National Farmer’s Day 2023 राष्ट्रीय शेतकरी दिन

National Farmer’s Day 2023
राष्ट्रीय शेतकरी दिन

National Farmer’s Day 2023
राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी साजरा केला जातो. का आणि कशासाठी हा शेतकरी दिन साजरा केला जातो हे आपण National Farmer’s Day 2023 राष्ट्रीय शेतकरी दिन या लेखात पाहूया.

राष्ट्रीय शेतकरी दिन National Farmer’s Day कधी असतो?

भारत देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिनी 23 डिसेंबर रोजी भारतात राष्ट्रीय शेतकरी दिन किंवा राष्ट्रीय किसान दिन साजरा केला जातो.

7 successful ways of Becoming wealthy श्रीमंत होण्याचे सात प्रभावी मार्ग

राष्ट्रीय शेतकरी दिन National Farmer’s Day का साजरा केला जातो?

भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग हे शेतकऱ्यांचे नेते होते शेतकऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला संघर्ष केला. चौधरी चरण सिंग यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरड जिल्ह्यातील नुपूर या गावांमध्ये 23 डिसेंबर 1902 रोजी झाला. चौधरी चरण सिंह हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते 1979 ते 80 या कालखंडात चौधरी चरण सिंहांनी पंतप्रधान पद भूषवले.

माझा आवडता नेता लालबहादूर शास्त्री Maza Avadata Neta Nibandh

या पंतप्रधान पदाच्या कालखंडामध्ये चौधरी चरणसिंहांनी शेतकऱ्यांच्या विषयी अनेक धोरणांना कायदेशीर स्वरूप देऊन मोठे योगदान दिले. भारतातील जवळ जवळ 70 टक्के लोक शेती आणि शेती संबंधाने असणाऱ्या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.त्यामुळे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिन 23 डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून 2001 पासून भारतात साजरा केला जातो.

शेतकरी दिन महाराष्ट्र

चौधरी चरण सिंह कोण होते?


चौधरी चरण सिंह हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते जन्माने शेतकरी होते शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल त्यांना पूर्ण जाणीव होती चौधरी चरण सिंह शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून गणले जातात जमीनदार आणि धनदांडग्यांच्या विरोधात त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा दिला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अनेक पुस्तके ही लिहिली शेतकऱ्यांच्या समस्या या राष्ट्रीय व्यासपीठावर आणण्याचे मोठे कार्य चौधरी चरण सिंह यांनी एक शेतकरी नेता म्हणून केलेले आपल्याला इतिहासात दिसून येईल शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी चौधरी चरण सिंहांनी खूप प्रयत्न केले एवढे मोठे पंतप्रधानपद असूनही त्यांनी अतिशय साधे जीवन व्यतीत केले.

चौधरी चरणसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भूषवले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी जमीनदारी पद्धत रद्द केली आणि शेतकऱ्यांना मोठा दिला. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचार आणि शोषणाविरुद्ध चौधरी चरणसिंह यांनी संसदेत आपला आवाज बुलंद केला. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बाजू संसदेसारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर मांडणारे सरळ चौधरी चरणसिंह हे एकमात्र शेतकऱ्यांचे नेतृत्व दिसून येते.

शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत?

संपूर्ण भारत हा कृषिप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये 70% च्या आसपास लोक शेती आणि संबंधित व्यवसायावर आपला चरित अर्थ चालवतात परंतु नैसर्गिक संकटे आणि सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना आपले जीवनमान उंचावण्यासाठी फार मोठे कष्ट करावे लागतात खरे तर शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याला अन्नदाता असे आपण म्हणतो बळीराजा म्हणूनही शेतकऱ्याला गौरवले जाते परंतु शेतमालाला बाजार नसणे आणि नैसर्गिक संकटांच्या वेळेला सरकारची पुरेशी मदत न मिळणे यामुळे शेतकरी गरिबीत दिवस काढत आहेत शेतकऱ्यांना आपल्या शेतासाठी वेळेवर बी बियाणे मिळत नाहीत खतांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत शेतीमध्ये उत्पादन घेणे शेतकऱ्यांना आज मोठ्या भांडवली गुंतवणुकीमुळे शक्य होत नाही परिणामी शेतकऱ्याचे शोषण सगळ्या बाजूने होत आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत?

शेतमालाला बाजार नसणे ही शेतकऱ्यांची फार मोठी समस्या झाली आहे. सरकारची शेतीविषयक धोरणे शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याकडे पुरेसा पैसा न आल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या दैनंदिन गरजा भागवणे, कुटुंबातील आपल्या मुला मुलींचे शिक्षण, विवाह करणे अतिशय जिकरीचे होत आहे. खाजगी सावकार आणि बँकांच्या गरजांच्या हप्त्याच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रास होतो.

शेतकऱ्यांच्या मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करणे खूप कठीण असते. शेतकरी मानसिकदृष्ट्या खचत आहेत. त्यामुळे शेतकरी या सगळ्यातून सुटण्यासाठी आत्महत्येचा पर्याय निवडतो. हे अतिशय दुर्दैवी आहे. परंतु हा पर्याय एक पळवाट आहे. चौधरी चरणसिंह यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने नेतृत्व करणारे नेते आहे त्यांच्या पाठीशी उभे राहून आपला आवाज बुलंद केला पाहिजे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या पक्ष आणि संघटनांना शेतकऱ्यांनी अद्दल घडवली पाहिजे.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची का आहे?

आर्थिक साक्षरता ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आर्थिक साक्षरतेमुळे शेतकरी निश्चितच आपला कुटुंबाचा आर्थिक व्यवस्थापनाचा गाडा व्यवस्थित हाकू शकतात. त्याचप्रमाणे सकारात्मक धोरण ठेवून आपले जीवन पुढे नेले पाहिजे. सरकारच्या योजनांचा फायदा उठवला पाहिजे. बाजार आणि बाजारपेठांमधील व्यवस्था अन्यायकारक असेल तर लढा दिला पाहिजे. त्याचप्रमाणे बाजारपेठांचा अभ्यास करून पीक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते. आपल्या दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण, त्यांचे विवाह सुद्धा शेतकऱ्यांना यामुळे व्यवस्थित करता येणे शक्य होईल.

शेतकऱ्यांसाठी सरकार आणि इतरांनी काय केले पाहिजे?

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त एवढेच सांगा सांगावेसे वाटते की शेतकऱ्यांच्यासाठी स्वतंत्रपणे अर्थसंकल्प मांडला जावा. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सर्व पक्षातील सर्व स्तरातील नेतृत्वाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजावून घ्याव्यात. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना सहकार्य करून शेतकऱ्यांचा आर्थिक ताळेबंद चांगल्या प्रकारे कसा होईल यासाठी मार्गदर्शन करावे.

शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया उद्योग उभारून शेतकऱ्यांना चार पैसे कसे भेटतील हे पाहिले पाहिजे. केवळ भाषणे झोडून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काही बदल होत नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. केवळ शहरी भागातील मतदारांवर लक्ष ठेवून आपली धोरणे राजकीय पक्षांनी ठेवू नयेत.

इडा पिडा टळो शेतकऱ्यांचे राज्य येवो.

इडा पिडा टळो आणि बळीचे म्हणजेच शेतकऱ्यांचे राज्य येवो असे दिवाळीच्या वेळी म्हटले जाते. शेतकरी हा राजा आहे असे म्हटले जाते. परंतु या बळीराजाला आपल्या बळाने अनेक पक्ष, सरकारे फसवत असतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. तर आणि तरच शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये काहीतरी उंची निर्माण होईल. शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment