शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला Shivneri Killa Mahiti In Marathi

शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला Shivneri Killa Mahiti In Marathi

शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला Shivneri Killa Mahiti In Marathi माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी नसेल. कारण 19 फेब्रुवारी 1630 , फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 , शुक्रवार शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचा स्वातंत्र्यसूर्य उगवला. छत्रपती शिवरायांची चिमुकली पावले ज्या किल्ल्याने अनुभवली तो किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला होय.

शिवनेरी नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग. कल्याण, भडोच, नालासोपारा या बंदरांवरून देशावर होणारा व्यापार नाणेघाटातून होई. नाणेघाटाचे खोदकाम सातवाहन राजांनी केले. जुन्नर शहराचे संरक्षण करणारा शिवनेरी हा संरक्षक दुर्ग काही एकटा नाही. पूर्वेला नारायणगड, उत्तरेला हरिश्चंद्रगड, पश्चिमेला हडसर, चावंड,जीवधन, भैरवगड,दक्षिणेस राजमाची, ढाक, गोरक्षगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड असा वेढाच या बळकट शिवनेरी किल्ल्याभोवती पडला आहे. या दुर्गाच्या आठही दिशांना पवित्र अशी देवस्थाने आहेत.

माझी शाश्वत जीवनशैली निबंध

शिवनेरी किल्ला 1100 मीटर उंचीचा किल्ला आहे. प्रत्यक्षात चढण अडीचशे ते तीनशे मीटरची आहे. दुर्गप्रेमींना अतिशय सुलभपणे हा किल्ला पाहायला जाता येते.

शिवनेरीवर (Shivneri Killa) जाण्याचे मार्ग

शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी सातवाहनकालीन खोदलेला दगडी पायऱ्यांचा एक मार्ग आहे. एका पाठोपाठ एक अशा वेशी सात ओलांडून जाता येते. दुसरा जो मार्ग आहे त्याला साखळीचा किंवा साखळदंडाचा मार्ग म्हणतात.

निजामशाहीचा भाग्यमणी शिवनेरी किल्ला Shivneri Killa

इसवी सन 1443 मध्ये मलिक ऊल तुजार याने यांनी यादवांकडून शिवनेरी किल्ला जिंकला बहमनी सुलतानांच्या राज्यात सामील केला.पुढे 1494 मध्ये अहमदनगरची उभारणी करून निजाम उल मुल्कने तेथे आपली राजधानी हलवली. 1565 मध्ये नगरचा चौथा सुलतान मुर्तीजा निजामशहाने शहा कासिमला म्हणजे आपल्याच भावाला शिवनेरी किल्ल्यावर कैदेत ठेवले होते.

शिवनेरी – विकिपीडिया

कोळी चौथरा काळ्यास्मृती

सन 1650 मध्ये मोगलांच्या विरुद्ध पुणे प्रांतातील महादेव कोळ्यांनी खूप मोठे बंड केले होते. मोगलांनी कडवी फौज पाठवली. कोळ्यांचा कोंडमारा केला. 1500 कोळ्यांच्या मुसक्या बांधून त्यांना गडावर नेले. अनेकांची मुंडकी उडवली. ज्या ठिकाणी हा नरमेध झाला.तिथे एक फरशी बांधून ठेवली. त्यालाच कोळी चौथरा किंवा कोळी चबुतरा असेही म्हणतात. या ठिकाणी परिसरातील कोळी बांधव दरवर्षी येऊन आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करतात.

ज्या किल्ल्यावर कोळी बांधवांचा शेकडोंच्या संख्येने शिरच्छेद झाला. त्यांची स्वातंत्र्याची प्रेरणा दाबण्याचा प्रयत्न झाला त्याच किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वातंत्र्याचा सूर्य जन्माला आला . आणि एवढेच नव्हे तर ज्या बहमणी सुलतानांच्या ताब्यात महाराष्ट्र होता. त्या बहमणी राज्याचे तुकडेच नव्हे, तर त्यांचा कायमचा बंदोबस्त छत्रपती शिवरायांनी केला. एवढेच नव्हे तर दिल्लीश्वर औरंगजेब बादशहाच्या मोगलशाहीला निस्तेज केले.

शिवनेरीचे (Shivnri killa) शल्य

छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर किल्ल्यावर झाला. परंतु छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या आपल्या देवतेला, शिवनेरी किल्ला हिंदवी स्वराज्यामध्ये आणण्यात अपयश आले. शिवनेरी आणि जंजिरा यांचे शल्य शिवरायांच्या हृदयात खूपत राहिली. 1673 मध्ये अजिजखान या किल्लेदाराला फितवून आणि 1678 मध्ये जुन्नर शहर लुटून शिवनेरीला माळा लावून जिंकण्याचे दोन्ही प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. पुढे 1716 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणून आपल्या आजोबांची ही इच्छा पूर्ण केली.

प्राचीन इतिहास Ancient History Of Shivneri Killa

प्राचीन कडे या भागांमध्ये शक राहत होते. नहपान नावाचा राजा जुन्नरला राजधानी बनवून राज्य करीत होता. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकामध्ये शक उज्जैन उज्जयनीस होते.सौराष्ट्र,गुजरात, डांग असे सरकत ते पुढे कल्याण… कार्ला ….जुन्नर येथे आले. शकांनी या भागात राज्य केले. आजही शकांची नाणी जुन्नर परिसरात सापडतात. पुढे गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला. नाणेघाटाशी सबंधित असा थोर राजा याच परिसरात वावरला.

शिवनेरी किल्ला हा लेण्यांचा किल्ला आहे. शिवनेरीच्या पोटात अनेक मोठमोठी लेणी आजही पाहायला भेटतात. किल्ल्यावर जंगल आहे. जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. विषारी सर्प आढळतात. मोठमोठी आग्या मोहळे आहेत.त्यामुळे या नाण्यांकडे जाण्याचा मार्ग दुर्गम झालेला आहे.

दूर्गदर्शन

शिवनेरी किल्ल्याचा आकार बाणाच्या टोकासारखा निमुळता आणि नीट ध्यान दिले तर हे बाणाचे टोक उत्तरेकडे रोखलेले आहे. उत्तरेच्या बाजूला कडेलोट हा भाग आहे. त्याच्या अलीकडेच पाण्याचे मोठे तळे आहे. बहुदा उन्हाळ्यात ते कोरडे असले तरी काही प्रमाणात पावसाळ्यात भरते. अलीकडेच सरकारवाडे आहेत. ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ते शिवजन्मस्थान पूर्वी जरा वाईट अवस्थेत होते. परंतु आता ते नीटनेटके आहे. या ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत असतात. खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतो.

शिवाई देवीचे मंदिर

शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे सुंदर असे मंदिर आहे. शिवाई देवीच्या नावाने छत्रपती शिवरायांचे नाव शिवाजी असे ठेवले असे म्हटले जाते. नवरात्र उत्सव काळात या ठिकाणी मोठा उत्सव असतो. अनेक पर्यटक व परिसरातील भाविक भक्त शिवाई देवीच्या दर्शनास येत असतात.

अंबारखाना

शिवनेरी किल्ल्यावर अंबरखाना नावाची प्रसिद्ध इमारत आहे. तिचे आता खूप नुकसान झाले आहे. धान्य साठवण्याची जागा म्हणून अंबरखान्याचा पूर्वीपासून उपयोग होत असे.

शिवकुंज

शिवनेरी किल्ल्यावर Shivneri Killa महाराष्ट्र शासनाने शिवकुंज ही इमारत उभारलेली आहे. काही खोल्या बांधल्या आहेत. दिवसा चहापाणी..ताक…सरबत थंडपाणी मिळते. मोगल आमदानीमधील कमान त्या ठिकाणी आहे. अनेक गुहा आहेत.नामवंत अशी थंडगार पाण्याची गंगा-यमुना टाकी आहेत. गडाच्या मध्यावरच्या कोळी चौथरा, शेजारीच छत्रपती शिवरायांचे न्हाणीघर अशा एक ना दोन अनेक गोष्टी शिवनेरी किल्ल्यावर आजही पाहण्यासाठी आहेत.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment