व्होल्गा ते गंगा एक ऐतिहासिक कथात्मक प्रवास Volga To Ganga Story of historical journey

व्होल्गा ते गंगा एक ऐतिहासिक कथात्मक प्रवास Volga To Ganga Story of Historical Journey

व्होल्गा ते गंगा
लेखक   राहुल सांकृत्यायन
प्रकाशक लोक वाड;मय गृह मुंबई
आवृत्ती बारावी (I) :डिसेंबर २०१०
मूल्य रु.१५०/-
ISBN 81-86995-14-5

Volga To Ganga Story of historical journey

ग्रंथपाल,प्रा. सचिन वाघ
सी.गो.पाटील महाविदयालय साक्री,
धुळे

व्होल्गा ते गंगा या पुस्तकाच्या माध्यमातून राहुल सांकृत्यायन यांनी भारताच्या प्राचीन इतिहासाविषयाची माहिती कथात्मक स्वरूपामध्ये मांडली आहे. ही एक ऐतिहासिक कादंबरी असून यामध्ये राहुल सांकृत्यायन यांनी  केलेल्या विविध देशातील भूप्रदेशांची व तेथील सामाजिक जीवनाचा पूर्वइतिहास विविध पात्रांच्या आधारे जिवंत करण्याचा सुंदरसा प्रयत्न, वाचकांना या ग्रंथाचे वाचन करताना लक्षात येतो .

सामाजिक क्रांतीविषयक त्यांनी मांडलेले विचार सफदर व शंकर यांच्या संवादातून ‌ प्रकट केले आहेत. ते क्रांतिकारी विचार आजही तितकेच प्रेरणादायी व उपयुक्त ठरतात.”प्रत्येक युगात सर्वांत सामर्थ्यवान क्रांतीकारी शील व शक्ती जनतेतून प्रकट होत असते”

लेखकाचा परिचय : महापंडित राहुल सांकृत्यायन  हे नाव त्यांनी बौद्ध धर्म स्विकारला तेव्हापासून  धारण केले.त्यांचे मूळ नाव केदारनाथ पांडे असे होते. जन्म ९ एप्रिल १८९३ रोजी आझमगड (उत्तर प्रदेश )येथील पन्दाहा या खेडेगावी एका सर्वसाधारण शेतकऱ्याच्या घरी झाला. त्यांचे बालपण आजोळी पन्दाहा या गावीच व्यतीत झाले.त्यांचे आजोबा ब्रिटिश लष्करात होते.

नेमबाजीतील त्यांच्या प्राविण्यामुळे बड्या अधिकार्‍यांसोबत ऑर्डली म्हणून फिरण्याचा प्रसंग वारंवार येई  व यानिमित्ताने अजिंठा,वेरूळ, याठिकाणी फिरण्याचा प्रसंग त्यांच्यावर अनेकदा आला. या निमित्ताने अजिंठा वेरूळ वगैरे ठिकाणे पाहावयास मिळाली. या स्थळांचे रसभरीत वर्णन लेखकाला आपल्या आजोबांच्या तोंडून बालपणीच ऐकायला मिळाले. लेखकाला प्रवासप्रियतेचे व संशोधनाचे बाळकडू लहानपणीच मिळाले होते. लेखकाने अयोध्या, हरिद्वार, गंगोत्री, जम्नोत्री वगैरे ठिकाणी दूरवरचा प्रवास केला.

बनारस येथे संस्कृतचा अभ्यास करून व्याकरण व काव्य यांचा चांगला परिचय करून घेतला. ते 1912 साली बिहारमधील मठात जाऊन वैष्णव साधू बनले होते. त्यांचे मन नेहमी सत्य शोधण्यासाठी हपापलेले असायचे. मठातील जमीनदारी खंडाबाबत व जमिनीच्या मालकी हक्काबाबत शेतकऱ्यांशी होणारे कलह याबद्दल लेखकाला खेद वाटायचा.मठाची बाजू न घेता शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांना न्याय मिळवून देत असत.

अखिल भारतीय किसान सभेच्या भावी अध्यक्षाच्या राजकीय शिक्षणाची सुरुवात याच काळात झाली होती.लेखकाने  काही काळ आर्य समाज प्रचारक म्हणूनही कार्य केले.आर्य समाज प्रचार आणि प्रसाराकरिता बहुमोल योगदान दिले.लेखकाला मवाळ क्रांतीपेक्षा जहाल क्रांतीविषयी जास्त ओढा होता. लेखकाच्या जीवन कार्यालाच काय पण संपूर्ण  जगाच्या इतिहासाला नवे वळण देणारी घटना होती  1917 झालेली रशियन क्रांती! यामुळेच लेखकाच्या जहाल विचारांच परिवर्तन मवाळ विचारात झाले होते.

रशियन राज्यक्रांती, लेनिनच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी १९१८ साली ‘बाईसवी सदी’ (२२वे शतक) ग्रंथाचा आराखडा  तयार करूनही कामाच्या व्याप्तीमुळे १९२४ पर्यंत ग्रंथ पुरा करता आला नाही. नेपाळच्या तराईत वास्तव्यास असताना वेदांत विरुध्द बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली. लुंबिनी, कुसिनारा , जेतवन, वैशाली इत्यादी बौद्ध इतिहासातील सुप्रसिध्द स्थळांना त्यांनी भेटी दिल्या.

याचदरम्यान त्यांची बौध्द तत्वज्ञानाचा स्वीकार करण्याची मानसिकता बनली होती. याचवेळी देशात असहाकरितेची चळवळ जोर धरत होती.सहकाराच्या देशव्यापी आंदोनात सक्रीय सहभागी होऊन कारावासही भोगला होता.याच कालावधीत त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्याचा लोकप्रिय  नेता म्हणून नावलौकिक मिळवला होता.

रशियन क्रांतीचा संदेश ते बिहारी शेतकऱ्यांना हिंदीत न देता भोजपुरीतून देत. त्यामुळेच ते त्यांचे प्रिय वक्ते बनले होते. क्रांतीसाठी नुसते भाषण देणाऱ्या नेत्यांपैकी ते नव्हते. जनतेच्या तात्कालिक अडचणी जनतेत जाऊन सोडवाव्यात यावर त्यांचा विशेष भर असे.

बौध्द ग्रंथाचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी ते श्रीलंकेला गेले. तेथे त्यांनी दीड वर्षाच्या कालावधित पाली भाषेतील बौद्ध ग्रंथाचे परिशीलन करून त्यांनी  त्रिपिटीकाचार्य ही पदवी संपादन केली.बौद्ध संप्रदायातील मागाहूनच्या काळातले महत्वाचे ग्रंथ पाली भाषेत नसून तिबेटी भाषेत आहे, यासाठी ते तिबेटला गेले. तिबेटचा खडतर प्रवासात व तेथील हलाखीचे वर्णन त्यांनी “तिब्बत में सव्वा वर्ष” पुस्तकात केले आहे.

तिबेटहून २२ खेचरांवर हस्तलिखितांनच्या बाडांचे ओझे  म्हणून आणलेले  सांस्कृतिक अनमोल धन त्यांनी पाटणा मुझियमला देऊन टाकले. राहुल सेक्शन म्हणून पाटणा संग्रहालयात एक विभाग असून तेथील चित्रांना मानव जातीचा बहुमोल सांस्कृतिक वारसा म्हणून अढळ स्थान मिळाले आहे.

याचसुमारास त्यांनी लंकेत जाऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेऊनच ते स्वदेशी परतले.तिबेटहून आणलेल्या ग्रंथाचे अभ्यास व संशोधन करताना त्यांनी वसूबंधू ( सुमारे इ. स. ३७५)याचा अभिधर्मकोश संस्कृत भाषेत १९२१ साली प्रसिद्ध केला. याखेरीज बुद्धचर्या या नावाने गौतम बुद्धांचे चरित्र लिहून प्रसिद्ध केले.पाली भाषेतील अत्यंत प्राचीन ग्रंथाच्या आधारे लिहिलेल्या या संशोधनात्मक चरित्राला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

लेखकाचे पांडित्य त्यांनी लिहिलेल्या ग्रंथ संपदेवरुन समजते.ज्यात त्यांची त्यांची प्रगल्भ बुध्दीमत्ता,सखोल अभ्यास, चिंतन तसेच जगाचा व्यापक अनुभव प्रतिबिंबित झाला आहे. असा तो साहित्य सागर आहे. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथावरून त्यांच्या प्रज्ञा आणि प्रतिभेची साक्ष पटते. महापंडित राहुलजींनी कित्येक नियतकालिकांमध्ये खूप सारे लेख लिहिले.

पुस्तके प्रवासपर वर्णने कथा कादंबऱ्या व अनुवादित कादंबरी यांची संख्या  वीस आहे. मेरा जीवन चरित्र दोन कोश उद्देश प्रदेशाची माहिती देणारे नऊ पुस्तके आहेत. भोजपुरी भाषेत छोटी नाटके लिहिली.

बौद्ध धर्मावर सहा पुस्तके, राजकारण व समाजवाद यावर 13 पुस्तके, तत्वज्ञान विषयक तीन पुस्तके, साहित्य आणि इतिहास या विषयावर तेरा पुस्तके, संस्कृतमध्ये अनुवाद धरून तेरा पुस्तके, तिबेटी भाषा व्याकरण यावर पाच पुस्तके, विश्वाच्या रचनेसंबंधी शास्त्रीय विवेचन करणारे एक पुस्तक व संस्कृतमध्ये ताडपत्रावरील लिहिलेले तत्त्वज्ञान व धर्म या विषयावरील संपादित आठ पुस्तके असा त्यांचा ग्रंथपसारा आहे.

अशा जगद़वंद्ध पंडितांचा अंत १४ एप्रिल १९६३ रोजी झाला.

व्होल्गा ते गंगा या ग्रंथात ख्रिस्तपूर्व ६०००ते इ.स. १९२२ पर्यंतच्या मानवी समाजाच्या प्रगतीचे ऐतिहासिक, आर्थिक व राजकीय वस्तुस्थितीच्या आधारे ललित कथांच्या स्वरुपात संपूर्ण चित्रण पहावयास मिळते. पुस्तकाची पहिली कथा निशा प्रमुख पासून सुरू होते.निशा ही कथा इ.स.पू्र्व ६००० वर्षाचे प्रतिनिधित्व करते.

व्होल्गाकाठचा प्रदेश येथील निसर्गाची विहंगमय दृश्ये त्याकाळी अस्तित्त्वात असलेल्या हिंदी युरोपियन जाती, स्त्रीसत्ताक पध्दती, मानवाच्या रानटीपणाविषयी माहिती मिळते. दिवा हे पात्र सव्वादोनशे पिढ्या पूर्वीच्या एका आयोजनाची ही कहाणी आहे. त्यावेळी भारत, इराण आणि रशिया मधल्या गौर जाती या एकच होत्या. त्यांना हिंदीच लाव किंवा शतक वंश असे म्हणतात.

अमृताश्व इ.स.पूर्व३०० वर्षे ही कथा आजपासून दोनशे पिढ्या पूर्वीची एका आर्यजनाची  कहाणी आहे. त्यावेळी भारत आणि इराणमधील श्वेत जातींचा एकच कबिला जन होता व त्याचे नाव आर्य असे होते. पशुपालन हे त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन होते.पुरूहित इ.स.पूर्व२५०० आजच्या आधी एकशे ऐंशी पिढ्या पूर्वीच्या आर्यजनाची ही कथा असून या जनांपैकी कित्येकांचे वंशज भारताकडे प्रस्थान करणार होते. त्यावेळी शेती आणि तांबे यांचा प्रचार चालू झालेला होता.

आर्यांनी दास प्रथा स्वीकारली व पुन्हा ती विस्मृत करण्याची त्यांची इच्छा होती. याविषयीचे वर्णन या कथेत वाचावयास मिळते.अंगिरा इ.स.पूर्व १८०० वर्ष  आजपासून १५२पिढ्यापूर्वीची कथा आहे.अंगिरा ऋृषिचा काळ हा श्रृती आणि स्मृतीला महत्त्व देणारा होता.याकथेतच शंभर,देवता, असुर यांच्या द्वंद्वाचे रसभरित वर्णन आहे.सुदास इ.स.पूर्व १५०० म्हणजे आजच्या पूर्वी १४४ पिढ्यांआधीच्या आर्यजनाची ही कथा आहे.

याचवेळी पुराणातील ऋषी, विश्वमित्र,भारद्वाज हे ऋग्वेदातील मंत्राची रचना करीत होते.याच काळात आर्य पुरोहितांच्या मदतीने कुरुपंचालातील आर्य-सामंतांनी प्रजेच्या अधिकारावर आघात करुन दास्यप्रथा सुरू केली.प्रवाहण ही कथा इ.स. सन पूर्वी ७०० वर्ष आजच्या पूर्वी १०८ पिढ्यांआधीची कथा असुन प्रवाहण आणि लोपा या व्यक्तीरेखेतून मालक आणि गुलाम, पुनर्जन्माच्या भरवशाची कटुता,कष्ट ,अन्याय, स्वर्ग, नरक या उपनिषिदातील गोष्टीचं ब्रम्हज्ञान रचायला सुरुवात झाली होती.

भारतीय ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.रंगनाथन Father of Library Science S.R.Rangnathan

याच काळात उद्यान व शुध्द लोखंडाचा प्रचार भारतात सुरू झाला. धन धुंद मल्ल इ.स.पूर्वी ४९० वर्षे आजच्या पूर्वी शंभर पिढ्या आधीची ही एक ऐतिहासिक कथा आहे. या काळात सामाजिक विषमता खूप वाढलेली होती. श्रीमंत व्यापारी वर्ग समाजात महत्त्वाचे स्थान पटकावून बसले होते. पण लोकांचा रस्ता दाखविणारे नरकातून उद्धार करणारे किती पथप्रदर्शक निर्माण झालेले होते. परंतु गावागावातून दास्यतेचा नर्क धडधडत असून देखील त्यांनी आपल्या डोळ्यावर कातडे ओढून घेतले होते.

नागदत्त आणि विष्णूगुप्त यांच्यातील संवाद स्वामी आणि दास्य ही विषमता दर्शविते. तर सोफिया व नागदत्त यांच्या अमर प्रेमाची, त्यागाची साक्ष देते. “प्रभा” इ. स. पूर्व ५० वर्ष ही कथा असून यात साकेतनगरी जीला आपण आज अयोध्या म्हणून ओळखतो.या कथेत साकेत नगरी पुष्यमित्र किंवा  शुंग काळात वाल्मिकीने रामायणानिर्मिती ते अयोध्या कशी अस्तित्वात आली. याचा पूर्व इतिहास ज्ञात होतो.प्रभा आणि अश्वघोष यांच्या संवादातून अश्वघोषाच्या अमर साहित्याविषयी कळते.

दूर्मूख ही कथा इ.स.६३० वर्ष काळात सम्राट हर्षवर्धन यांचे आजचे लोकशाहीविषयक विचार याविषयी मार्गदर्शन करतात.जगद्विख्यात नालंदा विद्यापीठ लोकशाहीचा प्रसार करणार केंद्रच होते.अनिष्ठ सतीप्रथचे मूळ या कथेतून ज्ञात होते.प्रत्येक रोगावर औषध असतं; प्रत्येक संकटातून सुटका होऊ शकते; हा आशावाद या कथेतून मिळतो.

द सिक्रेट रहस्य राॅन्डा बर्न The secret by Rhonda Byrne in Marathi

चक्रपाणी इ.स.१२० याकाळी इस्लाम धर्माची नीतिमूल्ये  स्वातंत्र्य,समताआणि बंधूभाव झिडकारून सुलतानी राजांनी छळकपट, हत्या अशा सैतानी प्रवृतीना खत पाणी दिले.बाबा नुरदीन इ. स.१३०० सुरैय्या इ.स.१६००  या कथेमधुन स्त्री जीवन आणि त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्याची कल्पना येते.रेखा भगत इ.स.१८००शतकाचे प्रतिनिधीत्व करणारी कथा आहे.असाह्य अन्यायाचा उद्रेक क्रांतीत होतो. हे या कथेतील संवादातून समजते.

सफदर इ.स.१९२२ ही कथा स्वतंत्रपूर्व भारतात मा. गांधींच्या असहकार चळवळ व आंदोलनाला नाकारणारा मतप्रवाह होता. हे सफदर, सकीना आणि शंकर यांच्यातील संवादातून लक्षात येते.व्होलगा ते गंगा हा ग्रंथ वाचताना त्यातील शब्दालंकार निसर्ग वर्णन आणि सौंदर्यस्तुती मनाला मोहून टाकते. हा ग्रंथ मनाला समाधान तर देतोच या व्यतिरीक्त मानवी समाज आणि त्याची प्रगती याविषयी आपला विवेक ही जागृत करतो…

ग्रंथपाल,प्रा. सचिन वाघ
सी.गो.पाटील महाविदयालय साक्री,
धुळे

Share on:

Leave a Comment