शिक्षणाचे डिजिटायझेशन निबंध Shikshanache Digitization Essay In Marathi

शिक्षणाचे डिजिटायझेशन निबंध Shikshanache Digitization Essay In Marathi

शिक्षणाचे डिजिटायझेशननिबंध Shikshanache Digitization Essay In Marathiया विषयावर आपण या ठिकाणी निबंध लेखन करणार आहोत.

Shikshanache Digitization Essay In Marathi
Shikshanache Digitization Essay In Marathi

शिक्षणाचे डिजिटायझेशन Shikshanache Digitization म्हणजे काय?

शिक्षणाचे डिजिटायझेशन म्हणजे आधुनिक काळातील डिजिटल माध्यमांचा वापर करून शिक्षण पद्धती निर्माण करणे होय. यामध्ये स्मार्ट क्लासरूम, संगणकाचा शिक्षणात वापर, टॅब आणि मोबाईल यांचा शिक्षणामध्ये वापर करणे होय.डिजिटल लर्निंग म्हणजे “तंत्रज्ञानाद्वारे सुलभ शिक्षण जे विद्यार्थ्यांना वेळ, ठिकाण, मार्ग किंवा वेग यावर नियंत्रण ठेवण्याचे काही घटक देते.” शिकणे यापुढे शाळेच्या दिवसापुरते किंवा शाळेच्या वर्षापुरते मर्यादित नाही.

National Farmer’s Day 2023 राष्ट्रीय शेतकरी दिन

सध्याच्या अत्याधुनिक काळामध्ये संगणक हा परवलीचा शब्द बनला आहे. शिक्षणामध्ये संगणकाने प्रचंड क्रांती घडवून आणली आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन होत आहे. डिजिटायझेशन झाल्यामुळे शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम निर्मिती करून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी डिजिटल क्लासरूम तयार करून शिक्षण देणे म्हणजेच शिक्षणाचे डिजिटायझेशन होय.

International Yoga Day 2023:Why Yoga Day Is Celebrated आंतरराष्ट्रीय योग दिवस का साजरा केला जातो?

शिक्षणाचे डिजिटायझेशन का गरजेचे आहे?Shikshanache Digitization Essay In Marathi

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानात प्रचंड क्रांती होत आहे.तंत्रज्ञानात झालेली प्रचंड क्रांती ही डिजिटल स्वरूपामध्ये आलेली आहे. डिजिटल साधने वापरून शिक्षण घेणे काळानुसार अत्यावश्यक बनले आहे.

Technology can become the ‘wings’ that will allow the educational world to fly farther and faster than ever before; if we will allow it.” – Jenny Arledge

शिक्षण हा एकेकाळी गुरुकुलामध्ये घेण्याचा विषय होता. परंतु आता आधुनिक डिजिटल साधनांचा वापर करून शिक्षण घेतले नाही तर तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण स्पर्धेमध्ये टिकणार नाही हे जाणू लागले आहे.

Digitization Of Education In The 21st Century

संगणकाची भाषा ही विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या डिजिटायझेशनमुळे अत्याधुनिक तंत्रे काय असतात आणि त्याद्वारे शिक्षण घेतल्याचे फायदे विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवताना होणार आहेत. म्हणून शिक्षणाचे डिजिटायझेशन गरजेचे आहे.

शिक्षणाच्या डिजिटायझेशनसाठी आज आपला देश सज्ज होताना दिसत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये यावर चर्चा करण्यात आली आहे. केंद्रशासन त्याचप्रमाणे राज्य शासनाने सुद्धा याच गोष्टीवर भर देऊन आर्थिक तरतूद केलेली आहे.

आज प्रत्येक शाळेमध्ये स्मार्ट क्लासरूम निर्माण होत आहेत. डिजिटल स्कूल ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र प्रचंड योगदान देत आहे.

शिक्षणाच्या डिजिटायझेशनचे फायदे

शिक्षणाच्या डिजिटायझेशनचा पहिला फायदा म्हणजे जागतिक डिजिटल क्रांतीमध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थी तयार होतील.

शिक्षणाच्या डिजिटायझेशनमुळे डिजिटल क्रांती शाळेमध्ये असतानाच विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल डिजिटायझेशनमुळे आधुनिक डिजिटल साधने शिक्षणाच्या केंद्रस्थानी येऊन शिक्षण मिळेल.

शिक्षणाच्या डिजिटायझेशन मध्ये डिजिटल क्रांती होत असताना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेले शिक्षण विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये टिकून ठेवण्यास मदत करील. त्यासाठी ई लर्निंग, ई क्लासरूम, ई ग्रंथालय निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सध्याच्या घडीच्या डिजिटल तंत्रज्ञानाशी आंतरक्रिया घडून येतील.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात झाल्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होईल.डिजिटल तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विद्यार्थी आत्मसात करतील त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगामध्ये वावरणे सोपे जाईल.

शिक्षणाच्या डिजिटायझेशनमुळे जगातील कुठल्याही देशातील शिक्षण संस्थेची विद्यार्थी जोडले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणामध्ये प्रगती करताना जागतिक स्तरावर प्लॅटफॉर्म मिळून जाईल.

पारंपारिक शिक्षणापेक्षा डिजिटल शिक्षण हे विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरित करते. त्याचप्रमाणे जगभरातील डिजिटल लर्निंगचे व्यासपीठ मिळवून देते. त्यामुळे विद्यार्थी जागतिकीकरणाला यशस्वीरित्या तोंड देऊ शकतात.

शिक्षणातील डिजिटायझेशनमुळे केवळ शाळा, शिक्षक यांच्याशी विद्यार्थ्यांचा संपर्क येणार नाही तर पालक समाज आणि विविध शैक्षणिक संस्थांत असलेले डिजिटायझेशन विद्यार्थ्यांना आकलन होईल. प्रत्येक व्यवसायाशी निगडित असलेले डिजिटल तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होईल.

शिक्षणातील डिजिटायझेशनचे तोटे

जागतिक स्तरावर डिजिटल क्रांती वेगाने घडत आहे. त्यामुळे पारंपारिक शिक्षणाला फाटा दिला जात आहे. असे असले तरी शिक्षणातील डिजिटायझेशनचे काही तोटे सुद्धा समोर आलेले आहेत.

शिक्षणातील डिजिटायझेशनमुळे विद्यार्थ्यांनी पालक संभ्रमित अवस्थेत आहेत शिक्षणाच्या डिजिटायझेशनमुळे शैक्षणिक संस्था आर्थिक अनुदानाअभावी स्पर्धेत मागे पडत आहेत. म्हणजेच या ठिकाणी आर्थिक तरतुदींचा अभाव असल्यामुळे शैक्षणिक संस्था डिजिटायझेशनला तोंड देण्यास आजही सक्षम नाहीत.

दुर्बल आर्थिक घटकांसाठी शिक्षणातील डिजिटायझेशन परवडणारे नाही.

पारंपारिक शिक्षणामध्ये आंतरक्रिया या गोष्टीला फार महत्त्व आहे. डिजिटल शिक्षण पद्धतीत आंतरक्रियेला फक्त डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडले असल्यामुळे विद्यार्थी समाज घटकांपासून दूर जाईल.

शिक्षणातील डिजिटायझेशनमुळे विद्यार्थ्याला पालक आणि समाजाशी आंतरक्रिया करताना त्याचप्रमाणे समायोजन करताना अनेक अडचणी निर्माण होतील.

शिक्षणातील डिजिटायझेशनमुळे विद्यार्थी हे ग्लोबल होतील. परंतु आपल्या संस्कृती धर्म आणि समाजाशी त्यांची नाळ तुटण्याचा मोठा धोका आहे.
परवडणारे इंटरनेट नसल्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या अभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये डिजिटायझेशनमुळे अडचणी तयार होतील.

शिक्षणाचे डिजिटायझेशन ही संकल्पना ही जागतिकीकरणाचा एक भाग असली तरी विद्यार्थ्यांसाठी आजही डिजिटल साधनांची मर्यादित प्रमाणावर असलेली उपलब्धता हा एक मोठा अडसर ठरण्याची जास्त शक्यता आहे. पालकांची असणारी संगणक निरक्षरता विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडसर ठरू शकते.

सारांश

असे असले तरी 21 व्या शतकातील डिजिटल क्रांतीला सामोरे जाताना शिक्षणाचे डिजिटायझेशन आपण टाळू शकत नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांना डिजिटल तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यासाठी खाजगी क्षेत्रातून मदत झाले तर भारतीय विद्यार्थी हा शिक्षणाच्या आधुनिक डिजिटल साधनांशी समन्वय ठेवून चांगल्या प्रकारे शिक्षणाच्या डिजिटायझेशनला समायोजित करू शकतो.

शिक्षणाचे डिजिटायझेशन निबंध Shikshanache Digitization Essay In Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment