महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे State Animal Of Maharashtra Shekaru

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? State Animal Of Maharashtra Shekaru

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? State Animal Of Maharashtra Shekaru

महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू खार State Animal Of Maharashtra Shekaru आहे.बहुरंगी असणारा हा प्राणी वृक्षवासी प्राणी आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू State Animal Of Maharashtra Shekaru एक वैशिष्ट्यपूर्ण असा खारीचाच प्रकार आहे.

तक्षशिला जगातील पहिले विद्यापीठ World’s First University Taxila

शेकरू खारीचे शास्त्रीय नाव काय आहे?

Ratufa Indica हे शेकरू खारीचे शास्त्रीय नाव आहे. इंग्रजीत शेकरू खारीला इंडियन जायंट स्क्विरल किंवा मालाबार जायंट स्क्वेअर The Indian Giant squirrel or Malabar Giant squirrel असे म्हणतात. शेकरू खार हा सस्तन प्राणी आहे.

महाकवी कालिदास दिन का साजरा करतात?

शेकरू खार कोणते अन्न खाते?

शेकरू खार (State Animal Of Maharashtra Shekaru)हा तसा शाकाहारी प्राणी आहे.शेकरू खार विशेषतः फळे,फुले, कठीण कवचाची फळे, काही झाडांची साल खाते. काही प्रकारच्या उपप्रजाती या कीटक,पक्षांची अंडी सुद्धा खातात. म्हणजेच मांसाहारी सुद्धा आहेत. शिकारी पक्षी उदाहरणार्थ घुबड त्याचप्रमाणे बिबट्यासारखे प्राणी हे शेकरू खारीचे शत्रू आहेत.

शेकरू (Indian giant squirrel)

शेकरू खार कुठे आढळते?

पश्चिम घाट, पूर्वघाट, सातपुडा पर्वतरांगा, मध्य प्रदेशाचा काही भाग या भागात शेकरू खारीचे अस्तित्व आढळते. आर्द्र सदाहरित जंगलामध्ये शेकरू खार राहणे पसंत करते.उंच झाडावर शेकरू खारीला राहायला आवडते. हा वृक्षवासी प्राणी असल्यामुळे त्याचे अस्तित्व जमिनीवर क्वचितच आढळते. उंच उंच झाडांवर शेकरू खार घरटे करून राहते. सामान्यतः 11 मीटर उंच झाडांवर शेकरू खार राहते.

महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य, फणसाड आंबा घाटाजवळील जंगलामध्ये शेकरू खार आढळते. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा या वनपरिक्षेत्रामध्ये रायपूर जंगलात शेकरू पार्क हा 30 हेक्टर जागेत संरक्षित केलेला आहे. त्या ठिकाणी शेकरू खार आढळते. मेळघाट, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, तळकोकण अशा भागातही शेकरू खारीचे अस्तित्व आहे.

Ratufa Indica

शेकरू खारीचे घरटे

शेकरूखारी उंच वृक्षांवर राहते. दाट पानांच्या वृक्षांवर शेकरू खार राहणे पसंत करते. वृक्षांच्या टहाळ्या आणि पानांपासून शेकरू खार गोलाकार असे सुंदर घरटे बनवते. शेकरू खारीचे घरटे उंच ठिकाणी अतिशय पातळ फांद्यांना लटकलेले आढळून येते. त्याचे कारण असे की शिकारी पक्षी आणि प्राणी यांच्यापासून पिल्लांचे संरक्षण व्हावे.

शेकरू खारीचे घरटे शोधणे अवघड असते. पानगळीच्या ऋतूमध्ये विशेषतः हिवाळ्यामध्ये शेकरू खारीचे घरटे आपल्याला उंच झाडांवर लटकलेले दिसून येईल.एक शेकरू अनेक घरटी बांधते. अनेक घरटी बांधणे यामागे शिकारी पक्ष्यांपासून आपल्या पिल्लांचे संरक्षण करणे हा हेतू असावा.हा एक प्रकारचा चकवाच शेकरू खार आपल्या शत्रूंना देत असते.

शेकरू खार कशी दिसते?

शेकरू खार ही इतर खारींसारखेच दिसायला असते. परंतु आकाराने खूप मोठी असते. लांबलचक शेपटी असलेली ही खार मरून तपकिरी, लालसर,पांढरा, क्रीम कलर अशा रंगांमध्ये आढळून येते.शेकरूची लांबी दहा इंच ते एक फूट दहा इंचापर्यंत आढळते. शेकरू खारीचे वजन दीड किलो पासून दोन किलो पर्यंत आढळते. क्वचित तीन किलो पर्यंत ही आढळून आलेली आहे. शेकरूची शेपटी 45 सेंटीमीटर ते एक फूट सहा इंच इतक्या लांबीची असू शकते.

शेकरूच्या कानात एक विशिष्ट असा पांढरा डाग आढळून येतो. गुंजेसारखे लालभडक डोळे, मिशा अंगभर तलमरंग, गळ्यावर व पोटावर पिवळसर पट्टा, झुपकेदार लांबलचक शेपूट असे शेकरू खारीचे वर्णन करता येईल.

शेकरू खारीच्या उपप्रजाती

शेकरू खरेच काही उपप्रजाती आहेत. आर. आय. इंडिका, आर. आय. सेंट्रलिस, आर. आय. डीलबाटा, आर आय मॅक्सीमा या काही शेकरू खारीच्या उपप्रजाती आहेत.यापैकी R.I.Rutufa Indica ही प्रजाती मुंबईपासून कर्नाटक पर्यंत पसरलेल्या मध्य पश्चिम घाटात आढळून येते.

शेकरू खारीचे वैशिष्ट्य म्हणजे शेकरू खार सकाळी व संध्याकाळी विशेष करून सक्रिय असते. दुपारच्या वेळी हा प्राणी विश्रांती घेतो. हा प्राणी एकटा राहणारा प्राणी आहे. असे असले तरी क्वचित दोन शेकरू खार ही आपल्याला पाहायला मिळतात. प्रजननाच्या नैसर्गिक हेतूने ते एकत्र येतात. असेच म्हणावे लागेल.मनुष्यवस्तीपासून दूर अशा घनदाट जंगलामध्ये राहणारा हा प्राणी पाहायला मिळणे दुर्मिळ बाब आहे. झपाट्याने दुर्मिळ होत जाणारा हा प्राणी पर्यावरण प्रेमींच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

विशेष नोंद

1995 यावर्षी महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धांचा शुभंकर (Mascot) शेकरू खार होता.

असा हा महाराष्ट्राचा राज्यपाल प्राणी शेकरू State Animal Of Maharashtra Shekaru प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीला शेकरू खारीबाबत माहिती असावी हे उद्देशाने या लेखात माहिती दिली. शेकरू खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे हे आजही कित्येक लोकांना माहीत नसते. असे असले तरी शेकरू खारीचे दुर्मिळ अस्तित्व हेच त्याचे कारण असावे असे म्हणावे लागेल. शेकरू खारीसारखे अनेक प्राणी दुर्मिळ होत चालले आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करताना या प्राण्यांचे संरक्षणही होणे गरजेचे आहे. त्याबाबत जनजागृती व्हायला पाहिजे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment