आलंकारिक शब्द मराठी Alankarik Shabd Marathi

आलंकारिक शब्द Alankarik Shabd Marathi

आलंकारिक शब्द Alankarik Shabd ज्याप्रमाणे मानवाचे सौंदर्य वाढवण्यासाठी मानव अलंकार, पोशाख,केशरचना, टापटीपणा अशा विविध बाबी करतो आणि स्वतःचे सौंदर्य खुलवतो. त्याचप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढण्यासाठी विविध प्रकारच्या अलंकारिक शब्दरचनांचा वापर केला जातो. त्यामुळे भाषा अधिकच सुंदर होते. वापरण्यात एक वेगळीच मौज येते. भाषेचे सौंदर्य वाढवणारे अलंकारिक शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचा वापर आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी,स्वतःची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी करू शकतो.

अष्टपैलू -सर्वगुणसंपन्न

अकरावा रूद्र – अतिशय तापट माणूस

अकलेचा कांदा – मूर्ख मनुष्य

अकलेचा खंदक — अत्यंत मूर्ख मनुष्य

अरण्यरुदन – ज्याचा काही उपयोग नाही असे कृत्य

अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारी गोष्ट

अक्षरशत्रू- निरक्षर अडाणी व्यक्ती

ओनामा: – सुरुवात प्रारंभ

उंटावरचा शहाणा:- मूर्खपणाचा सल्ला देणारा

उंबराचे फूल: — दुर्मिळ वस्तू

कर्णाचा अवतार — दानशूर माणूस

कळसूत्री बाहुले –दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा किंवा चालणारा

कळीचा नारद– कळ किंवा भांडणे लावणारी व्यक्ती

काडी पहिलवान –हडकुळा, अतिशय अशक्त मनुष्य

कुंभकर्ण– खूप काळ झोपून राहणारा झोपाळू

कूपमंडूक — संकुचित व्यक्ती

कोल्हेकुई — क्षुद्र लोकांची बडबड

खडाजंगी- मोठे भांडण

खडाष्टक -जोरदार भांडण

खुशालचेंडू -चैनखोर माणूस

खेटराची पूजा – अपशब्दाने खरडपट्टी काढणे

गर्भश्रीमंत– खूप श्रीमंत असणारा

गंगा-यमुना – अश्रू

गंडांतर — भीतीदायक संकट

गाजरपारखी – कसली पारख नसलेला,मूर्ख

गुरुकिल्ली — मर्म ,रहस्य

गुळाचा गणपती– मंद बुद्धीचा

गोगलगाय :-गरीब निरूपद्रवी मनुष्य

घरकोंबडा :- घराबाहेर न पडणारा

घोरपड :- चिकाटी धरणारा

चर्पटपंजरी :- निरर्थक बडबड

चौदावे रत्न :- मार

छत्तीसचा आकडा :- शत्रुत्व.

जमदग्नीचा अवतार :- रागीट.

टोळभैरव :- कामात नासाडी करणारे लोक

ताटाखालचे मांजर:- दुसऱ्याचे तंत्राने वागणारा

दगडावरची रेघ :-कधी न बदलणारा

त्रिशंकू:- धड ना इकडे, धड ना तिकडे

. दळुबाई :- भेकड मनुष्य

देवमाणूस :- चांगला सज्जन मनुष्य

धोपट मार्ग :-सरळ नेहमीचा मार्ग

नवकोट नारायण :- खूप श्रीमंत

पाताळयंत्री :- कारस्थान करणारा

पांढरा कावळा :- निसर्गात नसलेली वस्तू

पांढरा परीस:- लबाड

पिकले पान:- म्हातारा

पोपटपंची :-अर्थ न कळता पाठांतर करणारा

बृहस्पती :- बुद्धिमान

बिनभाड्याचे घर:- तुरुंग

बोकेसंन्यासी:- ढोंगी मनुष्य

बोलाचीच कढी :-केवळ शाब्दिक वचने

भगीरथ प्रयत्न :-आटोकाट प्रयत्न

भाकडकथा :-बाष्कळ गोष्टी

भीष्मप्रतिज्ञा:- कठीण प्रतिज्ञा

मंथरा:- दुष्ट स्री

मायेचा पूत:- पराक्रमी मनुष्य मायाळू

मारुतीचे शेपूट:-लांबत जाणारे काम

मृगजळ- केवळ आभास

मेषपात्र:- बावळट

रामबाण:- अचूक गुणकारी औषध

लंकेची पार्वती :- अत्यंत गरीब स्त्री

लंबकर्ण:- बेअकली, गाढव

शकुनीमामा:- कपटी मनुष्य

शेंदाड शिपाई:- भित्रा

श्रीगणेशा:- सुरुवात प्रारंभ

सव्यसाची:- दोन्ही हातांनी एकसारखे काम करता येणारा

स्मशानवैराग्य:-तात्कालीक वैराग्य

सांबाचा अवतार:- अत्यंत भोळा मनुष्य

सुळावरची पोळी:- जीव धोक्यात आणणारे काम

सूर्यवंशी:- उशिरा उठणारा

वाटाण्याच्या अक्षता:- नकार

वामनमूर्ती:- बुटका

वाहती गंगा:- आलेली संधी

पर्वणी:- अतिशय दुर्मिळ योग

नंदीबैल:- हो ला हो म्हणणारा

समूहदर्शक शब्द Samuhdarshak shabd

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment