी नवरोज Pateti Or Navroz in Marathi

पतेती,नवरोज किंवा जमशेदी नवरोज Pateti Or Navroz in Marathi

पारशी समाजाचा नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोज किंवा जमशेदी नवरोज Pateti Or Navroz in Marathi असे म्हणून ओळखला जातो. या दिवसालाच पतेती असे समजले जाते.पारशी समाज हा भारतातील एक लहानसा समाजगट आहे. वास्तविक पाहिले तर पर्शिया म्हणजे इराणमधूनहा समाजगट भारतात येऊन स्थिरावला आहे. पर्शियामधून आले म्हणून त्यांना पारशी असे समजले जाते. पतेती Pateti Or Navroz in Marathi हा पारशी धर्मीयांचा एक खूप महत्त्वाचा सण मानला जातो.धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय हा सण अतिशय आनंद आणि उत्साहात साजरा करतात.

खरा तो एकची धर्म निबंध Khara To Ekachi Dharm Nibandh

पतेती म्हणजे काय

ज्याप्रमाणे हिंदू धर्मीय लोक चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा नववर्ष दिन म्हणून साजरा करतात. त्याचप्रमाणे पतेती हा पारश्यांचा नववर्ष दिवस होय.

मुळातच पतेती म्हणजे “पश्चात्तापाचा दिवस” (पेटेटचा खरा अर्थ “कबुलीजबाब” असा आहे). हा खरोखर आत्मनिरीक्षणाचा केव्हा आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे.

पटेती हा शब्द पेटेटवरून आला आहे ., पश्चात्तापासाठी मध्यपर्शियन शब्द. पटेती हा दिवस म्हणून एखाद्या व्यक्तीसाठी मागील वर्षातील त्यांचे विचार, शब्द आणि कृती यावर विचार करण्याचा आणि जे चांगले नव्हते त्याबद्दल पश्चात्ताप करण्याचा दिवस आहे. पश्चात्ताप नवीन वर्ष नैतिक वाढीच्या प्रक्रियेत चांगले विचार शब्द आणि कृतींना समर्पित करण्यास अनुमती देतो. असे असले तरी पतेती हा सण नववर्ष दिन म्हणून जास्त साजरा होताना दिसतो.

The Significance of Pateti

फार फार पूर्वी मूलतः पारसी वर्षाच्या शेवटच्या दिवशी (किंवा शेवटच्या 5 दिवसांवर) पतेती साजरा केला जात असे. पुढे कालांतराने हाच पतेतीचा दिवस नवीन वर्षाचा दिवस म्हणून (पहिल्या दिवशी) साजरा केला जाऊ लागला. नाव कायम ठेवले असले तरी आता पतेती हा आत्मपरीक्षणाचा दिवस राहिलेला नाही. आता हा दिवस नववर्ष दिन म्हणून साजरा होत आहे.

दिनदर्शिकेनुसार पारशी वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला नवरोज  म्हणजेच नवी सृष्टी असे म्हणले जाते. नव्या वर्षापासून आपण नवीन कालखंडात प्रवेश करीत असताना हा सण साजरा करतो. या सणाला नवीसृष्टी अतिशय अर्थपूर्ण असे नाव दिले ही खूप सुंदर आणि स्वीकारणीय अशी संकल्पना पारशी धर्मियांनी संपूर्ण जगाला दिली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी पद्धतीने तयार केलेले भोजन घेतात. अग्यारी हे पारशी धर्मीय लोकांचे प्रार्थना स्थळ आहे.

पतेती सण कसा साजरा केला जातो?

पतेतीच्या दिवशी पारशी बंधुभगिनी सकाळीच पहाटेला उठतात. हिंदू धर्मीय लोक ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये विशेष स्नान करतात त्याचप्रमाणे पारशी लोक या दिवशी सणानिमित्त विशेष असे स्नान केले जाते. त्याला “नहान” असे म्हणतात. त्यानंतर नवीन कपडे परिधान करून पारशी धर्मीय बंधू-भगिनी अग्यारीत प्रार्थनेला जातात.अग्यारी हे पारशी समाजाचे पवित्र धर्मस्थळ आहे.

अग्नी ही पारशी धर्मियांची अत्यंत पूजनीय देवता असून हे पावित्र्य सातत्य ठेवण्यासाठी अग्यारीमधे सतत अग्नी प्रज्वलित ठेवलेला असतो. पतेतीच्या दिवशी धर्मोपदेशक विशेष प्रार्थना करून जमलेल्या बांधवांना आशीर्वाद देतात.नंतर सर्वजण परस्परांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात.

पतेतीच्या दिवशी गोरगरिबांना दान करण्याचे महत्त्व विशेष मानलेले आहे परस्परांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात. गरजूंना अन्नदान केले जाते.

पतेतीला काय बनवतात?

या दिवशीचे खास भोजन म्हणून सालीबोटी,मावा निबोई,पत्र निमाच्ची आणि रवा, फालुदा हे पदार्थ पारंपरिक पद्धतीने तयार केले जातात आणि त्याचेच भोजन सर्वजण घेतात.

पारंपारिक नाश्त्यामध्ये सुजी (रवा), दूध आणि साखरेपासून बनवलेले रावो आणि साखरेच्या पाकात शिजवलेले आणि मनुका आणि बदामाच्या चकत्याने सजवलेले शेव – तळलेले शेवया यांचा समावेश होतो.सुतारफेनी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात पुलाव डाळ (तांदूळ आणि मसूरची चटणी) यांचा समावेश होतो – अनेकदा साधा तांदूळ आणि मूग डाळ, साळी बोटी (वर तळलेल्या बटाट्याच्या डंकांसह सॉसमध्ये मांस), आणि पत्रा-नी-मच्छी (पानांमध्ये तयार केलेला मासा).गोड खाण्यात सुटेरफेनी (बारीक शेवया चकल्या) आणि जिलेबी (एक केशरी रंगाचे खोल तळलेले, साखरेच्या पाकात भिजवलेले पिठ, मोठ्या प्रेटझेलसारखे आकार) यांचा समावेश होतो.

पारशी धर्माचा संस्थापक कोण आहे?

झरतुष्ट हा पारशी धर्माचा संस्थापक मानला जातो. अहुर मज्द ही या धर्म संप्रदायाची प्रमुख पूजनीय देवता मानली जाते.

पारशी धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे?

झेंडा अवेस्ता हा पारशी धर्माचा ग्रंथ असून “पैतीता” या अवेस्तामधील शब्दाचे अपभ्रंशित रूप म्हणजे “पतेती” होय.

पतेती,नवरोज किंवा जमशेदी नवरोज Pateti Or Navroz in Marathi याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतली.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment