भारतीय ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.रंगनाथन Father of Library Science S.R.Rangnathan

 ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.रंगनाथन Father of Library Science S.R.Rangnathan

भारतीय ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.रंगनाथन Father of Library Science S.R.Rangnathan या लेखात आपण भारतीय ग्रंथालयशास्त्राचे(Library science)प्रणेते एस.आर.रंगनाथन यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

Father-of-Library-Science-S.-R.-Rangnathan
भारतीय ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.रंगनाथन Father of Library Science S.R.Rangnathan

काही माणसे त्यांची दिशा नियतीने कोणती ठरवली आहे; तिकडे मार्गक्रमण करताना दिसत नाहीत.ते वेगळ्याच दिशेने .चाललेले असतात परंतु नियतीच्या मनात वेगळेच काही असते. अशा माणसांना आपल्या पद्धतीने हव्या त्या वळणावर नियती नेत असते. अशाच थोर माणसांपैकी डॉ. एस. आर. रंगनाथन हे व्यक्तिमत्व होते.

डॉ.एस. आर. रंगनाथन भारतीय ग्रंथालयशास्राचे प्रणेते,ग्रंथालय क्षेत्रास नवीन आयाम देणारे एक लोकविलक्षण व्यक्तिमत्व होते. ग्रंथालयशास्त्रातील त्यांच्या योगदानास तोड नाही.आधुनिक ग्रंथालयांच्या विकासाचा पाया रचण्यात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे.

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी

ग्रंथपाल दिन

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करुन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा यथोचित गौवरवही केला होता. अशा या प्राध्यापक आणि संशोधक विभुतीचा जन्मदिवस भारतीय ग्रंथालय जगतात ग्रंथपाल दिवस म्हणुनही साजरा केला जातो.

डॉ. रंगनाथन यांच्या कार्याबद्दल ग्रंथालयशास्राशी संबंधितांना माहिती आहेच.सर्वसामान्यांही व विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय व्हावा आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती व्हावी यासाठीच हा लेखन प्रपंच.

जन्म आणि शिक्षण

ब्रिटिश भारतातील मद्रास प्रांतामध्ये तंजावर जिल्ह्यामध्ये शियाळी नावाचे छोटेसे गाव आहे हे या गावात दिनांक 12 ऑगस्ट 1892 या दिवशी डॉ. रंगनाथन यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मस्थळावरुन त्यांचे नाव शियाळी असे ठेवले होते. दक्षिण भारतात गावाच्या नावावरून व्यक्तीचे नाव लिहिण्याची एक पूर्वापार प्रथा आहे .त्या गोष्टीला हे अनुसरून होते.

प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर रंगनाथन शियाळी येथील हिंदू हायस्कूलमध्ये गेले. डॉ. रंगनाथन यांनी विद्यार्थीदशेतच संस्कृत साहित्याचे अध्ययन सुरू केले होते. मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये रंगनाथन यांनी बी.ए.ची पदवी मात्र इंग्रजी विषयामध्ये प्राप्त केली.

गणिताचे प्राध्यापक ते ग्रंथपाल म्हणुन कार्यभारः

बी.ए.नंतर पुढे 1916 मध्ये रंगनाथन एम.ए. गणित विषय घेवुन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. डॉ. रंगनाथन यांनी उच्च शिक्षण मिळवले. आता त्यांना अध्यापनशास्त्राची पदवी मिळवायची होती. त्यांनी अध्यापनशास्त्राची एल.टी.ही पदवी मिळवली.

ते गणिताचे प्राध्यापक झाले. खरे तर डॉ. रंगनाथन यांना ग्रंथपाल कधीच व्हायचे नव्हते, त्यांना गणिताचे प्राध्यापकच व्हायचे होते. ते ग्रंथालयशास्र क्षेत्रात कसे अनावधानाने आले याची कबुली त्यांनी नंतर आपल्या आत्मचरित्रात (A Librarian looks Back) दिलेली आहे.

पुढे कधीच त्यांना या गोष्टीचा पश्चाताप आणि वा खंत वाटली नाही. असेही त्यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले.

मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणुन जबाबदारी सांभाळत असतानाच परदेश गमनाची संधी देखील मिळाली होती.तत्कालीन मद्रास विद्यापीठाने डॉक्टर रंगनाथन यांना स्वतःच्या खर्चाने  स्कूल ऑफ लायब्ररियनशिप साठी युनायटेड किंगडम मधील लंडन येथे पाठविले होते.

डॉक्टर रंगनाथन यांनी लंडन विद्यापीठाचा अभ्यासक्रम एक वर्षात पूर्ण केला आणि ते परत आपल्या मातृभूमी मध्ये परतले. डॉक्टर रंगनाथन यांनी 30 जानेवारी 1928 या दिवशी मद्रास ग्रंथालय संघाचे स्थापना केली.

त्यावेळी सार्वजनिक ग्रंथालयांना असंघटित स्वरूप होते.ग्रंथालय संघाच्या स्थापनेमुळे ही ग्रंथालये संघटित झाली. नंतर सर्वच अध्ययन, अध्यापन कार्याव्यतीरीक्त डाॅ. रंगनाथन यांनी ग्रंथालयशात्राशी संबंधीत नवीन व दर्जेदार अशी साहित्यनिर्मितीही केली आहे.

ग्रंथालय व माहितीशास्रात कित्येक नवीन तंत्राचा आणि शास्त्रीय पध्दतींचा शोध लावला.उत्तम उदाहरण द्विबिंदू वर्गीकरणाचे देता येईल विबिंदु वर्गीकरणा Colon Clasification) पध्दतीमुळे जगातील वाचनसाहित्याचे सखोल वर्गीकरण करणे शक्य झाले.ज्यामुळे जगातील ग्रंथालयशास्रात भारताची स्वतंत्र ओळख बनली.

एवढेच नाही तर त्यांच्या ग्रंथालयशात्राचे पाच नियम (five Laws of Library Science) या ग्रंथाने वर्गीकरण आणि सूची classification and Bibliography) या साधनांना प्रमाणके (Standards) चा दर्जा मिळाला.डाॅ.रंगनाथन यांनी खुप दर्जेदार ग्रंथाचे वाचन केले आणि जवळपास 60 ग्रंथ आणि 2000 पेक्षाही जास्त लेख लिहिले.

मिळालेले मानसन्मान

रंगनाथन यांनी ILA (Indian Library Association भारतीय ग्रंथालय संघटनेचे काही वर्षे अध्यक्षही राहिले होते.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) ग्रंथालय समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना विद्यापीठ व महाविदयालयीन ग्रंथालयांची वाढ व विकास कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले होते. परदेशात तसेच स्वदेशातही विविध पदवी देवुन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

अमेरिकेने त्यांना सन 1964 मध्ये पीटसबर्ग विद्यापीठाची डी.लीट.पदवी देवून पहिल्यांदाच कोण्या बिगर अमेरिकी व्यक्तीचा सन्मान केला होता.भारताने देखिल त्यावेळच्या सरकारने त्यांना रावसाहेब या उपाधिने गौरविले होते.दिल्ली विद्यापीठानेही सन 1948 मध्ये डी.लीट. पदवी रंगनाथन यांना बहाल केली.

भारत सरकारने १९५७ मध्ये पद्मश्री बहाल केली. 1965 मध्ये अजुन एक National Research Professor in Library Science पदवी देवुन त्यांना त्यावेळच्या ख्यातनाम संशोधक, अभ्यासक डॉ. सी.व्ही रामन (Physics) पी.व्ही काणे (Law) एस.के. चटर्जी Literature & Linguistics) या दिग्जांच्या रांगेत नेवुन बसविले. सन 1970 मध्ये त्यांना मार्गारेट मान हे बहुमानाचे पदक मिळाले.

एक दानशूर व्यक्तिमत्व

भारत हा दानशूर परंपरा असलेल्या लोकांचा देश आहे. डाॅ.रंगनाथन हे एक दानशुर व्यक्तीमत्व होते. त्यांची बुध्दी जेवढी विशाल होती तेवढेच त्यांचे हृदयही विशाल होते .1961 मध्ये शारदा रंगनाथन इण्डोमेंट ट्रस्ट, बेंगलोर यांना आपली मोठ्यात मोठी धनराशी समर्पित करुन दार्तृत्वाचे उदाहरण घालून दिले.या त्यांच्या आर्थिक योगदानामुळेच ग्रंथालयशास्रातील उच्च प्रतिचे प्रशिक्षण आणि प्रकाशनाला उत्तेजन मिळाले.

डॉ. रंगनाथन यांच्या Colon Classification आणि Classified Catalogue Code या ग्रंथालय संहितामुळे भारताचे नाव ग्रंथालय जगतात आजही आदराने घेतले जाते.

विदयापीठ व महाविदयालयाचे ग्रंथालयाचे ग्रंथपाल हे पद शिक्षकासमान आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या सेवाशर्ती, वेतनमान आणि इतर संशोधन सुविधाही प्राध्यापकांप्रमाणेच असाव्यात.

यासाठी ठाम भूमिका मांडली व ग्रंथपालांना विद्यापीठ कायद्यान्वये दर्जा प्राप्त करुन दिला.रंगनाथन पर्वाची सांगता ग्रंथालयशास्त्राच्या पंचसूत्री ग्रंथापासूनच खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.ग्रंथालय व माहितीशास्राच्या प्रत्येक क्षेत्रात भरीव कार्य केले. त्यांच्या कार्यपध्दतीवर, तंत्रावर त्यांनी सुचविलेल्या शिफारसीवर आजही ग्रंथालय व माहितीशास्र संबंधित सेमिनार,कॉन्फरन्समध्ये प्रमुख विषय म्हणून घेतले जातात.

डॉ.एस.रंगनाथन यांच्या विचाराने एका आंदोलनास जन्म दिला. त्यांचे गुरु सेयर्स यांनी या काळाला रंगनाथन युग असे नाव दिले. डॉ.रंगनाथन यांना कित्येक पदव्या, मानसन्मान मिळाले असले तरी त्यांच्याकडे विलक्षण नम्रता होती.॰त्यांचा स्वभाव ज्ञानसाधना करणार्‍या महान योग्याचा होता. त्या अर्थाने ते ज्ञानयोगी होते.

ते विदयार्थ्यांना नेहमी सांगत, “नियतीने मला एक साधन म्हणून निवडले आहे, मला मिळालेले मानसन्मान, हे ग्रंथालयशास्र व सेवा याकरीता आपले आयुष्य तन, मन, धनाने समर्पित करण्यासाठी सदैव तरुण ग्रंथपालांना प्रेरणादायी राहतील.” त्यांचे हे विचार प्रत्येक ग्रंथालयशास्त्राच्या विद्यार्थ्याला प्रेरणा देत राहतील.

अशा या थोर महात्म्याचे आपल्या वयाच्या 80 व्या वर्षी 27 सप्टेंबर 1972 रोजी निधन झाले आणि ग्रंथालय व माहितीशास्राला नवीन आयाम देणारेएक महान पर्व संपले. डॉ.रंगनाथन हे ग्रंथालयशास्त्राचे सुवर्णयुग निर्माते होते. त्यांनी दिलेले विचार आम्हां ग्रंथपालांना आजही दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आणि प्रेरक ठरतात.

प्रा.सचिन वाघ
ग्रंथपाल,
सि.गो.पाटील महाविद्यालय साक्री, धुळे

Share on:

3 thoughts on “भारतीय ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.रंगनाथन Father of Library Science S.R.Rangnathan”

  1. आमचे परममित्र श्री तुकाराम गायकर सर जे अतिशय कृतीशील, अभ्यासू आणि अभिनव प्रयोग करणारे शिक्षक म्हणून सुपरिचित आहेतच. ते चालवीत असलेल्या schoolington या ब्लॉग द्वारे सर्वच क्षेत्रातील विद्वजनांना आपल्या क्षेत्रातील माहिती प्रसारित आणि प्रसिध्द करण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.त्यांनी स्वीकारलेल्या या कार्याला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
    ग्रंथपाल प्रा. सचिन उदय वाघ
    सी.गो. पाटील महाविद्यालय,साक्री( धुळे)

  2. सखोल ज्ञान व शब्द रचना मस्त
    लेख वाचल्यानंतर मला खूप आवडला
    व छान लिखाण केले

Leave a Comment