11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन 11 July World Population Day

11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन 11th July World Population Day

दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन 11 July World Population Day म्हणून जगभर साजरा केला जातो. आज जगामध्ये लोकसंख्या हा विषय विविध स्तरांवर अभ्यासला जातो. त्याचप्रमाणे लोकसंख्या हा जगातील सर्व देशांचा चिंतेचा विषय बनत चालला आहे. या जागतिक लोकसंख्या दिन विषयक आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

वसुधैव कुटुंबकम् निबंध vasudhaiv kutumbakam The whole world is a family

लोकसंख्या दिन का साजरा केला जातो?

11 जुलै 1987 यादिवशी जगाची लोकसंख्या ही पाच अब्ज झाली. हा पाच अब्जचा आकडा जगातील सर्वच राष्ट्रांच्या नेतृत्व पुढे यक्षप्रश्न बनून उभा राहिला. अमर्याद लोकसंख्या वाढ हा जगाच्या चिंतेचा विषय बनला. ही दिवसेंदिवस होणारी लोकसंख्या वाढ रोखण्याचे विविध कार्यक्रम जगभर प्रत्येक देश राबवू लागला.

World Population Day: July 11, 2023

सन 1989 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास विषयक कार्यक्रम अर्थात जी. एन. डी. पी.  च्या गव्हर्निंग कौन्सिलने 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जावा अशी शिफारस केली. गव्हर्निंग कौन्सिलची ही शिफारस युनोने मान्य करत 11 जुलै हा दिवस 1989 पासून जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली.

लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या समस्यांची जाणीव निर्माण करणे; या समस्येविषयी जनजागृती घडविणे;या समस्येबाबत अभ्यास करणे; उपक्रम राबवणे; या कारणांसाठी 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन जगभरात साजरा केला जातो.

विविध उपक्रम राबून साजरा केला जातो 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन

जागतिक स्तरावर विविध कार्यक्रमांचे आखणी करून समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणून विविध उपक्रम राबवले जातात. विविध प्रकारच्या मंच्यावर चर्चासत्रे आयोजित केली जातात. देशभरामध्ये सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, व्याख्याने, कविता, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,कविता स्पर्धा, कार्यशाळा, पत्रकार परिषदा, गोलमेज परिषदा आयोजित केल्या जातात.

विविध वृत्तवाहिन्या आपल्या चॅनेलवर लोकसंख्याशास्त्र विषयक विविध अभ्यासू तज्ञ लोकांना बोलावून चर्चासत्रे आयोजित करून लोक जागृती करत असतात. विविध वाहिन्यांवर लोकसंख्याविषयक डॉक्युमेंट्री प्रक्षेपित केले जातात यातून नवा अभ्यास आणि निष्कर्ष जनते समोर ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न असतो जेणेकरून लोक जागृती होईल लोक लोकसंख्या विषयी अधिक जाणीव ठेवून वर्तन बदल करतील.

सन 2011 यासाठी जागतिक लोकसंख्या सात अब्जांवर पोहोचली.

सन 2011 यावर्षी जागतिक लोकसंख्येने आणखी एक मोठा टप्पा गाठला. यावर्षी जगाची लोकसंख्या 7अब्ज वर  पोहोचली. त्यामुळे सर्वच राष्ट्रांसमोरची चिंता आणखी वाढू लागली. त्यामुळे ‘प्रजनन विषयक आरोग्य सेवांची सार्वत्रिक उपलब्धता’ हा संदेश 2012 च्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने जगभर दिला गेला. त्यावेळी जगाची लोकसंख्या 7 अब्ज 2 कोटी 50 लाख 71 हजार 966 एवढी अवाढव्य झाली होती.

छोट्या कुटुंबाचे महत्व

छोटे कुटुंब सुखी कुटुंब, छोटे कुटुंब आरोग्यपूर्ण कुटुंब हा महत्वपूर्ण संदेश सुद्धा 2012 च्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने जगभर दिला गेला. कुटुंब छोटी असली तरी चालतील परंतु ती आरोग्यपूर्ण असली पाहिजे. आरोग्याच्या सुविधा समाजातील सर्व स्तरांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचल्या पाहिजेत. प्रजनन विषयक ज्ञान समाजातील प्रत्येक व्यक्तीला मिळाले पाहिजे.

लैंगिक शिक्षण म्हणजे काय? ही संकल्पना सुद्धा प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे आणि छोटे कुटुंब हे आर्थिक दृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या अधिकाधिक चांगले राहू शकते. त्यातूनच स्वतःच्या कुटुंबाचे आणि देशाचे सर्वच प्रकारचे म्हणजे आर्थिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहू शकते. असा महत्त्वपूर्ण संदेश सर्वच लोकांपर्यंत पोचवण्याचा मोठा प्रयत्न या निमित्ताने झाला.

लोकसंख्येचा विस्फोट अर्थात पाॅप्युलेशन बाँब

भारतामध्ये लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट झाला आहे. एखादा मोठा बॉम्ब जेव्हा फुटतो आणि हाहाकार माजतो त्याप्रमाणे पॉप्युलेशन बॉम्ब फुटला आहे .आपल्या भारत देशाच्या संदर्भामध्ये लोकसंख्या हा अतिशय गंभीर विषय बनला आहे . कारण भारताची लोकसंख्या ही अतिशय वेगाने वाढत चालली आहे. आज आज भारताची लोकसंख्या 135 कोटींवर पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे नियोजन करणे.

देशाच्या दृष्टीने दिवसेंदिवस अतिशय जिकिरीचे होत चालले आहे. लोकसंख्येच्या गरजा भागवणे ही अतिशय कठीण बाब झाली आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार केंद्रस्तरावर काम करताना या प्रश्नाला दुर्लक्ष करून पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्वच सरकार यांच्या दृष्टीने हा प्रश्न ऐरणीवरचा किंवा ज्वलंत ठरला आहे यात शंकाच नाही.

आपल्या भारत देशात गरिबीचे प्रमाण सरकारी आकड्यांवरून काही असले तरी अतिशय मोठे आहे. दारिद्र रेषेखालील ची व्याख्या काहीही असो दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची संख्या त्या आकड्यांपेक्षा नक्कीच चौपट असेल.परंतु याकडे राजकीय इच्छाशक्तीने न पाहता केवळ राजकीय गरज म्हणून पाहिले जाते आणि वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न अनुत्तरित राहतो.

लोकसंख्याविषयक कार्यक्रम हा जनतेचा कार्यक्रम झाला पाहिजे.

संपूर्ण भारतीय जनतेने लोकसंख्येच्या प्रश्‍कडे गांभीर्याने पाहून आपण प्रत्येक व्यक्ती या संदर्भात काही करू शकतो याची जाणीव ठेवून काम केले पाहिजे

सर्व स्तरांवर लोकसंख्या विषयक शिक्षण आरोग्य विषयक जाणिवा, स्री-पुरुष समानता, लैंगिक शिक्षण प्रजनन विषयक जाणीव, अशा  संकल्पनांवर काम करण्याची निकडीची गरज निर्माण झाली आहे. आरोग्य विषयक सुविधा सर्व दूर पोहोचल्या पाहिजेत आणि सर्वच आरोग्य दूतांना चांगल्या प्रकारचे आर्थिक संरक्षण सुद्धा दिले गेले पाहिजे; की जेणेकरून ते आपले उत्कृष्ट योगदान या कामासाठी देऊ शकतात.

आरोग्य विषयक समस्या आणि गरीबी यामुळे लोकसंख्येचा प्रश्न हा सोडविण्यासाठी कठीण जरी बनला तरी सर्व स्तरांवर जोरदार प्रयत्न झाले तर काहीही अशक्य नाही . याची जाणीव प्रशासकीय आणि राजकीय नेतृत्व आणि ठेवून तळमळीने काम करण्याची गरज आहे.

सारांश

11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करताना एवढेच म्हणावे वाटते की आता आहे इतकी लोकसंख्या जगाला पुरी असून त्या लोकसंख्येला अधिकाधिक समृद्ध आणि सुरक्षित बनविण्याची गरज आहे. कुठेतरी लोकसंख्यावाढ ही ती राहण्याची प्रचंड गरज आहे हे नक्की. तरच 11 जुलै  जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याला काही अर्थ राहील.

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment