माझी तुझी रेशीमगाठ झी मराठी मालिका Mazi Tuzi Reshimgath Zee Marathi Series

माझी तुझी रेशीमगाठ झी मराठी मालिका Mazi Tuzi Reshimgath Zee Marathi Series

माझी तुझी रेशीमगाठ झी टीव्ही मालिका Mazi Tuzi Reshimgath Zee Marathi Series

झी मराठीवर आणि दर्जेदार मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्यापैकी अतिशय रंजक अशी मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ होय.माझी तुझी रेशीमगाठ झी टीव्ही मालिका Mazi Tuzi Reshimgath Zee Marathi Series

माझी तुझी रेशीम गाठ यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्रेयस तळपदे यशच्या आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहाच्या भूमिकेमध्ये अतिशय दर्जेदार आणि संपन्न अभिनय करताना प्रेक्षकांना भेटत आहेत. प्रेक्षकांसाठी दररोजची एक मेजवानी म्हटली पाहिजे. दोघांची भूमिका मध्यवर्ती आहे. त्यामुळे ही मालिका घराघरात अतिशय वेळ देऊन लोक आवडीने पाहत आहेत असे चित्र दिसून येते.

एक प्रेम कथा साकारताना अनेक कंगोरे या मालिकेला लाभले आहेत.उच्चशिक्षित असूनही एका पती नसलेल्या स्त्रीला समाजाकडून वेगवेगळ्या प्रकारे होणाऱ्या त्रासाला आज एकविसाव्या शतकातही कसे सामोरे जावे लागते; हे नेहाच्या भूमिकेतून दाखवले आहे. स्वतःच्या घरातील आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांकडून मानसिक छळ होत असताना नेहाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. सकारात्मक दृष्टिकोनाचे मूर्तिमंत स्वरूप म्हणूनही याकडे पाहता येईल.

श्रेयस तळपदे

यशची भूमिका मध्यवर्ती आहे.श्रेयस तळपदे अगदी सहजरित्या ही भूमिका साकारताना पाहायला भेटतो. एका उद्योगपती आजोबांचा जातो उद्योग सांभाळता सांभाळता पल्याच कर्मचार्‍याच्या नकळत प्रेमात पडतो आणि हे प्रेम निभावता निभावता आपल्या प्रेयसीची दुःखी स्वाभाविकपणे कमी कशी करता येते हे पाहत असतो. यशचा मित्र सुद्धा त्याला त्याचे समर्थक देत असतो. मित्राचा विनोदी स्वभाव यशच्या सुख आणि दुःखामध्ये साथ देत असतो.

या मालिकेमध्ये परी नावाची चिमुरडी मुलगी दाखवली आहे. अतिशय बोलकी आणि प्रत्येकाला तिचा सहवास हवाहवासा वाटत आहे. तिच्या स्वभावामध्ये जणू काही नेहाची सर्व स्वभाववैशिष्ट्ये उतरली आहेत असे दाखवले आहे. इतक्या लहान वयात मध्ये ही आपली भूमिका अतिशय सुंदर आणि दर्जेदार केली आहे. एखाद्या लहान मुलीला जेव्हा लहानपणीच डायबिटीस सारखा आजार विळखा घालतो. त्यावेळी तिची अवस्था किती वाईट असेल? परंतु तरीही त्या आजाराला धैर्याने सामोरे जाते. आईच्या सुखदुःखात सतत वाटेकरी असते. हे पाहणे फारच मनोरंजक आणि चित्तवेधक आहे.

माझी तुझी रेशीमगाठ झी टीव्ही मालिका Mazi Tuzi Reshimgath Zee Marathi Series मला खूप आवडते. तुमच्या घरातील सर्वजण ही मालिका आवडीने पाहतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या टीव्ही मध्ये परी पासून तर बंडूकाका पर्यंत सर्व व्यक्तिरेखा अतिशय सुंदर व संपन्न अभिनयाने साकारलेल्या आहेत.आवश्यक त्या ठिकाणी विनोदाचा शिडकावा आणि दुःखावर सकारात्मक विचारांची फुंकर यामुळे ही मालिका सर्वांना प्रेक्षणीय वाटते.

प्रत्येक वयाच्या प्रेक्षकाला ही मालिका नक्कीच आवडेल अशीच आहे. त्यामुळे लोकप्रियतेचे शिखर गाठलणे या मालिकेला माझी तुझी रेशीमगाठ झी टीव्ही मालिका Mazi Tuzi Reshimgath Zee Marathi Series सहज शक्य होणार यात काही संशय नाही.

सुजाण पालकत्व

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment