बालिका दिन भाषण Speech on Balika Din

बालिका दिन भाषण Speech on Balika Din

बालिका दिन भाषण Speech on Balika Din

अध्यक्ष महोदय गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो,

आज स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे.

भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील स्त्रियांच्या उद्धारासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान देणाऱ्या सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी 3 जानेवारी 1831 रोजी झाला.

27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन 27 February Marathi Bhasha Gaurav Din

तो काळ स्त्रियांना परावलंबी आणि परतंत्र ठेवणाऱ्या बुरसटलेल्या विचारांना मी भरलेला होता. स्त्रियांसाठी शिक्षण आणि मानवाचे जीवन कुठेही नव्हते. अशा काळात सावित्रीबाईंनी महान समाज सुधारक ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा देऊन स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य अतिशय नेटाने केले.

मुलींचे शिक्षण महिला आणि अस्पृश्यांच्या शिक्षणामध्ये अतिशय मोलाचा वाटा सावित्रीबाईंनी उचलला आहे. प्रत्येक मुलगी हि शिकली पाहिजे शिकून तिने आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणे होते. या विचाराने सावित्रीबाईंनी शिक्षणामध्ये अतिशय मौल्यवान असे योगदान दिले आहे.

1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात शाळा सुरू केली. यानंतरही त्यांनी पुणे, सातारा ,अहमदनगर जिल्ह्यात शाळा सुरू करून शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी क्रांती केली. त्या काळात अस्पृश्य आणि स्त्रिया यांना शिक्षण मिळाले पाहिजे हे त्यांनी आपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानले होते. महिला व बालविकास मंत्रालयाने 2008 पासून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरे करण्याचे ठरवले.

मुलींच्या शिक्षणातील असमानता दूर करणे, स्री पुरुष लिंग भेदभाव नष्ट करणे. स्त्रियांना आपला आत्मसन्मान पुन्हा मिळवून देणे अशी काही उद्दिष्टे यामागे आहेत.स्त्रियांना समाजामध्ये आणि आधुनिक काळातील व्यवस्थेमध्ये त्यांचे हक्काचे असलेले स्थान मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने केला जातो. सावित्रीबाई फुले ज्या काळात परंपरा आणि रूढीवादी समाजाशी संघर्ष करून स्त्रियांच्या शिक्षण कार्यात मोलाचा वाटा उचलतात आणि आजही आपण पाहतो की स्त्रियांना त्यांचे हक्क आणि सन्मानाचे जीवन मिळत नाही ही खुप शोकांतिका आहे.

स्री पुरुषांना समान हक्क आहेत आणि ते मिळवून देण्यासाठी पुनरुत्थानासाठी सावित्रीबाईंनी जे कार्य केले ते अजोड असे आहे.त्यांच्या कार्याला या दिनानिमित्त अभिवादन करून सावित्रीच्या लेकींनी शिक्षणाची ज्योत समाज उद्धाराची मशाल सतत तेवती ठेवावी. सर्व मुलींना शिक्षण मिळावे. मुलींची होणारी भ्रुणहत्या थांबवा स्त्री पुरुष समानता यावी. यासाठी आजही आपण संघर्ष करण्याची फार मोठी गरज आहे. हे या निमित्ताने सांगावेसे वाटते.

सावित्रीबाईंच्या कार्याचा वसा आणि वारसा आपण असाच पुढे चालू ठेवून स्त्रीयांना सन्मानाचे जीवन लाभावे यासाठी कार्य केले पाहिजे. आधुनिक सरस्वती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी माझ्या शब्दांना विराम देतो.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment