माझी शाश्वत जीवनशैली निबंध Mazi Shashwat Jivanshaili

माझी शाश्वत जीवनशैली निबंध Mazi Shashwat Jivanshaili

माझी शाश्वत जीवनशैली निबंध Mazi Shashwat Jivanshaili

शाश्वत जीवनशैली अर्थ

हे जीवन सुंदर आहे. सर्व सजीवांचे जीवन सुंदर असले तरी काल मर्यादित आहे. असे असले तरी जीवनाचा प्रवाह अखंड आणि शाश्वत आहे. हा जीवनाचा प्रवाह आनंदी राहण्यासाठी आपली जीवनशैली सकारात्मक आणि पर्यावरणस्नेही असण्याची आवश्यकता आहे.माझ्याबरोबर मी ज्या निसर्गाचा घटक आहे; त्या निसर्गाशी पूरक अशी माझी जीवनशैली असेल तर ती जीवनशैली शाश्वत जीवनशैली असेल.

आजच्या धकाधकीच्या काळात मानव इतर सजीवांच्या जीवनाच्या बाबतीत साकल्याने विचार केला तर शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. निसर्ग अनंतहस्ते प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी मुक्तपणे सर्वकाही देत आहे. निसर्गाच्या दातृत्वाचा आदर करीत जीवन पर्यावरणस्नेही बनविणे म्हणजेच शाश्वत जीवनशैली होय.

स्वयंपाकघरातील विज्ञान निबंध Essay on Swayampak Gharatil Vidnyan

भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गाचे जतन होणे आवश्यक आहे.निसर्गाच्या सुरात सुर मिळवत जगण्यात फार आनंद दडलेला आहे. पृथ्वीवरील निसर्गाला प्रचंड हानी पोहोचली आहे. हवा पाणी जमीन प्रदूषणाने उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळे कुठेतरी हे थांबले पाहिजे. शाश्वत जीवनशैली विचार केला पाहिजे आणि ती स्वीकारली पाहिजे.

शाश्वत जीवनशैलीचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझ्यापुढे उद्याचे सुंदर जग दिसते. त्यासाठी काही सवयी अंगीकारण्याची आवश्यकता मला वाटते.त्यादृष्टीने शाश्वत जीवनशैली जगण्यासाठी काही सवयी मला सुचवावेसे वाटतात.

पर्यावरण अनुकूल वर्तन

पर्यावरणामध्ये बदल करताना पर्यावरणाला हानी न पोहोचवता आपले जीवन आपण आनंदाने जगू शकतो. त्यासाठी पर्यावरणाला अनुकूल असे वर्तन आपण केले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी निसर्गाला हानी पोहोचवत जगणे म्हणजे आपल्या मातापित्याला ओरखडे घेत जगण्यासारखे आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे आणि पर्यावरण अनुकूल वर्तन ठेवले पाहिजे.

सकाळचे फिरणे

सकाळच्या भरपूर प्राणवायूयुक्त वातावरणामध्ये फिरणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी ऊर्जावान बनते. आपल्या प्रेरणेतून शरीराला व्यायाम मिळतो. स्नायूंना बळकटी येते. मनाला उत्साह वाटतो. संध्याकाळच्या चालण्यापेक्षा सकाळचे फिरणे अधिक फायदेशीर ठरते. निसर्गाच्या सानिध्यात फिरल्यामुळे आपल्याला निसर्गाच्या दातृत्वाचा अनुभव येतो. निसर्ग जपण्याची नकळत प्रेरणा भेटते. आपण निसर्गाचे घटक आहोत याची जाणीवही सहजगत्या होते.

प्लॅस्टिकला नकार कापडी पिशवीला होकार

शाश्वत जीवनशैली अंगी करताना जगभर जे प्लॅस्टिक कचऱ्याने संकट निर्माण केली आहे त्याचा पण विचार केला पाहिजे आपल्या पृथ्वी साठी प्लॅस्टिक जीव घेणे आहे प्लॅस्टिक हे विघटन होण्याची प्रचंड कालावधी घेते.प्लॅस्टिक हे पर्यावरण अनुकूल असलेले घटक नाही. त्यामुळे प्लास्टिकला नकार देण्यात संपूर्ण सजीव सृष्टीचा फायदा आहे.याव्यतिरिक्त सुट्टी कापडी पिशव्या यांचा वापर आपण करू शकतो. कापडी पिशव्या आपल्याजवळ ठेवल्या तर प्लास्टिकला नकार देणे आपल्याला शक्य आहे म्हणून प्लास्टिकला नकार आणि कापडी पिशवी ला होकार देण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे ही सवय शाश्वत जीवनशैली खूप महत्त्वाची सवय आहे.

पाण्याचा वापर काटकसरीने करणे.

पाणी हे जीवन आहे असे आपण म्हणतो परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये पाणी रुपी जीवनाचा वापर आपण फार उधळेपणाने करतो. हे थोडे आत्मपरीक्षण केले तरी लक्षात येईल दरवर्षी किती ठिकाणी दुष्काळ पडतात तेव्हा आपल्या लक्षात येते की पाणी किती महत्त्वाचे आहे.एक दिवस पाणी उशीराने आले किंवा आलेच नाही तर अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहतात. शहरांना पाणी पुरवणारी धरणे आज संकटात आहेत.त्यांची पाणी धारण करण्याची क्षमता त्यामध्ये साधणाऱ्या गाळ व इतर पदार्थांमुळे कमी होत आहे.शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याची गरजही वाढत आहे .याशिवाय अशी धरणे पुन्हा बांधणे शक्य नाही.त्याचप्रमाणे घरांमधून सोडले गेलेल्या सांडपाण्याच्या व्यवस्थापनामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे.

शून्य कचरा निर्मिती

शाश्वत जीवनशैली साठी एक आवश्यक अशी सवय म्हणजे शून्य कचरा निर्मिती होय. शून्य कचरा निर्मिती हा शब्द जरी ऐकला तरी कित्येकांना ही कल्पना अत्यंत चुकीची वाटू शकते परंतु यात चुकीचे काही नाही. आपल्या घरात किंवा बाहेर आपल्यामुळे जो कचरा निर्माण होतो त्याला पण प्रत्येक नागरिक जबाबदार आहे.

आपल्या घरात निर्माण झालेला सुका आणि ओला कचरा वेगवेगळा पिशव्यांमध्ये किंवा कचराकुंडी मध्ये ठेवला म्हणजे त्याचे व्यवस्थापन करणे सोपे होते. सुक्या आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करून आपल्या बागेला खत देऊ शकतो.कचरा निर्माण होऊ नये यासाठी आपण अगोदरच काळजी घेतली पाहिजे. कचरा झालाच तर त्याचे काय करावयाचे याच्यासाठी एक निश्चितच अल्गोरिदम आपल्या मनात ठरलेला पाहिजे. कचरा निर्माण होणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागली जाणे यालाच शून्य कचरा निर्मिती असे म्हटले जाते.

नैसर्गिक संसाधनांनी निर्मित वस्तूंचा काटकसरीने वापर

शाश्वत जीवनशैलीसाठी एक महत्वाची सवय म्हणजे नैसर्गिक संसाधनांनी निर्माण झालेल्या वस्तूंचा काटकसरीने वापर करणे. उदाहरणार्थ कागद कागद निर्मितीसाठी नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. कागदाचा वापर काळजीपूर्वक केला तर कित्येक झाडेतुटण्यापासून वाचू शकतात. हे लक्षात घेतले पाहिजे. कागदाचा वापर किती आवश्यक आहे हे यावरून लक्षात येईल. कागद निर्मिती प्रकल्प नैसर्गिक संसाधनांचे वापर करून चालतात. कागद मोठा कामाचा असे आपण म्हणतो आणि त्याचे महत्त्व मात्र पदोपदी विसरून जातो. हे काही योग्य नाही. त्यामुळे कागद जपून वापरा. कागद जपून वापरणे म्हणजेच पर्यावरणाला अनुकूल वर्तन करणे होय आणि शाश्वत जीवनशैलीची ती एक गरज आहे.

पर्यावरण स्नेही उत्सव व समारंभ

सर्वच नागरिक वेळेस समारंभ करताना उत्साही वातावरणात खूप काही करत असताना बऱ्याच वेळा पर्यावरणाचा अजाणतेपणे विचार करत नाहीत. बुद्धीपेक्षा त्या मागील भावनेला अधिक महत्त्व दिले जाते आणि आपण कर्तव्याला चुकतो असेच म्हणावे लागेल. लग्न समारंभामध्ये अन्नाची प्रचंड नासाडी होते. अन्न निर्माण होण्यासाठी नैसर्गिक साधने वापरावी लागली आहेत. त्यांचा नकळत तुटवडा निर्माण होतो.गणेशोत्सव साजरा करत असताना इकोफ्रेंडली गणेशोत्सवाची एक सुंदर संकल्पना निर्माण झाली आहे. त्यामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करणे ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे.

पर्यावरण स्नेही आदर्श वाहनांचा वापर

आजच्या विज्ञानाने अनेक पर्यावरण स्नेही आदर्श वाहने निर्माण केली आहेत. त्यातून अगदी अल्प प्रमाणात प्रदूषण होते किंवा होत नाही.वेगवेगळी पर्यावरणस्नेही इंधने शोधल्यामुळे पर्यावरणाचे निश्चितच संवर्धन करण्यात मानवाला यश येत आहे. विजेवर आधारित चालणाऱ्या गाड्या आणि सीएनजी सारखे गॅसवर चालणाऱ्या गाड्यांचा वापर वाढला तर निश्चितच पेट्रोल-डिझेल सारख्या द्रव पदार्थ आणि होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. कार्बन फूटप्रिंट वाढणार नाही.हायड्रोजन गॅसवर आधारित इंधन असलेल्या गाड्या येऊ पाहात आहेत.त्यांचा वापर केला पाहिजे यशस्वी मी महत्त्वाचे असे सुचवेन की

सायकलचा वापर आपण वाढवला पाहिजे. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी पायी जाणे किंवा सायकलने जाणे वाढवले तर आपल्या वैयक्तिक आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी ते खूपच फायदेशीर ठरेल. सायकलचा वापर करू नये हे शाश्वत जीवनशैलीसाठी असणारी एक सहज अमलात आणता येणारी सवय आहे.

परसबाग निर्मिती

प्रत्येकाला शक्य नसले तरी ज्यांना शक्य आहे.त्यांनी बरेच बागेची निर्मिती केली पाहिजे. परसबागेसाठी लागणारे पाणी आवश्यक खत आपल्याला आपल्या घरातूनच मिळू शकते याशिवाय परस बागेतून मिळणाऱ्या भाज्या सेंद्रिय पद्धतीने निर्माण झालेली असल्यामुळे आपल्या वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरतील.

परसबाग केवळ वैयक्तिक न करता प्रत्येक गावाने- शहराने तिची निर्मिती केली पाहिजे. शहरात निर्माण होणारा कचरा व सांडपाणी इत्यादींचा वापर करून परसबाग संवर्धन केले तर पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण होईल.या परसबागेमध्ये ज्यांना वेळ देणे शक्य आहे अशा व्यक्तींनी परिश्रम घेतले उपक्रम यशस्वी होण्यात मदत होईल.

सारांश

थोडक्यात सांगायचे तर वरील काही सवयींचा अंगीकार केला तर शाश्वत जीवनशैली वास्तवात येणे शक्य आहे. माझी शाश्वत जीवनशैली Mazi Shashwat Jivanshaili वेगळी काही नसून वरील सवयींचा एक समुच्चय आहे. शाश्वत जीवनशैलीसाठी काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तर आपल्याला आज भेडसावणारे अनेक प्रश्न आपोआपच निकालात निघतील. आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी ही एक महत्त्वाची गरज आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment