प्रभावी निबंधलेखनाची सूत्रे Ultimate Guide for Essay writing

प्रभावी निबंधलेखनाची सूत्रे Ultimate Guide for Essay writing

प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शालेय काळामध्ये निबंधलेखन Ultimate Guide for Essay writing करावीच लागते. निबंधलेखन ही एक प्रयत्नसाध्य कला आहे. ही कला प्रत्येक विद्यार्थ्याने साध्य केली तर त्याला भाषा विषयांमध्ये अधिक चांगले गुण नक्कीच मिळतात.

Essay-writing

निबंध लिहिताना मांडणी कशी असावी?

एखादा विषय विद्यार्थ्यांना दिल्यानंतर तो विषय सहज आणि सोप्या पद्धतीने मांडणी करता आला पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा या गोष्टीला निबंध लेखनाच्या प्रश्नांमध्ये खूप महत्त्व असते. निबंध लेखनाची भाषा ही साधी सरळ आणि प्रवाही असावी.

निबंधलेखन प्रस्तावनेचा फापटपसारा न करता थोडक्यात प्रस्तावना करून मध्यभागी मध्यवर्ती कल्पनेचा अधिक विस्तार करावा. शेवटचा परिच्छेद लिहिताना मोजक्या शब्दात सारांश कसा येईल हे विचारपूर्वक लिहावे.

परीक्षेत निबंध लिहिताना काय काळजी घ्याल?

निबंधलेखन हे गुण प्राप्ती बरोबरच एक आनंदयात्रा घडविणारी गोष्ट आहे. उत्तम निबंध कसा लिहायचा याबाबत काही सूत्रे आपण लक्षात ठेवली पाहिजेत.
परीक्षेत निबंध लिहिताना पुढील काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.

●परीक्षेमध्ये निबंधाला दहा गुण ठेवलेले असतात सुमारे 200 ते 250 शब्दांमध्ये निबंध लेखन अपेक्षित असते.
साधारणपणे दीड ते दोन पानी सुंदर स्वच्छ व सुवाच्य अक्षरात निबंध लिहिला पाहिजे.

●निबंधाच्या सुरुवात थोडक्यात लिहून प्रस्तावना आटोपती ठेवली पाहिजे.

●प्रश्नपत्रिका सोडवायला सुरू करण्यापूर्वी एकदा निबंध लेखनाचा प्रश्न वाचून ठेवावा. त्यामुळे निबंध कोणत्या विषयावर आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो याबाबत आपल्या मनाचा निश्चय चांगला होऊ शकतो.

●निबंधाच्या चार प्रकारांपैकी कोणत्या प्रकारचा निबंध तुम्ही सहज येऊ शकता आणि परीक्षेमध्ये दिलेले विषय लक्षात घेऊन निबंधाचा विषय निश्चित करा.

●परीक्षेत सुरुवातीलाच निबंध लिहू नका. कारण दडपणामुळे आपल्याकडून चांगल्या कल्पना व शब्दरचना यांनी परिपूर्ण निबंध लिहिला जाण्याची शक्यता कमी असते.

●पेपरच्या शेवटीही निबंध लेखन न करणेच योग्य राहते. कोणतेही दडपण नसले तरी केवळ उरकायचे म्हणून अशा वेळी निबंध लिहिला जाऊ शकतो. अक्षरही खराब होण्याची शक्यता वाढते.

●निबंध पेपरच्या मध्यंतरच्यावेळी लिहिला तर अधिक चांगल्या प्रकारे आणि सुंदर शब्दरचना व ओघवत्या भाषेत लिहिला जाऊ शकतो.

●निबंध लेखनासाठी पूर्वतयारी म्हणून विविध विषयांवरचे निबंध वारंवार वाचावेत. त्याचप्रमाणे इतरही ललित साहित्य विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावे.

●निबंध साठी आवश्यक असलेली भाषाशैली विकसित करण्यासाठी विविध विषयांवरचे वाचन नेहमी करावी.
वृत्तपत्रांचे वाचन केल्याने आपला बहुश्रुतपणा वाढतो. विविध विषयांची जाण वाढते.

निबंध लेखन प्रभावीपणे लिहिण्याची कला अवगत होण्यासाठी काही गोष्टी विद्यार्थ्यांनी आवर्जून केल्या पाहिजेत. निबंध लेखनाची कला ही प्रयत्नसाध्य कला आहे. आपल्या प्रयत्नाने आपल्याला ही कला सहज साध्य होऊन परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून देऊ शकते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देताना आपल्याला अवगत असलेली निबंध लेखनाची कला निश्चितच फायद्याची आणि यशाकडे नेणारे शिडी ठरते.

निबंध लेखनाची कला साध्य होण्यासाठी काय करावे हा प्रश्न आपल्याला पडणे सहाजिकच आहे. निबंध लेखन ही कला असली तरी प्रत्येकाला ते साध्य होऊ शकते इतकी सुलभ गोष्ट आहे.

उत्कृष्ट निबंध लेखनासाठी काही टिप्स

निबंधलेखनाची कला साध्य होण्यासाठी पुढील काही गोष्टी आपण केल्या तर आपण एक उत्तम निबंध लेखक होऊ शकता. विविध विषयांवर लेख लिहिण्याची कला ही यातून सहज विकसित होईल. आपल्यातील लेखक सुद्धा जागा होईल.एवढेच काय तर उत्तरे कशाप्रकारे लिहावीत याची सुद्धा आपल्याला एक शैली विकसित करता येईल.

१) आपले वाचन वाढवा. नियमितपणे आपण वाचले पाहिजे.  वाचनाने आपल्या मेंदूला केवळ व्यायाम मध्ये भेटत नाही तर त्याची भाषाविषयक केंद्रे अधिक विकसित होतात.

२) फक्त वाचनच नाही तर विविध विषयांचे वाचन करणे आवश्यक आहे. त्यामुळे विविध विषयांवर वाचन करा.

३) पाठ्यपुस्तकातील लेखक परिचय आजचा भाग आवर्जून पुन्हा पुन्हा वाचा. यामुळे विविध लेखकांबद्दल आपली माहिती वाढेल याशिवाय शब्दसंपत्ती ही वाढेल.

४) शब्द संपत्ती चांगली असेल तर चांगल्या व ओघवत्या भाषेत निबंध लिहिण्यात अडथळे येत नाहीत. त्यासाठी वाक्प्रचार म्हणी यांचे वाचन ठेवा.

५) वेगवेगळ्या महापुरुषांचे थोडक्या शब्दात असलेले विचार यांचे संकलन करा. निबंध लिहिताना विषयानुसार त्याचा वापर करा.

६) केवळ गद्य साहित्य ना वाजता पद्य साहित्याचाही आस्वाद घ्या. वेगवेगळ्या कवींचे कवितेतील ओळी संकलित करा व लक्षात ठेवा. हे करताना विषयावर संकलन केले तर अधिक उत्तम.

७) निबंध लेखनाचे प्रकार पाहून यातील कोणत्या प्रकारचा निबंध प्रकार आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो. यावर थोडा विचार करा आणि त्या विषय प्रकाराच्या अनुषंगाने निबंध लेखन विकसित करा.

८) निबंधांचे विषय घेऊन प्रत्येक विषयाला किमान पाच मुद्द्यांमध्ये मांडा. हे मुद्दे एक प्रकारचे शीर्षक असतील.

९) निबंध विषय पाच मुद्द्यांमध्ये मांडण्याचा सराव करा यामुळे कोणताही निबंध विषय म्हणजे हा या पाच मुद्द्यांचा एक प्रकारे कल्पनाविस्तार आहे असेच आपल्या लक्षात येईल.

१०) निबंधाची सुरुवात थोडक्यात प्रस्तावनेने करून निबंधाच्या मध्यभागी मध्यवर्ती कल्पना थोडी विस्तारपूर्वक लिहून शेवटचा परिच्छेद हा म्हणजेच निबंधाचा सारांश स्वरुपात लिहिला की निबंधाचा शेवट छान होतो.

वरील काही गोष्टी आपण विचारपूर्वक केल्या तर कोणत्याही परीक्षेतला निबंध आपल्याला अतिशय दर्जेदार आणि चांगल्या प्रकारे लिहिता येईल.अशी मला 101 टक्के खात्री आहे. आपण वरील गोष्टींचा विचार करून निबंध लेखनाचा सराव करावा. सातत्यपूर्ण प्रयत्नाने आणि सरावाने कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. आपल्याला निश्चितच यश मिळेल. आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Essay Writing

पुढील काही निबंध आवर्जून वाचा.

माझी अविस्मरणीय सहल

शाळेतील घंटेचे आत्मकथन

मोबाइल शाप की वरदान

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment