लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निबंध Labhale Amhas Bhagya Bolato Marathi Nibandh

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निबंध Labhale Amhas Bhagya Bolato Marathi Nibandh

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निबंध Labhale Amhas Bhagya Bolato Marathi Nibandh मित्रांनो आज या लेखात,”लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या कविवर्य सुरेश भट यांच्या या ओळींचा भावार्थावर चर्चा करणार आहोत. हा लेख किंवा निबंध निश्चितच आपणास मराठी भाषेच्या थोरवी बद्दल माहिती देईल.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

तमाम मराठी भाषिक बांधवांना अतिशय अभिमानाने गाता यावे… सहज सहज म्हणता यावे असे हे अत्यंत रसपूर्ण आणि मराठी भाषेची थोरवी गाणारे अद्भुत असे कविवर्य सुरेश भट यांचे गीत आहे. जिथे जिथे म्हणून जगात मराठी भाषिक व्यक्ती आहे तिथे प्रत्येक व्यक्तीने अतिशय अभिमानाने… प्रेमाने हे गीत गावे आणि आपल्या मराठी असल्याचा अभिमान सार्थपणे बाळगावा इतके सामर्थ्य या गीतामध्ये आहे.

स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी संपूर्ण कविता वाचण्यासाठी क्लिक करा.

मराठी भाषेची थोरवी आणि गौरव संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकामध्ये सांगितला. त्यापूर्वीही कवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधू नावाचा असामान्य ग्रंथ लिहून मराठी भाषेचा एक प्रकारे गौरवच केला होता. मराठी भाषा ही अभिमानाने मिरवावी आणि स्वाभिमानाने जोपासावी अशीच भाषा आहे. अहो आम्हाला भाग्य लाभले की आम्ही जन्मजात मराठी भाषा बोलत आहोत. मातृभाषा म्हणून मराठी आम्हाला अत्यंत प्यारी आहे.नव्हे नव्हे तर मराठी भाषा ही आमचा ज्वलंत अभिमान आहे.

लाभले भाग्य आम्हांस संपूर्ण गीत

आमच्या सर्वच गोष्टी मराठीतून होतात. उठता बसता कार्य करता प्रत्येक वेळी मराठी शब्दांचा उच्चार करताना आमच्या तोंडातून रसाळ अशी शब्दांची मालिका बाहेर पडताना जणू काही अमृताचा धबधबा उंच फत्तरावरून खाली पडत आहे की काय असेच वाटते. आमचे कान धन्य आहेत. कारण आम्हाला मराठी भाषा येता-जाता ऐकायला मिळते. आम्ही इतके सुदैवी आहोत की मराठी भाषा आमच्या कानावर पडते आणि आमचे कान अत्यंत मधुर अशा भाषारसाने तृप्त होतात.

आमच्याकडे कोणत्याही जाती नाहीत.. धर्म नाहीत.. पंथ नाहीत…आमच्याकडे एकच धर्म आहे… एकच जात आहे… एकच पंथ आहे तो म्हणजे आम्ही मराठी भाषिक आहोत आणि याचा जाज्वल्य अभिमान आम्हाला आहे. अभिमानाने उर भरून यावा अशीच आमची मातृभाषा मराठी आहे.

मराठी ही आमची माय माऊली आहे.अहो एवढे मोठे जग आहे. अब्जावधी लोकांची संख्या आहे. शेकडो भाषा आहेत.त्या भाषा बोलणारी कोट्यवधी मुखे आहेत. परंतु आमच्या मुखातून एकच एक भाषा बाहेर पडते. ती म्हणजे मराठी… मराठी आणि मराठी होय. म्हणून एवढ्या जगामध्ये आम्हाला एकच माय आहे ती म्हणजे मराठी. म्हणूनच आम्ही म्हणतो एवढ्या जगात आम्हाला मानण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे माय मराठी!

आज पाश्चात्य जगाचा विचार केला तर भाषेला एक केवळ व्यवहाराचे साधन म्हणून ते लोक मानतात. पण आम्ही मराठी भाषिक लोक आमच्या मातृभाषेला आई म्हणतो व मानतो. हे किती महानतम श्रेष्ठ विचार आहेत. विचाराने आम्ही श्रेष्ठ आहोत. कारण आमच्याबरोबर मराठी आहे.आमची माय मराठी आहे.

मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. एकेकाळी ती राजभाषा नव्हती. राजभाषा होती ती इंग्रजी कधी फारशी कधी अरबी. परंतु आमच्या छत्रपती शिवरायांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. दरम्यानच्या काळात ब्रिटिशांचे राज्य आले. तरीही आम्ही मराठीला विसरलो नाहीत. या उलट मराठी भाषेमध्ये अत्यंत कसदार, जोमदार आणि भरगोस साहित्यरुपी समृद्ध पीक उगवले आणि मराठी भाषा अधिकच शक्तिशाली आणि श्रीमंत झाली.

आज जगभरात मराठी भाषिक लोक मराठी भाषेचा अभिमान मिरवत आपल्या कर्तृत्वाचा पराक्रम गाजवत आहेत. आज सुमारे सव्वा 11 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. जगातील दहाव्या क्रमांकाची ही भाषा आहे. दरवर्षी हजारो पुस्तके मराठी भाषेत प्रसिद्ध होतात. कोट्यवधी रूपयांची उलाढाल या निमित्ताने होते. शेकडो मासिके, साप्ताहिके, पाक्षिके, वार्षिक नियतकालिके आणि दररोज शेकडो वर्तमानपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित होतात आणि यातून अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. मराठी जगत हे काही सामान्य नाही तर ते असामान्य असे मराठी स्वाभिमानी जगत आहे.

कविवर्य सुरेश भट अतिशय गौरवपूर्ण भाषेमध्ये आपले हे गीत मराठी भाषिकांपुढे सादर करतात. मराठी भाषिक अतिशय अभिमानाने हे गीत म्हणतो. मराठी भाषेचे हे गौरव गीत प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीला अभिमान वाटावे असेच आहे. मराठीचा अभिमान आपल्या छातीच्या कोटामध्ये भरून एखाद्या बुरुजावरती उभ्या राहिलेल्या छत्रपती शिवरायांच्या कडवट मावळ्याप्रमाणे आज मराठी भाषिक व्यक्तीने मराठी भाषा सांभाळली पाहिजे. शक्य तिथे तिचा बचाव करून मराठी बाणा दाखवून दिला पाहिजे.

मराठी कणा किती ताठ आहे हे या जगाला दाखवून दिले पाहिजे. त्यासाठी मराठी भाषेचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. केवळ अभिमानच नाही तर तिचा प्रत्येक प्रसंगी वापर करून आम्ही मराठी भाषिक ताठ कण्याचे कसे आहोत हे जगाला कृती उक्तीतून दाखवून दिले पाहिजे.असेच मला या ठिकाणी म्हणावेसे वाटते.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment