स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पूर्ण नाव काय होते?Savarkar full name

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पूर्ण नाव काय होते? Savarkar full name

Table of Contents

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पूर्ण नाव काय होते? Savarkar full name हा प्रश्न अनेकांना पडतो.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे 28 मे 1883 रोजी झाला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पूर्ण नाव काय होते? ( Savarkar full name) हा प्रश्न किमान महाराष्ट्रीय माणसाला तरी निश्चितच पडायला नको. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुस्तानच्या इतिहासात ऐतिहासिक असे योगदान आहे. एक क्रांतिकारक म्हणून त्यांनी जे कार्य केले; त्याचप्रमाणे हिंदू धर्मियांना आपल्या स्वतःची ओळख देण्यासाठी हिंदुत्वाचे जे तत्त्वज्ञान मांडले;त्या तत्त्वज्ञानाने स्वातंत्र्यवीर सावरकर अजर अमर झालेले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन Swatantryaveer Savarkar Gaurav Din in Marathi

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे कोण होते?

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, राजकारणी, तत्त्वज्ञ,समाजसुधारक मराठी लिपी शुद्धी चळवळीचे जनक, भाषा शुद्धी चळवळीचे जनक, कादंबरीकार, महाकवीची प्रतिभा असलेला कवी, नाटककार, महान वक्ता,द्रष्टा नेता, हिंदुत्ववादी तत्त्वज्ञानाचा जनक अशा अनेक गोष्टी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत सांगता येतील.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे?


आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥ 
अर्थ:- सिंधू नदीपासून सिंधू महासागरापर्यंत जी काही भारतभूमी आहे त्या भारतभूमीला जो आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू होय.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आईचे नाव काय होते?


स्वातंत्र्य सहकार यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. तर वडिलांचे नाव दामोदर असे होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नीचे नाव काय होते?


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नीचे नाव यमुनाबाई असे होते. सर्वजण त्यांना माई या टोपण नावाने संबोधत असत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना किती मुले होती?


स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रभाकर आणि विश्वास ही दोन मुले होती. प्रभा व शालिनी या दोन मुली होत्या.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती संघटना स्थापन केली?


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. तिचे पूर्वीचे नाव मित्रमेळा असे होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शिक्षण कुठे झाले?

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्राथमिक शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय नाशिक येथे झाले. तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली. पुढे इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती पुस्तके लिहिली?

अखंड सावधान असावे

१८५७ चे स्वातंत्र्यसमर

अंदमानच्या अंधेरीतून

अंधश्रद्धा भाग १

अंधश्रद्धा भाग २

संगीत उत्तरक्रिया

संगीत उःशाप

ऐतिहासिक निवेदने

काळे पाणी

क्रांतिघोष

गरमा गरम चिवडा

गांधी आणि गोंधळ

जात्युच्छेदक निबंध

जोसेफ मॅझिनी

तेजस्वी तारे

नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन

प्राचीन अर्वाचीन महिला

भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

भाषा शुद्धी

महाकाव्य कमला

महाकाव्य गोमांतक

माझी जन्मठेप

माझ्या आठवणी – नाशिक

माझ्या आठवणी – पूर्वपीठिका

माझ्या आठवणी – भगूर

मोपल्यांचे बंड

रणशिंग

लंडनची बातमीपत्रे

विविध भाषणे

विविध लेख

विज्ञाननिष्ठ निबंध

शत्रूच्या शिबिरात

संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष

सावरकरांची पत्रे

सावरकरांच्या कविता

स्फुट लेख

हिंदुत्व[२९]

हिंदुत्वाचे पंचप्राण

हिंदुपदपादशाही

हिंदुराष्ट्र दर्शन

क्ष – किरणें

१८५७ चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

1857 च्या स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आहेत.

सागरा प्राण तळमळला हे गीत कुठे रचले गेले?

स्वतंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सागरा प्राण तळमळला हे गीत इंग्लंड येथे समुद्रकिनारी रचले.

काळे पाणी हे पुस्तक कोणी लिहिले

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी काळे पाणी हे पुस्तक लिहिले

हिंदू पद पादशाही पुस्तक कोणी लिहिले

हिंदू पद पादशाही हे पुस्तक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment