महाकवी कालिदास दिन का साजरा करतात Mahakavi Kalidas Din

महाकवी कालिदास दिन का साजरा करतात Mahakavi Kalidas Din

Mahakavi Kalidas Din

महाकवी कालिदास दिन Mahakavi Kalidas Din कधी साजरा केला जातो?आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन Mahakavi Kalidas Din म्हणून अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. महाकवी कालिदास हे अभिजात भाषा संस्कृत साहित्यात फार मोठे योगदान देणारे नाटककार, महाकवी होऊन गेले. महाकवी कालिदास किंवा नाटककार कालिदास हा भारतीय संस्कृतीचा महान ठेवा आहे.

National Farmer’s Day 2023 राष्ट्रीय शेतकरी दिन

इसवी सन पूर्व काळातील उज्जैन येथील राजा विक्रमादित्य… या राजाच्या ऐतिहासिक कालखंडादरम्यानच कालिदासाचा कालखंड मानला जातो. याच काळामध्ये कालिदासाने पौराणिक कथा आणि काही तत्कालींन कथा त्याचप्रमाणे राजपुरुष यांच्या आधारावर काव्य आणि नाटक या संस्कृत रचना केल्या. या गोष्टीला जवळ जवळ दोन हजार वर्षे पूर्ण झाली. शेकडो वर्ष पूर्ण होऊनदेखील कालिदासाच्या साहित्यकृतींबद्दल केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरामध्ये आकर्षण असावे यातच कालिदासाचे महत्त्व किती आहे हे लक्षात येते.

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रिडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श ।।
पुरा कवीनां गणनाप्रसंगे
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा:।
अद्याSपि तत्ततुल्यकवेरभावात्
अनामिका सार्थवती बभूव।।

कालिदासासारखा प्रख्यात आणि प्रतिभावंत नाटककार कवी कालिदासानंतर अनेक शतके मागे पडली तरी झाला नाही. इतकी कालिदासाच्या साहित्य प्रतिभेची उंची आहे. आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा या महाकवी, प्रतिभावंत रचनाकार, नाटककार, साहित्यकाराचा “महाकवी कालिदास दिन” म्हणून भारतीय संस्कृती मानणारे लोक अतिशय आनंदाने आणि गौरवाने साजरा करतात.

कालिदास आणि दंडी यांच्यातील श्रेष्ठ कवी कोण, हा प्रश्न दोघांनीही माता सरस्वतीसमोर ठेवला. सरस्वतीने उत्तर दिले, दंडी. दुःखी कालिदासाने विचारले, “म्हणजे आई मी काही नाही”? आईने उत्तर दिले, “त्वमेवाहम्, म्हणजे तू आणि मी दोघे एकच आहोत.”

महाकवी कालिदास आणि नाटककार विल्यम शेक्सपियर

महाकवी कालिदास आणि पाश्चिमात्य नाटककार विल्यम शेक्सपियर यांचे अनेकदा तुलना होते. विल्यम शेक्सपियरला पश्चिमेचा कालिदास तर कालिदासाला पूर्वेचा शेक्सपियर असे म्हटले जाते. परंतु कालिदासाच्या प्रतिभेचा विचार करता ही तुलना योग्य नाही असेच वाटते.असे असले तरी कालिदासाचे महत्त्व पश्चिमेतील लोकांना पटले… जाणवले यात काही कमी नाही. गटे सारखा जर्मन प्रतिभावंत शाकुंतलासारखे नाटक वाचल्यानंतर तो शाकुंतलाला डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचला यातच कालिदासाचे महत्त्व लक्षात येईल.

कालिदास संस्कृत भाषा के प्रसिद्ध कवि एवं लेखक – विकिपीडियावर वाचा.

महाकवी कालिदासाच्या साहित्याची तुलना जगातील कोणत्याही साहित्याची होऊ शकत नाही महाकवी कालिदासाचे महाकाव्य रचना आणि नाटके अतुलनीय आहेत महाकवी कालिदासाच्या साहित्यामध्ये रघुवंश, कुमारसंभव,मेघदूत, ऋतुसंहार,अभिज्ञानशाकुंतलम्, विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्निमित्रम् या प्रमुख साहित्य कृतींचा समावेश होतो.

महाकवी कालिदासांच्या साहित्यकृती Literature Of Kalidasa

महाकवी कालिदासाने दोन महाकाव्ये दोन खंड काव्ये किंवा गितीकाव्ये आणि तीन नाटके लिहिली.

रघुवंशम् Raghuvansham


महाकवी कालिदासाचे रघुवंशम हे एक प्रसिद्ध महाकाव्य आहे यामध्ये कुळातील अयोध्येचा राजा रघु याबद्दल काव्य लिहिलेले आहे रघुवंशाची संपूर्ण माहिती अतिशय काव्यरूपात लिहिलेली आहे यामध्ये एकूण 19 वर्ग आहेत.

कुमारसंभवम् Kumarsambhavam

कुमारसंभवम् 17 सर्ग महाकाव्य आहे. यामध्ये शंकर-पार्वतीचा पुत्र कार्तिक स्वामी यालाच कार्तिकेय किंवा कुमार म्हणतात. याच कार्तिक स्वामीने तारकासुराचा वध केला. परंतु कार्तिक स्वामींच्या जन्माची जी कथा आहे म्हणजेच कुमारसंभवम् या नाटकाची जी मध्यवर्ती कथा आहे ती अतिशय अद्भुत आणि प्रत्ययकारी भाषेमध्ये कालिदासाने कुमारसमभावांना महाकाव्यात वर्णन केली आहे.

महाकवी कालिदासाची खंडकाव्ये
प्रथम खंडकाव्य- मेघदूत Meghdoot


कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य या प्रकारात येणारी रचना आहे खंडकाव्याला गीतिकाव्य असेही म्हणतात. मेघदूत या खंड काव्यामध्ये यक्ष आणि यक्षिणी यांच्या विरहाची कथा अतिशय मनमोहक भाषेमध्ये शृंगार रस आणि उपमा यांचा यथोचित वापर करून कालिदासाने लिहिलेली आहे. मेघदूत हे मोठे काव्य आहे. मेघदूताचे मेघदूत पूर्व भाग आणि मेघदूत उत्तर भाग असे दोन भाग आहेत.

दुसरे खंडकाव्य- ऋतुसंहार Ritisanhar

भारतीय संस्कृतीमध्ये सहा ऋतू मानले जातात या सहा ऋतूंचं वर्णन करणारे खंड काव्य म्हणजे ऋतू संहार होय. ऋतुसंहार या खंडकाव्यामध्ये ऋतूंचा समाहार वर्णन केलेला आहे. प्रत्येक ऋतूचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. संस्कृत भाषेमधून अतिशय सुंदरपणे महाकवी कालिदासाने काव्यरूपामध्ये मांडलेले आहे. प्रत्येक ऋतूचे काही अद्भुत, मोहक असे सौंदर्य असते. ते सौंदर्य या ऋतुसंहार खंडकाव्यात प्रत्ययकारी भाषेत मांडल्यामुळे आजही आपल्याला ऋतूंचा आस्वाद कसा घ्यावा हे समजते.

महाकवी कालिदासाची नाटके

महाकवी कालिदासाला महाकवी असे म्हटले जात असले तरी कालिदासाने लिहिलेली नाटके ही जगभर प्रसिद्ध आहेत आणि विशेष करून पाश्चिमात्य जगात महाकवी कालिदासाला नाटककार म्हणूनच ओळखले जाते.मालविकाग्निमित्र,अभिज्ञानाकुन्तलम् आणि विक्रमोर्वशीम् हे विश्वविख्यात नाटके महाकवी कालिदासाने एक नाटककार म्हणून लिहिली आहेत.

मालविकाग्निमित्र Malvikagnimitra

मालविकाग्निमित्र हे कालिदासाचे पहिले नाटक आहे. मालविकाग्निमित्र या नाटकांमध्ये एकूण पाच अंक आहेत. या नाटकामध्ये मालविका आणि अग्नीमित्र यांची प्रेमकथा कालिदासाने आपल्या अद्भुत प्रतिभेने वर्णन केलेली आहे.

अभिज्ञानशाकुन्तलम् Abhigyanshakuntalam

अभिज्ञानशाकुन्तलम् हे नाटककार कालिदासाचे जगप्रसिद्ध नाटक आहे जगातील सर्वश्रेष्ठ नाटकांमध्ये कालिदासाच्या या अभिज्ञानशाकुन्तलम् या नाटकाचा समावेश होतो. एकूण सात अंकांमध्ये हे नाटक आहे. सोमवंशातील दुष्यंत राजा आणि ऋषी कन्या शकुंतला यांच्या प्रेमाची मनमोहक प्रेम कथा या अभिज्ञानशाकुंतलम या नाटकात वर्णिलेली आहे. इतके सुंदर नाटक जगातील कोणत्याही भाषेत आतापर्यंत निर्माण झाले नाही असे पुढील श्लोकातून आपल्याला ज्ञात होते.

काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला।
तत्रापि च चतुर्थोंsकः तत्र श्लोकचतुष्टयम्।

विक्रमोर्वशीयम् Vikramorvasheeyam

विक्रमोर्वशीयम् हे महाकवी कालिदासाचे अतिशय रोचक आणि रस्त्यात्मक नाटक आहे.या नाटकात एकूण पाच अंक आहेत.विक्रम अर्थात पुरुरवा आणि उर्वशी नावाची स्वर्गातील अप्सरा यांच्या प्रेम कथेचे वर्णन आले असल्यामुळे विक्रमोर्वशीयम् असे नाटकाचे नाव दिलेले आहे.

महाकवी कालिदासाच्या इतरही काही रचना आहेत. परंतु त्या अनेक साहित्यकार आणि संशोधकांच्या मध्ये संशयास्पद आहेत. म्हणजेच काहींच्या मध्ये त्या कालिदासाच्या आहेत तर काहींच्या मते त्या अन्य कुणाच्यातरी आहेत. यामुळे संदेह निर्माण झालेला आहे. असे असले तरी कालिदासाची जी वर उल्लेख केलेली काव्य आणि नाटके आहेत. त्यामुळे कालिदासाच्या महान प्रतिभेला कोणताही डंख पोहोचत नाही. महाकवी कालिदास हा महाकवी कालिदासच राहतो.एक अत्युत्कृष्ट नाटककार म्हणून त्याचे महत्त्व यात किंचितही कमी होत नाही.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment