प्राणी व पिल्ले Animals and their babies
इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राणी व त्यांची पिल्ले Animals and their babies यांच्या जोड्या खाली दिलेल्या आहेत.
पिल्लूदर्शक शब्द म्हणजेच प्राणी व त्यांची पिल्ले
- वाघाचा- बछडा, बच्चा
- गाईचे- वासरू, वत्स
- सिंहाचा – छावा
- हरणाचे- पाडस , शावक
- शेळीचे- करडू
- घोडीचे – शिंगरू
- माणसाचे – बाळ
- कुत्र्याचे -पिल्लू
- मांजरीचे – पिल्लू
- डुकराचे -पिल्लू
- मेंढीचे- कोकरू
- म्हशीचे – रेडकू
- पक्ष्याचे- पिल्लू
- गाढवाचे -शिंगरू
- कोंबडीचे – पिल्लू
प्राणी व पिल्ले यांच्या संदर्भात स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये येणारे काही नमुना प्रश्न पुढील प्रमाणे:-शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
प्रश्न १) शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात?
१)बच्चा २) पिल्लू ३) कोकरू ४) करडू
प्रश्न २) पुढीलपैकी वासरू कोणाच्या पिल्लांना म्हणतात?
१) शेळी २) गाय ३) वाघ ४) हरीण
प्रश्न३) पाडस कोणाच्या पिल्लाला म्हणतात?
१) मांजर २) वाघ ३) हरीण ४)गाय
हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात?