स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी संपूर्ण कविता Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari Kavita

स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी

Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari Kavita

कवी यशवंत मनोहर यांनी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari Kavita ही कविता लिहिली आहे. कवी यशवंत हे कवी लेखक आणि समीक्षक म्हणून मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत.

कवी यशवंत यांची स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही अतिशय प्रसिद्ध पावलेली एक भावस्पर्शी कविता किंवा गीत आहे. हे गीत अनेकांना हवे असते त्यासाठी या ठिकाणी देत आहोत.

Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari Kavita

स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी संपूर्ण कविता

आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे

स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी कविता Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari Kavita ही कविता आपणास निश्चितच आवडले असेल.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी निबंध

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या कवितेचे कवी आदरणीय कवी यशवंत मनोहर यांचे स्वतःचे संकेतस्थळ आहे खालील लिंक वर जाऊन आपण या संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती मिळू शकता.

कवी यशवंत मनोहर संकेतस्थळ

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment