वृक्षारोपणाचे महत्त्व मराठी निबंध Vruksharopanache Mahattva Nibandh Marathi

वृक्षारोपणाचे महत्त्व मराठी निबंध Vruksharopanache Mahattva Nibandh Marathi

वृक्षारोपणाचे महत्त्व मराठी निबंध Vruksharopanache Mahattva Nibandh Marathi

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असे महाराष्ट्रातील महान संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. वृक्षारोपण ही सध्याच्या काळाची फार मोठी गरज आहे. कारण पर्यावरणाच्या अनेक समस्या ज्वलंत झाल्या आहेत आणि या सर्वांवर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे वृक्षारोपण. वृक्षारोपणाचे महत्त्व हे आजच्या वर्तमान काळातील मानवाला समजले नाही तर भविष्य अंधकारमय आहे.

वृक्षओढे वनराजी वृत्ती रमे तेथे माझी” असे मराठी भाषेतील आधुनिक कवितेचे जनक केशवसुत यांनी म्हटले.वृक्ष हे केवळ सावली देत नसून सर्व जीवसृष्टीला त्यांचा फार मोठा आधार आहे. कारण वृक्षांमुळे पृथ्वीवरील प्राणवायू चे प्रमाण हे चांगले राहते त्याचप्रमाणे घातक अशा कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाणही नियंत्रित राहते. वृक्षांची प्रचंड होणारे संख्या ही पर्यावरणाला धोक्याच्या पातळीवर नेत आहे. त्यामुळे वृक्षारोपणाचे महत्त्व वाढले आहे.

भारताची पंचाहत्तर वर्षांतील वैज्ञानिक प्रगती निबंध India’s scientific progress in seventy-five years

ग्लोबल वार्मिंगची समस्या आणि वृक्षारोपण Global warming and tree plantation

पृथ्वीवर कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण वाढले आहे त्यामुळे चक्रीवादळांचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. परिणामी पृथ्वीवरील जीवसृष्टीला घातक असे वातावरण तयार झाले आहे. समुद्राची पातळी उंचावली आहे. ध्रुवीय भागातील बर्फ पितळल्यामुळे नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत.ग्लोबल वार्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही धोक्याचा घंटा वाजवत आहे. पर्यावरणाचे होणारे प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी अनेक मार्ग असले तरी वृक्षारोपण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वसामान्य माणूस या वृक्षारोपणातून पर्यावरणाच्या संतुलनाला हातभार लावू शकतो. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर असणारा वृक्षारोपण हा रामबाण उपाय आहे. प्रत्येक व्यक्ती करू शकतो.

खरा तो एकची धर्म निबंध Khara To Ekachi Dharm Nibandh

पर्यावरणाचे संतुलन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व Vruksharopanache Mahattva

आपल्या आजूबाजूला असलेले पर्यावरण हे आदर्श असले पाहिजे. आजच्या काळात आपण जर वृक्षारोपण केले नाही तर पर्यावरणाचा समतोल किंवा संतुलन बिघडून जाईल. अनेक मोठ्या नैसर्गिक आपत्ती पृथ्वीवर निर्माण होतील. त्यामध्ये केवळ मानवच नाही तर संपूर्ण सजीव सृष्टी नष्ट होईल. कार्बन डाय-ऑक्साइड आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण रोखण्यासाठी कार्बन डाय-ऑक्साइड शोषण घेणारे वृक्षच माणसाचे मित्र ठरतील. माणसाचेच नव्हे तर सर्वच जीव जंतूचे मित्र ठरतील. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण झाले पाहिजे.

Tree Plantation

वायु प्रदूषण आणि वृक्षारोपणाचे महत्त्व

वृक्षारोपणामुळे निसर्ग अधिक फुलून येईल. निसर्गामध्ये वृक्षांच्या मदतीने होणारे प्रकाश संश्लेषण ही अतिशय महत्त्वाची क्रिया आहे. प्रकाश संश्लेषणामध्ये ऑक्सिजन वायू वातावरणात सोडला जातो आणि कार्बन डाय-ऑक्साइड शोषण घेतला जातो. वृक्ष कमी झाले तर वायू प्रदूषणामुळे निर्माण झालेला कार्बन डाय-ऑक्साइड शोषणारी एक नैसर्गिक यंत्रणा नष्ट होईल.

वायु प्रदूषणामुळे घातक अशा विषारी वायूंचे प्रमाण वातावरणात वाढले आहे. वृक्ष घातक वायना नियंत्रणात ठेवू शकतात त्यामुळे वृक्षारोपणाचे महत्त्व खूप आहे. कार्बन फोटो प्रिंट वाढल्यामुळे अतिरिक्त कार्बन निसर्गामध्ये भयंकर नैसर्गिक आपत्ती निर्माण करत आहे. पृथ्वीवर अनेक सजीव प्रजाती नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत.आदर्श असे पर्यावरण नष्ट होत आहे. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना अतिशय घातक अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्या दृष्टीने वृक्षारोपणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

वृक्षारोपण आणि पशुपक्षी

पृथ्वीवरील पशुपक्ष्यांना वृक्षांचा आधार असतो वृक्षांच्या सहाय्यानेच पक्षी राहत असतात. वृक्षावर आपली घरटी बांधतात त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य एखाद्या परिवाराप्रमाणे असते. वृक्ष ही पक्षांची फार मोठी आधाराची जागा असते. वृक्षांमुळे पक्षांना अन्न मिळते. वृक्षामुळे पक्ष्यांना आणि पशुंना निवारा मिळतो. वृक्षांमुळे सजीवांना जगण्याची एक सुंदर परिस्थिती निर्माण होते.

पशुपक्षी हा निसर्गातील अन्नसाखळीचा खूप मोठा आधार आहे. इतर पशुपक्ष्याप्रमाणे मानवाला जर कशाची गरज असेल तर ती म्हणजे वृक्षांची. वृक्षांमुळे माणसाचे जीवन आनंदमय राहते. त्यामुळे वृक्ष हे मानवाचे आणि सर्व पशुपक्ष्यांचे मित्र असतात. माणसासारखे पक्ष वृक्षांना बोलता येत नसले तरी वृक्षांना भावना असतात वृक्षांच्या भावना माणसाप्रमाणेच असतात. भयंकर वृक्षतोड ही भावना दुखावणारी अतिशय संवेदनशील घटना आहे.

पुढच्या पिढ्यांसाठी वृक्षारोपण

शाश्वत जीवनशैलीचा विचार केला तर वृक्षारोपणाचे महत्त्व पुढच्या पिढ्यांसाठी फार मोठे आहे. वृक्षांमुळे शाश्वत जीवनशैलीला खूप मोठा आधार मिळतो. मानव हा निसर्गाचा एक घटक आहे. निसर्गामध्ये अनेक प्रकारे अतिक्रमण करून माणूस निसर्गातील सृष्टी चक्राला अडथळा निर्माण करीत आहे. भयंकर वाढलेले वायू प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग यामुळे पुढच्या पिढ्यांसाठी पृथ्वीवरील जीवन कसे असेल हा चिंतेचा विषय आहे. अतिशय गांभीर्याने घेण्याचा हा विषय आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढ्यांना केवळ संपत्तीचे महत्त्व नसून जगण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व खूप मोठे आहे.

आजचे भागले म्हणून माणसाला वृक्षारोपणाची गरज नाही असे म्हणणे हे अतिशय लोभी वृत्तीचे लक्षण आहे. हा एक नकारात्मक विचार आहे पुढच्या पिढ्यांसाठी प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण केले पाहिजे.पुढच्या पिढ्यांसाठी संपत्ती कमावण्यापेक्षा वृक्षरुपी संपदा जपणे वाढवणे आणि संवर्धन करणे ही आजच्या काळाची अतिशय निकड आहे. या दृष्टीने वृक्षारोपणाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

वृक्षारोपणामुळे पर्यावरणाची हानी भरून निघून येण्यास खूप मोठी मदत होईल. केवळ झाडे लावून उपयोग नाही तर त्यांचे संवर्धन करणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा वृक्षारोपण केले जाते; परंतु लावलेल्या झाडांचे संवर्धन होत नाही. आपण केलेले काम अक्षरशः वाया जाते. दहा वृक्ष लावण्यापेक्षा एकच वृक्ष लावावा आणि त्याचे संवर्धन करावे हे तत्व लक्षात घेतले पाहिजे.

वृक्ष फळे फुले देतात. कार्बन डाय-ऑक्साइड सारखा विषारी वायू शोषून घेतात. वृक्ष पर्यावरणाचे संतुलन ठेवतात. वृक्षांमुळे सर्व सजीव चांगले जीवन जगतात. वृक्षांमुळे मानवाचे जीवन अधिक शाश्वत राहील. वृक्ष ही सर्व सजीवांची एक आधारभूत अशी बाब आहे. आज जंगले मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहेत डोंगर उर्फे बोडके दिसत आहेत. आता काय करायचे पुढच्या पिढ्यांना शाश्वत असे वातावरण कसे ठेवायचे हा मानवाला पडलेला मोठा प्रश्न आहे. आणि त्यावर अतिशय सोपे असे उत्तर म्हणजे वृक्षारोपण होय.

वृक्षारोपणाचे महत्त्व मराठी निबंध Vruksharopanache Mahattva Nibandh Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment