खरा तो एकची धर्म निबंध Khara To Ekachi Dharm Nibandh
खरा तो एकची धर्म निबंध Khara To Ekachi Dharm Nibandh साने गुरुजींनी आपल्याला खरा तो एकची धर्म ही प्रार्थना आपल्या काव्यरूपात दिली आहे. खरा तो एकची धर्म निबंध Khara To Ekachi Dharm Nibandh या ठिकाणी या प्रार्थनेवर आधारित देत आहे.

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना आपण शाळेमधून म्हणत आलो आहोत. खरा धर्म हा एकच आहे तो म्हणजे प्रेम.जगात अनेक धर्म असले तरी सगळ्यांचा आत्मा हा प्रेम आहे आणि तोच खरा धर्म आहे. खरा तो एकची धर्म म्हणजे एकच धर्म खरा…. कोणता तर तो म्हणजे प्रेमाचा होय. असेच साने गुरुजी यांना या प्रार्थनेतून व्यक्त करायचे आहे.
भारताची पंचाहत्तर वर्षांतील वैज्ञानिक प्रगती निबंध India’s scientific progress in seventy-five years
जगाच्या इतिहासाचा विचार करता अनेक धर्मांचा जगभरात उदय झाला. काही धर्म मागे पडले. काही पुढे आले. काही पुढे आले काही मागे पडले… असे सतत होत आले आहे. परंतु प्रत्येक धर्म स्थापनेमागे किंवा तो धर्म निर्माण होण्यामागे प्रेम आणि प्रेम ही एकच अत्युच्च अशी मध्यवर्ती भावना होती. याच प्रेमाच्या भावनेला केंद्रित ठेवून धर्माची स्थापना प्रत्येकजण करत गेला. परंतु प्रत्येक धर्म कर्मकांड आणि कठोर नियम पालनामुळे प्रेमापासून वंचित झाला. हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे आणि नव्या युगाचा धर्म केवळ प्रेम आहे हे सत्य स्वीकारले पाहिजे.
शिक्षणाचे डिजिटायझेशन निबंध Shikshanache Digitization Essay In Marathi
धर्म हा समाज धारणेसाठी असलेल्या नियमांचा एक समुच्चय असतो. प्रेम हा मंगलमय अशा पवित्र भावनांचा समुच्चय असतो. कोणत्याही धर्माचा आत्मा किंवा गाभा प्रेमच असतो.काळाच्या ओघांमध्ये धर्मातील अनेक नियमांना रूढी आणि परंपरा चिकटत जातात. धर्म कर्मकठोर आणि न्यायनिष्ठूर बनत जातो. परिणामी धर्माची निर्मिती होताना असलेली प्रेम, सद्भावना, मानवता, सहकार्य इत्यादी मुल्ये मागे पडत जातात. धर्माधर्मांमध्ये प्रचंड मोठा संघर्ष निर्माण होतो. निर्माण झालेला हा संघर्ष राष्ट्रराष्ट्रामध्ये भयंकर युद्धे घडवून आणतो. परिणामी प्रेमाचा संदेश मागे पडतो.
धार्मिक विद्वेषातून माणसामाणसांमध्ये द्वेषाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत.परधर्मीय व्यक्तीबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे. परधर्मीय व्यक्ती ही एक चुकीच्या मार्गाने चाललेली व्यक्ती असून आपलाच काय तो धर्म खरा असे माणसाला वाटू लागले आहे. समाजामध्ये प्रचंड अशी द्वेषाची दरी निर्माण होत आहे. त्यामुळे दंगली होत आहेत. जागोजागी संघर्ष होत आहेत. माणसे किड्यामुंगीसारखी मारली जात आहेत. माणसांचे हे मरणे ही द्वेषरुपी विषवल्लीची शिकार आहे. हे द्वेषाची किंवा मत्सराची विषवल्ली मूळापासून काढून टाकली पाहिजे. नाहीतर पृथ्वीवरचा मानववंश पूर्णतः नष्ट होऊ शकतो किंवा तो नष्ट करण्याची भयंकर राक्षसी शक्ती मत्सरामध्ये आहे. आणि प्रेम ही अशी अमृतवल्ली आहे की ती संपूर्ण जगाला आपल्या प्रेमदृष्टीतून वाचू शकते.
21 व्या शतकामध्ये डिजिटल क्रांती झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने तंत्रज्ञान व्यापून टाकलेले आहे. तरीसुद्धा जगातील महत्त्वाचे धर्म आणि धर्ममार्तंड आपापल्या धर्माची बढाई मारण्यात आणि इतर धर्मियांना कमी लेखण्यात मग्न आहेत. कोणत्याही धर्माला नावे न ठेवता प्रत्येक धर्माचा सार काय आहे ते आपण जाणून घेतले.. तरी या विज्ञान युगातही धर्माचे महत्व अबाधित राहून केवळ प्रेमाची भाषा समाजाला तारण्यास उपयोगी पडेल हेच सिद्ध होईल.
साने गुरुजी म्हणतात की “असे हे सार सत्याचे असे हे सार धर्माचे परार्थी प्राणही द्यावी जगाला प्रेम अर्पावे.” सर्व सत्यांचे सार सर्वधर्मांचे सार म्हणजेच प्रेम होय. “प्रेम हा मानवी संस्कृतीचा सारांश आहे” असे कवी कुसुमाग्रज म्हणाले होते. प्रेमाची भावना ही अतिउत्कृष्ट भावना असून ती प्रत्येक सजीवाला आपलीशी करते. सानेगुरुजींसारखा संवेदनशील कवी हे न जाणता तर नवलच होते.जगाला जर आपल्याकडे काही देण्यासारखे असेल तर ते म्हणजे प्रेमच होय.
प्रेम हा शब्द आठवला की बहुतेकांना चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नायक आणि नायिकेमध्ये असलेलेच प्रेम आठवते. परंतु असे काही नाही. प्रेम ही अतिशय सर्वस्पर्शी भावना आहे. आई आणि मुलांमधील प्रेम, भावा-बहिणी मधील प्रेम, भावा-भावातील प्रेम, पती-पत्नी मधील प्रेम, एखादा पाळीव प्राणी आणि आपण यामध्ये असलेले प्रेम, निसर्गावर असलेले प्रेम, परमेश्वरावर असलेले प्रेम अशी प्रेमाची अनेक किंवा अनंत रूपे आहेत असे म्हणता येईल. कारण प्रेम हे सर्वत्र असून परमेश्वर हा सुद्धा प्रेमस्वरूप असतो असे सर्वच धर्मातील साधुसंत म्हणतात.
प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई असे एका कवीने आपल्या आईबद्दल म्हटलेले आहे. आईचे स्वरूप हे प्रेमाचे निखळ आणि नितळ प्रतिबिंब आहे. आई आपल्या मुलाला देह देते त्याचप्रमाणे प्रेम भरलेले मनही देते. हे प्रेम घेऊन मूल एकेक पाऊल टाकत जगामध्ये चालते. ज्या ज्या वेळेला ते प्रेमाची भावना घेऊन पुढे चालते त्यावेळी त्याला प्रेमच मिळत राहते. परंतु ज्या ज्या वेळी द्वेष मत्सर निर्माण होतो त्या वेळेला अशाच नकारात्मक भावना त्याच्याकडे चालत येतात.
खरा म्हणजे सत्यधर्म हा प्रेम असून प्रेमाची भाषा ही सर्व जीवांना आपलीशी करते. प्रेमाची भाषा हीच प्रत्येक धर्माची भाषा असली पाहिजे. प्रत्येक धर्मीयाची भाषा असली पाहिजे. प्रत्येक धर्मातील साधूसंत आणि धर्ममार्तंडांची भाषा सुद्धा प्रेमच असली पाहिजे. “प्रेमाला उपमा नाही हे तो देवाघरचे लेणे” असे कुणा कवीने गाणे लिहिले आहे.ते खरेच आहे. प्रेमाला कोणतीही उपमा नाही. प्रेम हे केवळ प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय असते तर प्रेम म्हणजे प्रेमच असते या व्यतिरिक्त प्रेमाची वेगळी व्याख्या करणे शक्य नाही.
पांडुरंग सदाशिव साने अर्थात सानेगुरुजी
माणूस कितीही शिकला परंतु त्याला जर प्रेमाची भाषा आली नाही तर तो निरक्षरच मानला पाहिजे. आज सुशिक्षितांची संख्या प्रचंड आहे. परंतु प्रेमाच्या संस्काराने संस्कारीत झालेल्या माणसांची संख्या कमी होऊ लागलेली आहे. क्रूरतेने कळस गाठलेला आहे. मत्सराने माणसाची हृदये विदीर्ण झालेली आहेत.कलियुगाचा घोर नंगानाच जणू काही चालू आहे. अशा परिस्थितीत सानेगुरुजींनी सांगितलेला खऱ्या धर्माचा सारांश म्हणजेच खरा धर्म… प्रेमच जगाला तारील. आजच्या जगाला प्रेमाशिवाय तरणोपाय नाही हेच सत्य आहे.