श्रीमंत बनवणारे पुस्तक द सिक्रेट रहस्य राॅन्डा बर्न The secret by Rhonda Byrne in Marathi

”द सिक्रेट” रहस्य राॅन्डा बर्न 

(The secret by Rhonda Byrne in Marathi)

जर तुम्ही समृद्ध  वैभवशाली  जीवन कल्पनेत सतत रंगवीत राहाल तर ते तुम्ही नक्कीच आकर्षित कराल. हा सिद्धान्त प्रत्येक वेळी प्रत्येक बाबतीत खरा ठरतोच. ”…….बॉब प्रॉक्टर

 The-secret-by-Rhonda-Byrne-in-Marathi

श्रीमंत कोणाला व्हावे वाटत नाही?प्रत्येक व्यक्तिला आपण श्रीमंत असावे वाटते. पण कुणाला नोकरी मिळत नाही,  तर कुणाला व्यवसाय कळत नाही. श्रीमंत होण्याचा मार्ग दिसत नाही की सुचत नाही.श्रीमंती आणि समृद्धीचे रहस्य कळत नाही. मित्रहो, अशा सर्व व्यक्तींसाठी राॅन्डा बर्न यांनी द सिक्रेट (The secret by Rhonda Byrne in Marathi) पुस्तकात यशाचा राजमार्ग दाखवला आहे. जगभरातील लोक या रहस्य सांगणार्‍या पुस्तकानुसार चालून श्रीमंत झाले. काय आहे हे पुस्तक ? काय रहस्य दडले आहे यात? हेच आपण या लेखात पाहणार आहोत.

इको फ्रेंडली गणेशोत्सव

मला वाचनाचा खूप छंद आहे. नवीन नवीन पुस्तके मी वाचत असतो.” द सीक्रेट” (The secret by Rhonda Byrne in Marathi)हे पुस्तक मला वाचायचे होते. परंतु ते कसे मिळवायचे हे मला समजेना. हे पुस्तक मला वाचायला नक्की मिळणार. असाच सकारात्मक विचार मी अनेकदा केला आणि एक दिवस माझा एक मित्र मला म्हणाला की मी सध्या “द सीक्रेट”……. हे पुस्तक वाचत आहे. मी म्हटले मला ते वाचायला मिळेल का? तर त्यांनी लगेच हो म्हटले.राॅन्डा बर्न या लेखिकेने आपल्या जीवनात पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट कशी मिळवता येते याचे रहस्य या पुस्तकामध्ये दिले आहे.

द सीक्रेट हे पुस्तक प्रत्येक यशस्वी होऊ इच्छिणार्‍या माणसाला खूप चांगले मार्गदर्शन करते. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा, चांगले आरोग्य, प्रभावी व्यक्तिमत्व, सुख समाधान हवे असते. परंतु ते कसे मिळवायचे हे समजत नाही. जर तुम्ही यामध्ये असाल तर हे पुस्तक नक्कीच वाचावे.हे पुस्तक तुमची निराशा कधीच करणार नाही.

जीवन उध्वस्त झालेली लेखिका आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा कशी यशस्वी होते. हे तिने प्रस्तावनेत सांगितले आहे. अद्भुत अशा रहस्याचा साक्षात्कार म्हणजे जीवनाचे रहस्य जेव्हा तिला झाले. तेव्हा तिने हे अद्भुत रहस्य संपूर्ण जगाला सांगायचे ठरवले आणि “द सीक्रेट” या चित्रपटाची तिने निर्मिती केली. हे करत असताना लेखिका रोंडा बर्न यांनी आकर्षणाचा सिद्धांत वापरला आणि पाहिजे तसे यश मिळविले. ही यशोगाथा मांडून लेखिकेने संपूर्ण जगासमोर रहस्याचा भेद केला आहे.

सुरुवातीलाच रहस्य प्रकट झालं हे प्रकरण आहे. यामधून वेगवेगळे उद्योजक, तत्त्वज्ञ,लेखक, मार्केटिंग विशेषज्ञ, जीवन मार्गदर्शक, प्रेरणादायी वक्ते, द्रष्टे, विचारवंत यांची अवतरणे दिली आहेत. त्यांनी मांडलेले विचार हे संकलित करून पुस्तकाची निर्मिती एखाद्या सहज प्रवाह सारखी झाली आहे.

प्रत्येक माणसाला आपल्याकडे असलेल्या गरिबीवर मात करून श्रीमंत होण्याची इच्छा असते. अशा प्रत्येकासाठी हे पुस्तक आहे. श्रीमंतीचे रहस्य देताना त्यांनी सुरुवातीलाच मन ज्या गोष्टीची कल्पना करू शकते ती मिळवू शकते. हे सांगून जॅक कॅनफिल्ड यांची यशोगाथा सुरूवातीला दिली आहे. त्यांनी रहस्याचा सिद्धांत कसा वापरला आणि प्रचंड श्रीमंती कशी मिळवली हे अतिशय चांगल्या भाषेत लिहिले आहे.

समृद्धी आकर्षित करण्यासाठी आपण काय केले पाहिजे? संपत्तीवर लक्ष कसं केंद्रित केले पाहिजे? पैशाबद्दल आपण कसं बोललं पाहिजे? आपल्या भावना सकारात्मक ठेवून आपण या ब्रह्मांडा मधून आपल्याला पाहिजे तितका पैसा आपल्याकडे आकर्षित कसा करू शकतो? याचे उदाहरणासह प्रत्यंतर वाचकाला येते.

पैसा मिळवण्यासाठी पैसा दान करणे हे आयुष्यात समृद्ध करण्यासाठी अतिशय आवश्यक असलेलं सामर्थ्यशाली तंत्र आहे. जेव्हा तुम्ही देत असता तेव्हा तुम्ही म्हणत असता की माझ्याकडे भरपूर आहे आणि तुमच्यामध्ये असणारी ही भावनाच तुम्हाला पैसा मिळवून देते.

श्रीमंतीचे रहस्य, मानवी संबंधांचे रहस्य, विश्व रहस्य, आत्म रहस्य, जीवनाचे रहस्य, जीवन चरित्र अशा एकामागून एक प्रकरणांमध्ये वाचकाला खिळवून ठेवण्याची प्रचंड ताकद आहे. यातूनच वाचकाला आपल्या ध्येयाकडे जाण्याचे रहस्य समजते. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण म्हणजे प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आखून दिलेला राजमार्ग आहे. या मार्गाने कोणतीही व्यक्ती जीवनात आपल्याला हवे ते मिळू शकते.

”एकदा हे रहस्य तुम्ही शिकून घेतलंत की तुम्हाला जे हव ते तुम्ही मिळवू शकता. करू शकता किंवा मिळवू शकता.”—- राॅन्डा बर्न 

युगानुयुगे चालत आलेले महान रहस्य सर्वांना हवे होते. परंतु ते गुप्त ठेवले गेले.चोरून वापरण्याचा प्रयत्न केला गेला. प्रचंड किंमत देऊन सुद्धा हे रहस्य कोणी सांगितले नाही. परंतु आता हे रहस्य संपूर्ण दुनियेसमोर लेखिकेच्या मते तिने उलगडून सांगितले आहे. एकदा जर हे रहस्य तुम्ही जाणून घेतले; तर तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही मिळवु शकता. करू शकता किंवा बनू शकता. तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात. तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ तुम्हाला समजेल. तुमच्या व्यापकतेची, तुमच्या विशालतेची, तुमच्यातील खर्‍या शक्तीची जाणीव होईल.

मंजुल पब्लिशिंग हाउस यांनी या पुस्तकाचा अतिशय सुंदर असा अनुवाद प्रकाशित केला आहे डॉक्टर रामा मराठे यांच्या सुंदर अशा अनुवादाने हे पुस्तक मराठीतच लिहिले की काय असे वाटते. पुस्तकांचे वाचन माणसाला समृद्ध बनवते. द सीक्रेट या पुस्तकाचे वाचन केले आणि त्यानुसार आपल्यात जर आपण काही बदल केले तर आपण नक्कीच आपल्याला पाहिजे तो विचार सत्यामध्ये सहज उतरवून यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. यात शंकाच नाही. आपल्याला हे पुस्तक पाहिजे असेल  हे पुस्तक आपण मागवू शकतो. पुस्तकांमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला निश्चितच खूप काही फायदे देऊन जाते आपल्या विचारांचे मूल्य वाढवणारी ठरते.

आपल्याला हे पुस्तक स्वस्त आणि मस्त किंमत पाहिजे असेल तर द सिक्रेट लेखिका राॅन्डा बर्न हे पुस्तक ऍमेझॉन सारख्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आपण ते केव्हाही मागू शकता आणि आपल्यासाठी त्याचा पाहिजे तसा सुंदर उपयोग करू शकता. आपल्याला परवडत नसेल तर एखाद्या लायब्ररीमधून आपण हे पुस्तक घेऊ शकता आणि त्याचे वाचन करून आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करू शकता.

डॉक्टर आंबेडकरांनी म्हटले आहे वाचाल तर वाचाल त्यांच्या विचारांशी मी अगदी सहमत आहे माणसाने भरपूर वाचन केले पाहिजे. माणूस अध्ययनशील असला पाहिजे अध्ययनशील असलेल्या व्यक्तीला एक प्रकारची समृद्धी अनुभवायला भेटते. ही समृद्धी वैचारिक समृद्धी असते. वैचारिक समृद्धीने कोणताही माणूस अधिकाधिक परिपक्व होत जातो. त्याच्या मानसिक क्षमता वृद्धिंगत होतात.या क्षमता वृद्धिंगत झाल्या म्हणजे त्याच्या जगण्याला काही सुंदर अर्थ प्राप्त होत असतो.

पुस्तक वाचले नाही आपल्यातील सकारात्मकता निश्चितच वाढेल आपल्यामधील नकारात्मक बाबी कमी होतील. आपल्या मनाला आलेली निराशा निश्चितच कमी होईल. निराशेतून आपण मागे फिरायला हे पुस्तक आपल्याला मदत करू शकते. कोणताही व्यक्ती सकारात्मक पद्धतीने विचार करून आपल्या वर्तनामध्ये बदल करू इच्छित असेल तर द सीक्रेट हे पुस्तक त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरेल असे माझे स्पष्ट मत झाले आहे.

आपल्या जीवनामध्ये काही सकारात्मक बाबी निर्माण होणे अतिशय आवश्यक असते. या सकारात्मक बाबी निर्माण करण्याची प्रचंड शक्ती या पुस्तकामध्ये आहे. लेखिका आणि तिच्या सहकाऱ्यांनी या पुस्तकासाठी खूप कष्ट केले आहे. आपणही हे पुस्तक वाचून आपल्या जीवनाला चांगली दिशा देऊ शकाल इतके ते महत्वपूर्ण आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रश्न असतात मानसिक दृष्ट्या जर एखादा व्यक्ती खचला तर आर्थिक प्रश्न सोडवण्यामध्ये त्याला अपयश येऊ शकते.आपल्याला जर अशी अपेक्षा आली असेल तर, आपल्यासाठी हे पुस्तक एक औषधी म्हणून काम करेल. मला आशा आहे आपण हे पुस्तक नक्कीच वाचा आणि एका समृद्ध जीवनाची सुरुवात कराल.

आपल्या यशस्वी वाटचालीसाठी द सिक्रेट हे पुस्तक रॉन्डा बर्न यांचे पुस्तक शंभर टक्के खात्रीने फायदेशीर ठरेल असं सकारात्मक थिंकिंग करून थांबतो.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment