जागतिक महासागर दिवस 2023 World Oceans Day 2023 In Marathi

जागतिक महासागर दिवस 2023 World Oceans Day 2023 In Marathi

World Oceans Day 2023 I
Image source UNSPLASH

जागतिक महासागर दिवस 2023 World Oceans Day 2023 In Marathi जागतिक महासागर दिवस 8 जून रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.

जागतिक महासागर दिन World Oceans Day 2023 In Marathi कधी साजरा केला जातो?

1992 मध्ये ब्राझील देशामध्ये रिओ डी जानेरिओ येथे जागतिक वसुंधरा परिषद भरली होती. या ठिकाणी महासागर आणि पर्यावरणाबाबत चर्चा करण्यात आली. कॅनडा या देशाने याबाबत चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर काही देशांनी महासागर दिन साजरा करायला सुरुवात केली. संयुक्त राष्ट्र संघटनेने 28 साली जागतिक महासागर दिन साजरा करण्याचे ठरवले व त्यानुसार 2009 या वर्षापासून जागतिक महासागर दिन साजरा केला जातो.

International Yoga Day 2023:Why Yoga Day Is Celebrated आंतरराष्ट्रीय योग दिवस का साजरा केला जातो?

जागतिक महासागर दिवस 2023 ची थीम काय आहे? What Is the Theme of World Oceans Day 2023?

जागतिक महासागर दिवस 2023 थीम पुढील प्रमाणे आहे.”भविष्यातील पिढ्यांसाठी आपण आपल्या अद्भुत सागरी संसाधनांचे जतन करणे आवश्यक आहे.”The theme for the United Nations World Oceans Day 2023 is “Planet Ocean: Tides are Changing”

जागतिक महासागर दिन 8 जून

जागतिक महासागर दिन का साजरा केला जातो?

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये महासागरांची महत्व मोठे आहे. महासागर आपल्याला प्राणवायू देतात महासागराकडून मानवाला प्रचंड प्रमाणात अन्न व इतर साधन संपत्ती उपलब्ध होते. समुद्र व महासागर यांचे प्रचंड प्रदूषण सुरू आहे. महासागरातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे. महासागरातील जीवसृष्टीचे संरक्षण व संवर्धन होणे हे पृथ्वीवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उगम महासागरातून झाला आहे. एक प्रकारे महासागर हे आपले जीवनदाते व अन्नदाते आहेत. त्यामुळे महासागरांचे संरक्षण होणे अतिशय गरजेचे आहे. म्हणून जागतिक महासागर दिन साजरा केला जातो.

आपण जागतिक महासागर दिवस कसा साजरा करू शकतो?

जागतिक महासागर दिनानिमित्त विविध ठिकाणी चर्चा सत्र आयोजित केली जातात व्याख्यानांच्या आयोजन केले जाते त्याचप्रमाणे महासागर किनाऱ्यांची स्वच्छता केली जाते पर्यावरणामध्ये महासागरांचे महत्त्व याबाबत जनजागृती होण्यासाठी आकाशवाणी दूरदर्शन विविध समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली जाते. आनंदीतास चित्रपट प्रदर्शन डॉक्युमेंटरी प्रदर्शन पोस्टर्स स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा अशा विविध माध्यमातून जागतिक महासागर दिन साजरा केला जातो.

जागतिक महासागर महिना म्हणजे काय?

जून महिन्यातील आठ तारखेला जागतिक महासागर दिन असतो यानिमित्ताने जून महिन्यामध्ये लोकांचे आरोग्य सुरक्षितता आणि समृद्धी यामध्ये महासागराचे असलेले अनन्य साधारण महत्व सुरक्षित करण्यात असलेले महासागरांचे महत्त्व याबाबत जनजागृती केली जाते.

जागतिक महासागर दिनाची कल्पना कोणत्या देशाने मांडली?

ही संकल्पना मूळतः1992मध्ये कॅनडाच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर ओशन डेव्हलपमेंट (ICOD) आणि ओशन इन्स्टिट्यूट ऑफ कॅनडा (OIC) यांनी रिओ डी जनेरियो, ब्राझील येथे आयोजित पृथ्वी समिट – UN कॉन्फरन्स ऑन एन्व्हायर्नमेंट अँड डेव्हलपमेंट (UNCED) मध्ये मांडली होती.

जागतिक महासागर दिनाचे महत्त्व

पृथ्वीवरील महासागरांनी पृथ्वीचा एकूण 71 टक्के भाग व्यापलेला आहे एवढेच नव्हे तर पृथ्वीवरील पाण्यापैकी 97 टक्के साठा महासागरांमध्ये आहे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था महासागरांवर अवलंबून आहेत जगभरातील अनेक जलमार्ग व्यापारी आणि प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.

महासागर केवळ 50 टक्के प्राणवायूच देत नाहीत तर अब्जावधी टन कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेण्याचे कामही करतात. मानवाचे जीवन आणि एकंदरीत जीवसृष्टी मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरील महासागरावर अवलंबून आहे.

महासागरांच्या प्रदूषणामुळे समुद्री जीवसृष्टी धोक्यात

आज मोठ्या प्रमाणामध्ये विषारी प्रदूषित पाणी समुद्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक ही समुद्रामध्ये सोडले जाते. याशिवाय जहाजे व इतर समुद्री वाहने यामुळे महासागरांच्या पाण्याचे फार मोठे प्रदूषण झाले आहे. हे जल प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे समुद्रातील हजारो माशांच्या जाती त्याचप्रमाणे समुद्र जिवांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

मानवी क्रिया कलाप्पांमुळे होणारी ही जीवसृष्टीची हानी कुठेतरी थांबली पाहिजे. पृथ्वीवर माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी समजला जातो. त्याचप्रमाणे निसर्गामध्ये ढवळाढवळ करणारा माणूसच असतो. समुद्री जीवांचे अस्तित्व आज मानवाच्या दयेवर अवलंबून आहे. इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीवर मात करणे गरजेचे आहे.

औद्योगिक क्रांती झाल्यानंतर जगभरात वायु प्रदूषण जलप्रदूषण माती प्रदूषण ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले आहे. मोठे मोठे देश महासागरांमध्ये अनुसरांच्या चाचण्या घेत आहेत. त्याचप्रमाणे क्षेपणास्त्रांच्या चाचण्या देखील महासागरांमध्येच होतात. एक प्रकारे महासागर हे मानवाच्या अति महत्वकांक्षी क्रियाकल्पांमुळे धोक्यात आले आहेत.

जागतिक महासागर दिनानिमित्त जनजागृती होणे अतिशय महत्त्वपूर्ण

जागतिक स्तरावर महासागरांच्या प्रदूषणाबाबत संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर एकत्र येऊन महासागरांचे संरक्षण व्हावे यासाठी काही निश्चित असा कार्यक्रम आखला जाणे गरजेचे आहे. विविध मोहीम राबवून महासागरांचे प्रदूषण रोखणे आजच्या काळाची अत्यंत निकड झाली आहे. या दृष्टीने जागतिक महासागर दिनाकडे आपल्याला एक जनजागृतीची महत्त्वपूर्ण संधी म्हणून पाहता येईल. महासागरांचे महत्त्व मानवी आणि इतर जीवसृष्टीच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे हे ठरवता येईल.[World Oceans Day 2023 In Marathi]

जागतिक स्तरावर असणारी संयुक्त राष्ट्र संघटना यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते. जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटनेने महासागरांचे संरक्षण संवर्धन होण्यासाठी ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. दरवर्षी जागतिक महासागर दिनाची एक थीम निश्चित केली जाते. संपूर्ण जून महिन्यामध्ये महासागर संवर्धनाबाबत त्याचप्रमाणे महासागरांच्या महत्त्व बाबत जनजागृती केली जाते.[World Oceans Day 2023 In Marathi]

जागतिक महासागर दिवस 2023 World Oceans Day In Marathi हा लेख महासागरांच्या बाबत जनजागृती होण्यासाठी या ठिकाणी लिहिला आहे.World Oceans Day 2023 In Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment