माझी अविस्मरणीय सहल Essay on my memorable Excursion in Marathi

आमचे अविस्मरणीय सहलEssay on my memorable Excursion in Marathi

आमचे अविस्मरणीय सहल Essay on my memorable Excursion in Marathi

मला सहलीला जायला खूप आवडते. सहलीच्या निमित्ताने वेगवेगळी ठिकाणी पाहायला आवडतात. मित्रांबरोबर सहलीमध्ये खूप मौजमजा करता येते. आमच्या शिक्षकही अतिशय आनंदाने आमच्यात मिसळतात आणि एकच आनंद आणि उत्साहाला भरती येते.

दरवर्षी नेहमीच ऑगस्ट महिन्यात आमची सहल जात असते. या वर्षी मुख्याध्यापकांनी परिपाठात जाहीर केले की आपली सहल माळशेज घाटात आपण घेऊन जाणार आहोत. वा ! वा ! माळशेज घाट म्हणजे एक अतिशय निसर्गरम्य ठिकाण. त्या ठिकाणी खूप धबधबे असतात. त्या धबधब्याखाली आपल्याला येथे आंघोळ करायला भेटणार .नुसते ऐकूनच माझे मन मोहरून गेले.

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध i

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आमची सहल जायचे ठरले होते. त्यासाठी शाळेने एसटीही ठरवली होती. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व मुले आमच्याबरोबर बॅगमध्ये डबे, इतर खाण्याच्या वस्तू, छान पैकी गाॅगल, कॅमेरा अशा वस्तू घेऊन निघालो.

माझ्या मित्रांचा सहा-सात जणांचा एक गट होता. माझा मित्र चंदूकडे छान कॅमेरा होता. त्याने तो बरोबर घेतला होता.एसटीत बसल्यावर आम्ही सगळ्यांनी एकच कल्ला केला. आम्ही अंताक्षरी खेळायचे ठरवले. सरांचे मात्र आमच्याकडे लक्ष नव्हते. सर्व विद्यार्थी आलेत का? सर्वजण व्यवस्थित बसलेत का? याकडे त्यांचे लक्ष होते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध

सुमारे दीड तास प्रवासानंतर आम्ही माळशेज घाटात पोहोचलो. उंचच उंच डोंगर, अतिशय काळेकुट्ट ढग, आकाशात दिसत होते. काही डोंगरांवर कापसासारखे धुके उतरलेले दिसत होते. भुरभुर कापसाचे पुंजके उडावे त्याप्रमाणे धुके दिसत होते. त्या रजईसारख्या धुक्यामधून आम्ही फिरणार होतो.

एसटीतून खाली उतरल्यानंतर आमच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला सूचना केल्या. आठ आठ मुलांचे गट तयार करून त्यामध्ये एक गट प्रमुख नेमला. तेथून एक आम्ही गाईड घेतला होता. तो गाईड आम्हाला सुरुवातीला वेगवेगळे पॉईंट दाखवणार होता. आम्ही निघालो. एका सुंदर कड्या जवळ आलो. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कठडे तयार केलेले होते. पॉईंट खूप सुंदर होता.

ठाणे जिल्ह्याच्या बाजूने म्हणजेच कोकणातून वरती पूर्व दिशेने वारे वाहत होते. ढगांबरोबर पाऊसही येत होता. त्या पावसात आम्ही भिजत होतो. काही ढग इतके खाली होते की आम्ही जणूकाही ढगांवर बसलो आहोत असे वाटले. अशावेळी मला एखाद्या पौराणिक मालिकेतील स्वर्ग दाखवतात, त्यातील स्वर्ग दाखवताना सुंदर धुके दाखवतात. धुक्‍यामुळे वाटले की आम्ही आता स्वर्गातला आनंद उपभोगत आहोत.

सर्व मुले, शिक्षक खूप उत्साही होते. आजूबाजूला हिरवी झाडी अतिशय सुंदर दिसत होती. खाली मऊ लुसलुशीत गवत होते. पाऊस होता पण फारसा नव्हता. आम्ही त्या गवताच्या गालिच्यावर येथेच्छ लोळण घेत होतो. खूप मजा वाटत होती. काही मुलांनी खाण्याचे पदार्थ प्लास्टिक पिशव्यांमधून आणले होते. मुख्याध्यापकांनी सांगितलेल्या सूचनेनुसार प्लॅस्टिकचे कागद आम्ही आमच्या सॅकमध्ये परत ठेवत होतो. खात खात गप्पा मारत मजा मारत अतिशय धुंदीत आम्ही सगळे फिरत होतो.

त्या उंच कड्याजवळ गेल्यानंतर वरून खाली पडणारे पाणी पुन्हा पाठीमागे येत होते. रुमाल फेकला तरी तो वार्‍याच्या परिणामामुळे मागे येत होता. मागे येणारे पाणी आम्हाला भिजवून टाकत होते. जणूकाही आम्ही शाॅवर खाली आंघोळ करत होतो.

हा पॉईंट आम्हा सर्वांनाच खूप आवडला. या ठिकाणावरून थेट हरिश्चंद्रगडाचे ताराराणी शिखर दिसत होते आणि आजोबा पर्वतही दिसत होता. हरिश्चंद्राची लांबच लांब डोंगरांत पूर्वेकडे पसरत गेलेली आहे. दक्षिण बाजूला हडसरचा किल्ला दिसत होता. खाली कोकणातकडे पाहिले तर अपूर्व असे सुंदर दृश्य दिसत होते.इतके रमणीय आणि विलोभनीय दृश्य मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते.

आता आमच्या गाईडने आमचा मोर्चा मुख्य घाटाकडे वळवला. वेगवेगळी वळणे घेत आम्ही पुढे चालत होतो. आजूबाजूला गर्द हिरवी झाडी होती. इतक्यात एक बोगदा लागला त्या बोगद्यातून आम्ही सगळेजण चालत गेलो. त्यातून पाणी निथळत होते. काही मुले मध्येच काही वेगळे आवाज काढत होती. आवाजाचे प्रतिध्वनी खूपच गंमतीशीर होते.

आकाशातून थोडेथोडे पावसाचे टपोरे थेंब पडत होते. त्या झाडीतुन ते पाणी निथळत होते. बाजूच्या डोंगर कड्यावरून छोटे- मोठे धबधबे कोसळत होते.
आम्ही मुलेही त्या मोठ्या मोठ्या धबधब्याखाली आंघोळ करत होतो. आम्हाला कोणी आडवत नव्हते. भीती वाटत नव्हती. आमचे गुरुजी मात्र मधून मधून सूचना करत होते इतकेच. मध्येच आमचे गाईड एखादी धोक्याची सूचनाही आम्हाला सांगत होते.

रस्त्याने मुंबईवरून आणि घाटावरुन येणारी वाहने संथ गतीने चालत होती. त्यांना धुक्यामुळे तसे करावे लागत होते.एक एसटी घाटाने वर येत होती.इतक्यात अचानक एका उंच कड्यावरून दोन तीन दगड घरंगळत खाली आले. त्या एसटीच्या टपावर एक छोटा दगड गेला. मोठा आवाज आला. दगड अगदी एसटीच्या आत गेला होता. एक आमच्या मुख्याध्यापकांच्या जवळच पडला. एक मात्र अगदी पार बाजूला पडला.

अतिशय चित्तथरारक प्रसंग होता तो.एसटी थोडी पुढे नेऊन ड्रायव्हरने थांबवली. मात्र एसटीतील कोणालाही काही झाले नाही.
पावसाळ्यात माळशेज घाटाची सहल अतिशय धोकादायक असते. याचा जिवंत प्रसंग आमच्या समोर उभा राहिला होता. सुदैवाने आम्हाला कोणाला काहीच झाले नव्हते.

आता मात्र आमचे मुख्याध्यापक गाईड आणि सर्व शिक्षक यांनी सहलीचा आनंद झाला इतकाच पुरे असे आम्हाला सांगितले. आम्ही पुन्हा मागे फिरलो.आम्ही सगळे एकमेकात झालेल्या प्रसंगाची चर्चा करीत होतो.
माळशेज घाटातील बोगद्यातून पुन्हा वरती आलो. एका माळरानावर छान अशा लुसलुशीत गवतावर होते. बाजूच्या माळावर आम्ही सर्वजण बसलो होतो. त्याठिकाणी आणलेल्या डब्यांचा यथेच्छ समाचार घेतला.

माळशेजचा निसर्ग हा अत्यंत रम्य, मनोहरी विलोभनीय आहे तितकाच तो केव्हाही रौद्र स्वरूप धारण करू शकतो. हे आम्ही अनुभवले होते. अशा प्रकारे आमची सहल अतिशय अविस्मरणीय झाली.ही सहल माझ्या कायम आठवणीत राहीली आहे.

आमचे अविस्मरणीय सहल Essay on my memorable Excursion in Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment