माझा शाळेचा पहिला दिवस निबंध Maza Shalecha Pahila Divas Nibandh

माझा शाळेचा पहिला दिवस निबंध Maza Shalecha Pahila Divas Nibandh

(माझा शाळेचा पहिला दिवस निबंध Maza Shalecha Pahila Divas Nibandh)

आज माझा शाळेचा पहिला दिवस Maza Shalecha Pahila Divas Nibandh होता. आई आणि बाबा दोघांनाही खूप आनंद झाला होता. मलाही शाळेत जायचे होते. पण एकट्याने जायची भीती वाटत होती. शाळेत माझे शेजारील असणारे कोणीही मित्र नव्हते. मी एकटाच शाळेत असणार होतो. मला कोणीच ओळखणारे नसल्यामुळे मला शाळेत जायला नको वाटत होते. असे असले तरी आज माझा शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे आई-बाबा उत्साहात होते… आनंदात होते. त्यांनी मी शाळेत जावे… शिकावे…मोठे व्हावे अशा अपेक्षा ठेवलेल्या असाव्यात.

National Farmer’s Day 2023 राष्ट्रीय शेतकरी दिन

माझ्यासाठी स्वच्छ पांढरा शर्ट व खाकी पॅन्ट, पायामध्ये सुंदर असे बूट,केसांना खोबरेल तेल लावून छानपैकी केस विंचरलेले. अतिशय सुंदर असा दिसणारा मी त्या शाळेच्या गणवेशात अधिकच रुबाबदार दिसत होतो. बाबांनी माझा मोबाईलमध्ये छान फोटो काढला. आईने तर माझ्याबरोबर एक सुंदरशी सेल्फीसुद्धा काढली.

आई-बाबा शाळेमध्ये मला पोहोचवण्यासाठी दोघेही येणार होते. बाबांनी त्यांचे मोटरसायकल काढली. मला पुढे बसवले. आई मागे बसली आणि गाडी स्टार्ट झाली. शाळेच्या दरवाजात येताच माझी धडधड वाढू लागली. त्या शाळेतील अगोदरच प्रवेश घेतलेली मुले बिनधास्त इकडे तिकडे उड्या मारत खेळत धिंगाणा घालत होती. शिक्षक नुकतेच शाळेमध्ये आले होते. ते मुलांना शिस्तीत रहा म्हणून ऐकवत होते. काही मुले शाळा स्वच्छ करत होती. वर्ग झाडत होती. मला स्वच्छता आवडते. त्यामुळे त्याचे काही वाटले नाही. परंतु या धिंगाणा घालणाऱ्या मुलांमध्ये माझा कसा टिकाव लागणार याचा मला प्रश्न पडला होता.

http://500 Words My First Day At School Essay – Toppr https://www.toppr.com/guides/essays/my-first-day-at-school-essay/My First Day At School 

इतक्यात माझ्याबरोबर अंगणवाडीमध्ये असणारे दोघे तिघे मित्र दिसले.मला खूप आनंद झाला.ते त्यांच्या आई-बाबांबरोबर शाळेत प्रवेश घ्यायला आले होते. त्यांनीही माझ्यासारखाच छानसा गणवेश घातला होता. स्कूल बॅग तयार होती. त्याचबरोबर टिफिन बॅगही होती. ती मुले मात्र खुशीत दिसत होती. त्यांना पाहून मलाही आनंद झाला. आता मला सोबतीला माझे अंगणवाडीतले मित्र असतील असे वाटल्याने माझा जीव भांड्यात पडला.

मी त्या मित्रांकडे पाहिले… त्यांनी माझ्याकडे पाहिले. मग आई मला त्यांच्याकडे घेऊन गेली. बाबा शाळेच्या कार्यालयात प्रवेशासाठी गेले. त्या ठिकाणी प्रवेशाचे काम होत असतानाच शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम यांनी मला बोलावणे पाठवले. आईने मला ऑफिसमध्ये नेले. माझा परिचय तेथील शिक्षकांशी झाला.

पहिलीची भेदरलेली मुले इकडे तिकडे पाहत होती. कोणी ओळखीचे आहे का पाहत होते. काहींच्या डोळ्यातून पाणी येत होते. काहींचे चेहरे हिरमुसलेले दिसत होते. काही नको नको म्हणणारे सुद्धा जबरदस्तीने आज शाळेत आले होते. सर्वांचीच अवस्था केवीलवाणी होती. असे असले तरी शाळेचा पहिला दिवस माझ्या आठवणीत राहिला.

शाळेचा पहिला दिवस माझ्या आठवणीत राहिला, कारण या दिवशी आम्हा सर्व पहिलीच्या मुलांना छान पैकी फेटे बांधण्यात आले होते. आमच्या हातात फुगे देण्यात आले होते.एका चांगल्या ट्रॅक्टरमधून आमची मिरवणूक काढली होती. शाळेतील सर्व मुले चांगल्या चांगल्या घोषणा देत होती. गावातील लोक कौतुकाने आमच्याकडे पाहत होते. शाळेतील सर्व शिक्षक या आमच्या मिरवणुकीचे चांगले नियोजन करण्यात दंग होते. मिरवणूक काढल्यामुळे आम्हाला छान वाटत होते. माझ्या सहज जवळजवळ सर्वच मुलांचे आई बाबा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

शाळेत गेल्यानंतर या मिरवणुकीचे एका छोट्याशा बालसभेमध्ये रूपांतर झाले.सर्व मुलांचे स्पीकरवरून स्वागत करण्यात आले. बरेचसे पालकही या कार्यक्रमाला आलेले होते. व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी बसली होती. टेबलावर वह्या,पुस्तके, पाट्या, गुलाबाची फुले, खाऊ अशा अनेक गोष्टी होत्या. प्रत्येक मुलाला पुढे बोलावून त्याचा परिचय घेऊन त्या सर्व मुलांना या टेबलावरील वस्तू दिल्या जात होत्या. छान फोटो काढले जात होते. शेवटी सगळ्या मुलांना एकत्रितपणे उभे करून मान्यवर आणि शिक्षकांनी एकत्रित असा सुंदर फोटो काढला. कोणीतरी भाषण केले आणि आमच्या स्वागताचा कार्यक्रम संपला.

आम्हाला नवीन पुस्तके वह्या खाऊ अशा गोष्टी घेतल्यामुळे खूप आनंद झाला होता. शाळेत येताना जी भीती वाटत होती ती आता पूर्ण नाहीशी झाली होती. वर्गात बसल्यानंतर सर्वच मुले एकमेकांकडे पाहू लागली. एकमेकांशी बोलू लागली. एकमेकांचे नाव विचारू लागली. काही रडविली असली तरी हळूहळू त्यांचे चेहरे उजळू लागले.

आम्हाला शिकवणारे बाई यांचा चेहरा अतिशय हसरा व बोलका वाटत होता. त्यांनी आम्हा सगळ्यांची अतिशय आपुलकीने विचारपूस केल्याने बरे वाटले. आम्हाला सर्वांना त्यांनी छान छान गोष्टी सांगितल्या. गाणे ऐकवली… गाण्यावर कसे नाचायचे ते शिकवले. खूप काही खेळ घेतले. दुपारी शाळेतील भात व टिफिन बॅग मधील पदार्थ खाल्ले. खूप आनंद घेतला आणि पाच वाजता शाळा सुटल्यानंतर आई-बाबा मला घ्यायला आले होते. त्यांच्याबरोबर मी अतिशय मजेत घरी गेलो.अशा तऱ्हेने माझा शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंदात गेला.

(Maza Shalecha Pahila Divas Nibandh Maza Shalecha Pahila Divas Nibandh)

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment