संत कबीर जयंती 2023 Kabir Jayanti in Marathi

संत कबीर जयंती Kabir Jayanti in Marathi

संत कबीर जयंती Kabir Jayanti in Marathi या लेखात आपण संत कबीर यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत.

Kabir Jayanti in Marathi

संत कबीर हे भक्तीकाळातील एका अतिशय प्रसिद्ध कवी होऊन गेले. संत कबीर यांचा जन्म काशीतील लहरतारा या ठिकाणी झाला. जन्मतःच अनाथ असलेल्या या बालकाला एका मुस्लिम कुटुंबाने सांभाळले. पुढे हेच कबीर एक रहस्यवादी कवी म्हणून प्रसिद्ध झाले. संत कबीरांनी लिहिलेले दोहे अतिशय प्रसिद्ध आहेत. अशा या संत कबीरांची जयंती दरवर्षी 4 जून रोजी भारतभर साजरी केली जाते.

जागतिक दृष्टिदान दिन World eye donation Day 2023 in Marathi

2023 मध्ये संत कबीर जयंती कधी आहे?

कबीरदास जयंती तारीख 2023: दरवर्षी जेष्ठ महिन्यात, संत कबीरदासजींची जयंती पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा कबीरदास जयंती ४ जून रोजी आहे.

संत कबीर जयंती कशी साजरी केली जाते?

धार्मिक मान्यतेनुसार, हा सण दरवर्षी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला येतो. संत कबीर यांची जयंती भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. संत कबीरदास यांचे अनुयायी त्यांच्या जयंती निमित्त त्यांचे दोहे वाचण्याचा आणि त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

संत कबीरदास अधिक माहितीसाठी क्लिक करा.

आपण संत कबीर जयंती का साजरी करतो?

संत कबीरदासांचा जन्म ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला. हा दिवस कबीर जयंती म्हणून साजरा केला जातो. आज कबीर जयंती आहे. कबीरदास हे भक्ती काळातील प्रमुख कवी होते, त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी संत कबीरांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

7 successful ways of Becoming wealthy श्रीमंत होण्याचे सात प्रभावी मार्ग

संत कबीरांची वैशिष्ट्ये?

कबीरांच्या भाषेत साधेपणा आणि स्पष्टता आहे, नवीन विचार देण्याची अद्भुत शक्ती आहे. त्यांचे साहित्य सार्वजनिक जीवनाचे उदात्तीकरण करणारे, मानवतावादाचा पोशाख, विश्वबंधुत्वाची भावना जागृत करणारे आहे. या कारणास्तव त्यांचे स्थान हिंदी संत काव्यात श्रेष्ठ मानले जाते.

संत कबीरांनी कोणाची उपासना केली?

कबीरदास हे निर्गुण ब्रह्माचे उपासक होते. त्यांचा एकच देवावर विश्वास होता. धर्माच्या, उपासनेच्या नावावर असलेल्या अंधश्रद्धा त्या काळात होत्याच.अंधश्रद्धेच्या ते विरोधात होते. त्यांनी देवासाठी राम, हरी इत्यादी शब्द वापरले आहेत.

संत कबीरांच्या काळातील समाज हा रुढी,अंधविश्वास, परंपरा यांनी बुरसटलेला होता. संत कबीरांनी त्या काळातील रूढी परंपरांवर जबरदस्त वैचारिक हल्ला केला. आपले दोहे आणि कवितांतून त्यांनी रुढीवादी समाजाला बदलण्याचे आवाहन केले. रूढी परंपरांतील फोलपणा त्यांनी आपल्या परखड आणि सहज समजणाऱ्या भाषेतून जनसामान्यांना दाखवून दिला.

संत कबीरांचे काही प्रसिद्ध दोहे

कल करे सो आज कर, आज करे सो अब ।
पल में प्रलय होएगी,बहुरि करेगा कब ॥

पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।

गुरु गोविंद दोउ खड़े काको लागूं पाय ।
बलिहारी गुरु आपने, गोविंन्द दियो बताय ।।

जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान।

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय,
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय।

तिनका कबहुँ ना निन्दिये, जो पाँवन तर होय,
कबहुँ उड़ी आँखिन पड़े, तो पीर घनेरी होय।

लूट सके तो लूट ले,राम नाम की लूट ।
पाछे फिर पछ्ताओगे, प्राण जाहि जब छूट

माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर,
कर का मनका डार दे, मन का मनका फेर।

जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ,
मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ।

साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥

दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥

अति का भला न बोलना, अति की भली न चूप,
अति का भला न बरसना, अति की भली न धूप।

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय,
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय

साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,
सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय।

कबीर हमारा कोई नहीं हम काहू के नाहिं ।
पारै पहुंचे नाव ज्यौं मिलिके बिछुरी जाहिं ॥

मन मैला तन ऊजला बगुला कपटी अंग।
तासों तो कौआ भला तन मन एकही रंग ॥

रात गंवाई सोय कर दिवस गंवायो खाय ।
हीरा जनम अमोल था कौड़ी बदले जाय ॥

हाड जले लकड़ी जले जले जलावन हार ।
कौतिकहारा भी जले कासों करूं पुकार ॥

बोली एक अनमोल है, जो कोई बोलै जानि,
हिये तराजू तौलि के, तब मुख बाहर आनि।

संत ना छाडै संतई, जो कोटिक मिले असंत
चन्दन भुवंगा बैठिया, तऊ सीतलता न तजंत।

जो उग्या सो अन्तबै, फूल्या सो कुमलाहीं।
जो चिनिया सो ढही पड़े, जो आया सो जाहीं।

कबीर तन पंछी भया, जहां मन तहां उडी जाइ।
जो जैसी संगती कर, सो तैसा ही फल पाइ।

तन को जोगी सब करें, मन को बिरला कोई।
सब सिद्धि सहजे पाइए, जे मन जोगी होइ।

बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर।
पंछी को छाया नहीं फल लागे अति दूर ॥

झिरमिर- झिरमिर बरसिया, पाहन ऊपर मेंह।
इक दिन ऐसा होइगा, सब सूं पड़े बिछोह।

राजा राणा छत्रपति, सावधान किन होय॥
माटी गलि सैजल भई, पांहन बोही तेह॥

कबीर प्रेम न चक्खिया,चक्खि न लिया साव।
सूने घर का पाहुना, ज्यूं आया त्यूं जाव॥

संत कबीरांचा उपदेश अतिशय परखड आणि चपखल आहे. सोप्या सुंदर भाषेत संत कबीरांनी समाजाला उपदेश केला आहे. संत कबीरांनी केलेले प्रबोधन हजारो वर्ष झाले तरी समाजाला प्रबोधन करीत राहील. योग्य मार्गावर नेत राहील यात शंकाच नाही.आपणही संत कबीर साहेबांच्या विचार धनाचा अभ्यास करावा. म्हणजे आपल्याला जीवनाचा सुंदर मार्ग संत कबीरांच्या विचाररुपी दीपस्तंभाच्या प्रकाशात दिसेल.संत कबीर जयंती [2023 Kabir Jayanti in Marathi]

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment