भारताची पंचाहत्तर वर्षांतील वैज्ञानिक प्रगती निबंध India’s scientific progress in seventy-five years

भारताची पंचाहत्तर वर्षांतील वैज्ञानिक प्रगती India’s scientific progress in seventy-five years

भारताची पंचाहत्तर वर्षांतील वैज्ञानिक प्रगती India’s scientific progress in seventy-five years याविषयी आपण निबंध या ठिकाणी वाचणार आहोत.

India's scientific progress in seventy-five years
Image Unsplash

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले स्वातंत्र्यपूर्व काळ हा गुलामगिरीचा असल्यामुळे वैज्ञानिक किंवा अन्य कोणत्याही प्रगतीचा विचार केला तर प्रगती साधने अत्यंत खडतर आव्हान होते. असे असले तरी सी. व्ही.रामन, जगदीशचंद्र बोस,रामानुजन, शंकर आबाजी भिसे यासारख्या अनेक शास्त्रज्ञांनी जगाच्या वैज्ञानिक इतिहासावर आपले नाव कोरले आहे.(India’s scientific progress in seventy-five years)

शिक्षणाचे डिजिटायझेशन निबंध Shikshanache Digitization Essay In Marathi

तरीही भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने वैज्ञानिक प्रगतीसाठी फार मोठे मैलाच दगड गाठत भारत आज एक वैज्ञानिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारताच्या या स्वातंत्र्योत्तर काळातील वैज्ञानिक प्रगतीचा आढावा आणि मागोवा आपण घेतला पाहिजे. काय केले आहे आणि काय करायला पाहिजे याचा दिशादर्शक ठरवला गेला पाहिजे.(India’s scientific progress in seventy-five years)

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भरारी

आज 21 व्या शतकातील स्वातंत्र्योत्तर काळातील 75 वे वर्ष हे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत. प्राचीन काळापासून भारत देश गणित, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, स्थापत्य, संगीत इत्यादी विषयांमध्ये प्रगती करत आला आहे.अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य होते. चरक,सुश्रुत,नागार्जुन, आर्यभट्ट, भास्कराचार्य यासारख्या वैज्ञानिकांनी आपापल्या क्षेत्रात क्रांतिकारक शोध लावले होते.

आयुर्वेद आणि योगासनांनी आज जगाला आरोग्यदायी जीवनशैली कशी प्राप्त करता येते याची दिशा दिली आहे. सुश्रृतासारख्या महान वैद्यकाने प्लॅस्टिक सर्जरी, मोतीबिंदू, अवयव प्रत्यारोपण या क्षेत्रात जगात पहिल्यांदा काम केले. भास्कराचार्यांनी लीलावतीसारखा महान ग्रंथ लिहून भारत गणितात पुढे नेला. शून्य ते नऊ अंकांचा शोध भारताने लावला. शून्याचा शोध वरामीहिराने लावला नागार्जुनाने रसायनशास्त्रात अनेक प्रयोग करून प्रगती केली.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर सी व्ही रामन यांनी रामन इफेक्ट हा महत्त्वपूर्ण शोध लावून बहुतेक शास्त्राचे आशिया खंडातील पहिले नोबेल पारितोषिक जिंकले. शंकर आबाजी भिसे यांना भारताचे एडिसन म्हणतात. त्यांचेही शोध जगाने वाखाणले. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना भावना असतात हा महत्त्वपूर्ण शोध लावला. त्याचप्रमाणे बिनतारी संदेश पाठवण्याची किमया करून दाखवली. 1860 यावर्षी जमशेदजी टाटा यांनी लोखंड पोलाद यांचा कारखाना काढला. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी तत्कालीन भारतामध्ये अनेक मोठमोठी धरणे स्वतःच्या प्रतिभाशाली बुद्धीने बांधली. ती आजही देशाला फलदायी ठरत आहेत. अनेक ठिकाणी वैज्ञानिक प्रगतीचे वारे वाहत होते.

अशी काही प्रगती स्वातंत्र्यपूर्व काळात होत असताना भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्योत्तर काळात वैज्ञानिक प्रगतीचा पाया घालणाऱ्या अनेक संशोधन संस्था भारत सरकारने उभारल्या. यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक प्रगती शिवाय देशाला गत्यंतर नाही हे जाणून आर्थिक स्थिती कमजोर असतानाही वैज्ञानिक संशोधन संस्था स्थापन केल्या.त्यामुळे आज भारत फलस्वरूप म्हणून विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे.

प्राचीन यशापासून ते चांद्रयान प्रक्षेपित करण्यापर्यंत भारताचा मोठा इतिहास आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या असंख्य कामगिरीमुळे भारताला ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 मध्ये 40 वे स्थान प्राप्त झाले आहे.अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी निर्देशक 2022 च्या अहवालानुसार, वैज्ञानिक प्रकाशनांच्या क्षेत्रात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अर्थातच भारताच्या वैज्ञानिक प्रगतीने जग आज अचंबित झाले आहे.

स्वातंत्र्योत्तर 75 वर्षात भारताने केलेल्या विविध वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीचा आपण धावता आढावा घेऊया.

भारताचे संरक्षण क्षेत्रातील नेत्रदीपक यश

भारताचे संरक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान आहे 1974 या वर्षी भारताने पोखरण या ठिकाणी अणुस्फोट करून निवडक अण्वस्त्रधारी देशांमध्ये स्थान मिळवले. इस्रो आणि डीआरडीओ या संस्थांनी क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये प्रचंड प्रगती करून आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे. अग्नी पृथ्वी एक क्षेपणास्त्रे शत्रूच्या गोटात धडकी भरवत आहेत

भारत हा संरक्षण क्षेत्रावर खर्च करणारा जगातील तिसरा मोठा देश आहे. भारताचे हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे हवाईदल आहे. भारताच्या हवाई दलामध्ये राफेल सुखोई मिग, सारस यासारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत. भारताने अग्नीवीर सारखे सैन्यदल उभारले आहे. फायर पॉवर रँकिंगच्या अहवालानुसार जगामध्ये 133 देशांपैकी भारताचे सैन्यदल चौथ्या क्रमांकावर आहे.

भारताचे नौदल अतिशय प्रभावी असून दक्षिणात आशियातील ते पहिल्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलामध्ये अनेक मोठमोठे लढाऊ जहाजे आणि अण्वस्त्रधारी पाणबुड्या भारताकडे आहेत. भारताच्या नौदल प्रगतीचा धक्का चीन सारखे देश सुद्धा घेतात. चीन वगळता पाकिस्तान विरुद्ध झालेली सर्व युद्धे भारताने जिंकलेली आहेत.सर्वच प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांनी आज भारताचे नौदल, वायुदल आणि भूदल जागतिक स्तरावर उच्च ठिकाणी आहे.

वैद्यक क्षेत्रातील भारताचे यश

प्राचीन काळापासून भारत वैद्यकशास्त्रामध्ये मोठी प्रगती करीत आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताने वैद्यक क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालय भारतीयांना आज वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान देत आहेत. भारतीय डॉक्टर जगातील सर्व देशात उत्तम कामगिरी बजावत आहेत. जगातील प्रगत देशांचा विचार करता भारतातील वैद्यक सेवा अतिशय स्वस्त असून सर्वसामान्यांना परवडणारी आहे. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया भारतामध्ये आज होतात. त्या सुद्धा अगदी परवडणाऱ्या दरात.

पोलिओ, देवी, पिवळा ताप यासारख्या रोगांचे उच्चाटन भारताने यशस्वीरित्या केले आहे. एम्ससारख्या हॉस्पिटलची निर्मिती करून वैद्यक क्षेत्रात भारत कामगिरी बजावत आहे. भारताचा वैद्यकीय क्षेत्रातील वाढीचा दर 18% आहे. विविध प्रकारच्या लशींची निर्मिती जगाच्या पाठीवर भारतात मोठ्या प्रमाणावर होते.

अनेक देश भारताच्या औषध निर्मितीवर अवलंबून असतात कोरोना काळामध्ये याची प्रचिती जगाला आलेली आहे. भारताने तयार केलेली कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही कोरोनावरील लस जगभरात निर्यात केली गेली. इतर प्रगत देशातील कोरोना लसींपेक्षा भारतीय कोविशिल्ड आणि को वॅक्सिन या लसी अधिक चांगल्या रीतीने प्रभावी ठरल्या आहेत.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील यश:

21 वे शतक हे माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल क्रांतीचे शतक आहे.भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक प्रकारचे विक्रम प्रस्थापित केले आहेत. परम महासंगणक हा सुपर कॉम्प्युटर मोठ्या मोठ्या महासत्तांची मक्तेदारी असूनही निर्माण केला सुपर कॉम्प्युटर तयार करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आज भारतात शिकलेले माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ प्रगत देशांमध्ये सुद्धा मोलाची कामगिरी बजावत आहेत. उदाहरण म्हणून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे नाव घेता येईल.

सुपर कॉम्प्युटर, क्वाॅन्टम कॉम्प्युटर,फाईव्ह जी नेटवर्क, इ गव्हर्नन्स, डिजिटल अर्थव्यवस्था, शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल क्रांती, डिजिटल बँकिंग या सर्व क्षेत्रात भारताने नेत्रदीपक प्रगती केली आहे. सुपर कॉम्प्युटरचे ध्येय गाठताना परम महासंगणक डॉक्टर विजय भाटकर यासारख्या संगणक शास्त्रज्ञाने निर्माण केला. यामध्ये सीडॅकसारखी संस्था आणि त्यामधील संगणकतज्ञ यांनी फार मोठी भूमिका बजावली. इस्रोसारख्या संस्थेने शेकडो उपग्रह अवकाशात स्थापित केले आहे. अमेरिकेसारखा देश सुद्धा इस्रोच्या मदतीने आपले उपग्रह आकाशात पाठवत आहे. म्हणजेच भारताचे आंतरराष्ट्रीय दळणवळण व संदेशवहन क्षेत्रात महासत्ता म्हणावे एवढे मोठे प्राबल्य निर्माण झाले आहे.

भारताचे आयटी क्षेत्रातील प्रगती निश्चितच जगाला दिशा दाखवत आहे.विप्रो, टीसीएस, इन्फोसिस, टेक महिन्द्रा सारख्या औद्योगिक क्षेत्रातील आयटी कंपन्या जगातील आयटी क्षेत्रावर आपला प्रभाव टाकत आहेत. आयटी क्षेत्रामध्ये भारतात प्रचंड रोजगार निर्मिती झालेली आहे. आऊटसोर्सिंग करून भारतीय प्रगत देशांच्या प्रगतीमध्ये वाटा उचलत आहेत. आयटी क्षेत्र भारतात विकसित असल्याचे हे द्योतक आहे.

कृषी क्षेत्रातील यश

भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय लोक अन्नधान्यांच्या बाबतीत इतर देशांवर अवलंबून होते. भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा देऊन कृषी क्षेत्राला दिशा दिली. हरितक्रांती, धवलक्रांती/ श्वेतक्रांती, नीलक्रांती यासारख्या कृषी क्षेत्रातील क्रांतिकारक बदलांनी भारताने कृषी क्षेत्रातील समृद्धी गाठली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

एकेकाळी धान्य आयात करणारा भारत आज जगाला धान्य निर्यात करतो. दुग्धोत्पादन क्षेत्रात भारत जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनला आहे. कापसासारख्या पिकामध्ये भारताने प्रगती केली असून अनेक संकरित जाती निर्माण केल्या आहेत. आज भारत या क्षेत्रात स्वयंपूर्ण आहे. अनेक प्रकारची कडधान्य आणि फळपिके यामध्ये भारतामध्ये प्रचंड मोठे क्षेत्र वाढले आहे.

परजीवी शेती, फलन, कृत्रिम बियाणे, जनुकीय सुधारित बियाणे यामध्ये भारतीयांनी वैज्ञानिक प्रगती करून अचंबित करणारी प्रगती केली आहे.रासायनिक खतांची निर्मिती आणि वापर यामध्ये भारत जगभरात चौथ्या क्रमांकावर आहे. एकेकाळी कृषी प्रधान अर्थव्यवस्था असलेला देश आज मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून सुद्धा कृषी क्षेत्रात वैज्ञानिक शोधांच्या जोरावर मोठी कामगिरी बजावत आहे.

अंतराळ क्षेत्रातील यश

स्वतंत्र भारतामध्ये अंतराळ क्षेत्रातील प्रगतीची मुहूर्तमेढ आणि शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांनी रोवली. मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे क्षेत्रात प्रचंड मोठी योगदान आहे. आज भारताने पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही ही अंतराळ प्रक्षेपक वाहने निर्माण केली आहेत. भारताचे चांद्रयान अवकाशात झपावले त्यावेळी संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या अवकाश क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगती कडे होते भारतात चांद्रयान आणि मंगलयान मोहिमा राबवत आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी संशोधन करून चंद्रावर पाणी आहे हा शोध लावला. आता चांद्रयान दोन प्रगतीपथावर आहे.विविध प्रकारची अवकाशयाने निर्माण करण्याची क्षमता भारताकडे आहे. इस्रो सारखी संस्था यामध्ये आपले मध्यवर्ती भूमिका बजावत आहे. भारताने जवळजवळ 70 देशांचे उपग्रह अवकाशामध्ये स्थापित केले आहेत. हवामान अंदाज यंत्रणा संदेशवहनियंत्रणा यामध्ये भारतात विकसित देशांशी स्पर्धा करीत आहे.

उपग्रह प्रक्षेपणाच्या बाबतीत भारत जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.भारतीयांनी आणि जगातील इतर देशांनी निर्माण केलेले उपग्रह हे भारताच्या अवकाश क्षेत्रातील प्रगतीचे यश म्हणावे लागेल.

शैक्षणिक क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगती

शिक्षण क्षेत्राचा विचार करता भारत आज या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर खूप मोठी भूमिका बजावत आहे. कोट्यवधी विद्यार्थी भारतामध्ये शिक्षण घेत असताना डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत. आयआयटी, एम्स, विविध इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट यासारख्या संस्थांनी भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी योगदान दिलेले आहे.

भारतामध्ये आज शिक्षणाचे डिजिटायझेशन होत आहे. मोठ्या प्रमाणावर स्मार्ट क्लासेस, ई लर्निंग,रिमोट लर्निंग, आयसीटी, संगणक शिक्षण विद्यालयीन पातळीवर दिले जात आहे.त्यामुळे आधुनिक जगाशी जोडणाऱ्या डिजिटल क्रांतीला भारताचे विविध मार्गाने साथ लाभत आहेत. डिजिटल क्रांतीला योगदान देणारे कुशल मनुष्यबळ शाळा आणि महाविद्यालयांमधून निर्माण होत आहे.भारतातील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय सर्वच क्षेत्रातील कंपन्यांना त्याची सहायता लाभत आहे.

विद्युत निर्मिती आणि वितरण

भारताने विद्युत निर्मिती क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे.भारतातील सर्वच खेड्यांमध्ये आज वीज पोहोचली आहे अनेक मोठमोठे धरणे बांधून जलविद्युत प्रकल्प राबवले. अणूविद्युत सौर एनर्जी पवन ऊर्जा या क्षेत्रात भारताने आश्चर्यकारक प्रगती करून भारताला विद्युत निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण बनवले आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सर्वदूर विजेचे वितरण केले आहे.विद्युत निर्मितीने औद्योगिक त्याचप्रमाणे शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान देऊन भारताला प्रगतीपथावर नेले आहे.

दळणवळण क्षेत्रातील यश

भारताने दळणवळण क्षेत्रातही वैज्ञानिक प्रगती केली आहे हवाई वाहतूक रेल्वे मार्ग महामार्ग मोठ्या प्रमाणावर देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. भारतामध्ये रेल्वेचे जाळे प्रचंड मोठ्या प्रमाणात असून जगातील देशांचा विचार करता भारतीय रेल्वे ही क्रमांक एकचा रोजगार दाता आहे.

देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आज विमान वाहतूकही होत आहे.अनेक भारतीय विमान वाहतूक कंपन्या परस्परांशी स्पर्धा करून भारतीय नागरिकांना सेवा देत आहेत. भारतात बुलेट ट्रेन सारखे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या तयारीत आहे.

सारांश

थोडक्यात सांगायचे झाले तर भारत आज केवळ 75 वर्षाच्या भारताची पंचाहत्तर वर्षांतील वैज्ञानिक प्रगती निबंध India’s scientific progress in seventy-five years स्वातंत्र्योत्तर 75 वर्षाच्या कालखंडामध्ये जगातील एक महत्त्वाची वैज्ञानिक महासत्ता झाला आहे.भारताने विविध क्षेत्रात भारतीयांनी वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर मैलाचे ऐतिहासिक दगड गाठले आहेत. ही वैज्ञानिक प्रगती भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखे सुवर्णयुग आहे. भारताची 75 वर्षातील वैज्ञानिक प्रगती ही परकीयावर अवलंबून न राहता स्वयंसिद्ध आहे.

भारताच्या या वैज्ञानिक प्रगतीने जगभरातील प्रगत प्रगत देशांचे डोळे दिपले आहेत. प्रगत देशांनी आणि भारताच्या हितशत्रूंनी अनेकदा यामध्ये अडथळे आणले.तरीही भारताने आपले वैज्ञानिक ध्येये गाठताना आपला स्वाभिमान जपला. आज भारत क्रायोजनिक इंजिन, सुपर कॉम्प्युटर,त्याचप्रमाणे उपग्रह दळणवळण या क्षेत्रात स्वावलंबी आहे.

सर्वच स्तरात झालेली भारताची वैज्ञानिक प्रगती स्वातंत्र्याच्या 75 या वर्षांमध्ये अचंबित करणारी असली तरी अजूनही देशाला अनेक क्षेत्रे खुणावत आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत ही घोषणा भारताला निश्चितच जगातील सर्वच क्षेत्रातील प्रगतीचा उच्चांक गाठण्यास मदत करेल. चौदाशे वर्षांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रगत असणारा आपला भारत निश्चितच ते स्थान पुन्हा पटकावेल यामध्ये मला काही शंका वाटत नाही.

भारताची पंचाहत्तर वर्षांतील वैज्ञानिक प्रगती निबंध India’s scientific progress in seventy-five years हा निबंध आपल्याला नक्कीच आवडला असेल. यातील अनेक मुद्द्यांचा विचार करून आपण आपल्या भाषेत निबंध लिहू शकता किंवाभारताची पंचाहत्तर वर्षांतील वैज्ञानिक प्रगती निबंध India’s scientific progress in seventy-five years हा निबंध विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी वापरू शकता.India’s scientific progress in seventy-five years.India’s scientific progress in seventy-five years

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment