महान गणिती श्रीनिवास रामानुजन Shrinivas Ramanujan

महान गणिती श्रीनिवास रामानुजन माहिती Shrinivas Ramanujan

Shrinivas-Ramanujan

जगातील पहिला गणिती बालक श्रीनिवास रामानुजन  Shrinivas Ramanujan या बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दक्षिण भारताच्या तामिळनाडू प्रांतातील तिरोड नावाच्या एका खेड्यात 22 डिसेंबर 1887 या दिवशी झाला. त्यांचे कुटुंब अत्यंत गरीब होते.

सानेगुरूजी Saneguruji

रामानुजन वयाच्या पाचव्या वर्षापासून शाळेत जावू लागले.  टाऊन हायस्कूल मधून 1903 यावर्षी ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. कुंभकोणमच्या शासकीय कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. रामानुजन गणित या विषयाची अतिशय आवड होती. गणिताशिवाय इतर विषय त्यांना जवळजवळ आवडतच नसतात. त्यामुळे ते कॉलेजचे शिक्षण हे पूर्ण करू शकले नाहीत.

भारतीय ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.रंगनाथन

रामानुजन यांना अतिशय प्रखर बुद्धी लाभलेली होती. रामानुजन यांनी बालपणीच रामायण महाभारतासारख्या ग्रंथ वाचले होते. गणित हा विषय मात्र त्यांच्या अतिशय आवडीचा होता. संख्याशास्त्रात त्यांना गती होती. संख्या विषयात त्यांची गती केवळ थक्क करून सोडणारी होती. कोणत्याही संख्येचे वर्गमूळ घन ते एका क्षणात सांगत असत.

रामानुजनच्या प्रखर बुद्धीचा आणि गणित विषयाच्या आवडीचा प्रत्यय त्यांच्या शालेय जीवनात आला. इयत्ता तिसरी मध्ये असतानाच रामानुजनने  इंटरचा गणित विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.इयत्ता चौथीत असताना त्याने त्यावेळच्या बीएच्या त्रिकोणमितीचे कठीण प्रश्न सहज सोडवले होते.

कोणताही गुरु किंवा ग्रंथ यांचे मार्गदर्शन रामानुजनला नव्हते. रामानुजन गणितातील मोठेमोठे सिद्धांत सहजरित्या सांगू शकत असे. रामानुजनचे गणित विषयाचे ज्ञान हे जन्मजात किंवा दैवी देणगी म्हणून मिळाले असे मानले जाते.

श्रीनिवास रामानुजन यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्यामुळे पोटापाण्यासाठी त्यांना नोकरी चाकरी करणे गरजेचे होते. शिक्षण सोडून रामानुजन त्यावेळच्या मद्रास बंदरामध्ये कारकून म्हणून काम करू लागले. नोकरी करूनही त्यांनी गणिताचा अभ्यास तसाच सुरू ठेवला.

सन 1911 मध्ये यांनी त्यांचा गणित विषयक प्रबंध प्रसिद्ध केला.  रामानुजन यांनी आपला हा प्रबंध इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध केला.  बॅरनाॅलीज नंबर्सचे  गुणधर्म या विषयावर प्रबंध होता.

1912 मध्ये त्यांनी आणखी दोन छोटे लेख लिहिले. त्याचप्रमाणे काही प्रश्न त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांचे ते लेख त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक जी.एच. हार्डी यांच्याकडे पाठवून दिले. प्राध्यापक हार्डी हे गणित विषयावर संशोधन करणारे एक प्रसिद्ध संशोधक आणि गणिती होते.

प्राध्यापक जी. एच. हार्डी यांनी रामानुजनचे निबंध पाहून रामानुजनच्या संशोधनातील नाविण्य  आणि विलक्षण असामान्य अशी गणित प्रज्ञा प्रभावित झाले. त्यावेळचा भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. भारतीय लोक अतिशय दारिद्र्यात दिवस काढत होते. रामानुजनची परिस्थिती वेगळी नव्हती.

रामानुजन सरकार प्रज्ञावान विद्यार्थी भारतासारख्या शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या देशात राहू नये. इतके उच्च दर्जाचे संशोधन करतो, तर त्याला इंग्लंडसारख्या देशात बोलावले, वातावरण मिळाले, तर त्याच्याकडून गणित विषयांमध्ये अनमोल असे संशोधन होऊ शकते. याची खात्री हार्डी साहेबांना पटली. त्यामुळे त्यांनी रामानुजन संबंधी मद्रास विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला.

रामानुजन यांना मद्रास विद्यापीठाने 250 ब्रिटिश कुंड्यांची शिष्यवृत्ती दिली. प्राध्यापक हार्डी यांनी केंब्रिज विद्यापीठाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून  केंब्रिज विद्यापीठाने सुद्धा 60 दौंड शिष्यवृत्ती रामानुजन यांना दिले. येथून रामानुजनचे दारिद्र्य संपले आणि गणित विषयाला चांगले दिवस येण्याचा मार्ग मोकळा झाला असे म्हणता येईल.

सन 1914 मध्ये श्रीनिवास रामानुजन इंग्लंडमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी प्राध्यापक हार्डी यांनी या न घडवलेल्या गणिती हिऱ्याला पैलू पाडले. रामानुजन यांची  अध्ययनक्षमता, ज्ञानतृष्णा,गुरुनिष्ठा पाहून हार्डी यांनी आपल्याकडील सर्व ज्ञान रामानुजन यांना दिले.रामानुजन हा हार्डींवर विश्वास ठेवून शिकणारा एक नम्र विद्यार्थी होता.

रामानुजन यांनी आकडे शास्त्राचा विशेष अभ्यास केला. 1918 यावर्षी लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलो म्हणून निवडले हा मान जगामध्ये फार मोठा समजला जातो. त्यावेळी रामानुजन यांचे वय फक्त 21 वर्षांचे होते केंब्रिज विद्यापीठाने सुद्धा यानंतर रामानुजन यांना हॅलो म्हणून निवडले.

श्रीनिवास रामानुजन यांना अनेक देशी आणि विदेशी सन्मान मिळाले. रामानुजन यांचे गणित प्रज्ञा प्राध्यापक हार्डी यांच्या सहवासात अधिकच बहरून आली.

रामानुजन हे दक्षिण भारतात जन्माला आलेले त्यामुळे त्यांचा जो आहार होता तो अगदी साधा होता.  ती शाकाहारी होती.इंग्लंडच्या वातावरणामध्ये त्यांना आपले सर्व आहाराचे नियम पाळत राहणे अवघड गेले. पुढे त्यांना क्षयरोगाने गाठले. त्यामुळे 1919 मध्ये श्रीनिवास रामानुजन पुन्हा भारतात परतले. क्षयरोगाच्या आजारातून ते पुन्हा परतले नाहीत या आजाराने त्यांचा अंत केला.

श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याने भारत मातेचे मान निश्चितच जगाच्या गणित इतिहासात उंचावली. रामानुजन सारखा हिरा अजूनही गणित विश्वाला हवा होता.परंतु नियतीच्या मनात वेगळेच काही होते असे खेदाने म्हणावे लागते.

अतिशय खडतर गरिबीमध्ये दिवस काढलेला बालक गणिती श्रीनिवास रामानुजन एक गणित विषयाला पडलेले एक अद्भुत आणि आलो की स्वप्न होते असे म्हणावे वाटते.

 

26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या 32 व्या वर्षी श्रीनिवास रामानुजन यांचा मृत्यू झाला. भारत देश आपल्या एका प्रज्ञावान सुपुत्राला मुकला आणि जग एका महान गणितीला पारखे झाले.

श्रीनिवास रामानुजन यांना श्रद्धांजली वाहताना प्राध्यापक हार्डी म्हणाले,” इतक्या कमी कालावधीत हे जीवन संपल्याने गणित विषयाचे फार मोठे नुकसान झाले. रामानुजनमध्ये अफाट सुप्तशक्ती होत्या. त्यांनी गणित क्षेत्रात जेवढी भर घातली तेवढी कोणत्याही एका व्यक्तीने गेल्या शतकात घातली नाही.”

ज्युलियन हक्सले म्हणाले, ” या युगातला सर्वात थोर गणिती रामानुजन झाला.”

श्रीनिवास रामानुजन यांनी इंग्लंडमध्ये असताना अनेक निबंध लिहिले होते.  त्यांच्या निबंधांचा संग्रह इंग्लंडमधील केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केला.

श्रीनिवास रामानुजन Shrinivas Ramanujan

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment