पंगतीचे 9 पारंपरिक श्लोक Pangatiche 9 Paramparik Shlok

पंगतीचे 9 पारंपरिक श्लोक Pangatiche 9 Paramparik Shlok

पंगतीचे 9 पारंपरिक श्लोक Pangatiche 9 Paramparik Shlok हे जेवणापूर्वी म्हटले जातात.पंगतीचे 9 पारंपरिक श्लोक Pangatiche 9 Paramparik Shlok संग्रहीत करून या ठिकाणी संकलन केले आहे.आपणास निश्चितच उपयोगी पडतील.

Pangatiche 9 Paramparik Shlok

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥

वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे |
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे।
कृषीवल-कृषीकर्मी राबती दिनरात |
श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात |
करुनी स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल |
उदर भरण आहे चित्त होण्या विशाल ॥२॥

जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरिचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥३॥

मुखी घास घेता करावा विचार ।
कशासाठी हे अन्न मी सेविणार ।
घडो माझिया हातून देशसेवा ।
म्हणॊनि मिळावी मला शक्ती देवा ॥४॥

अन्नासवे झाली भेटी । पडली श्री हरिची गाठी ।।
भुका झाल्या अनिवार । जिव्हें आली रूचि फार ।।
घासागणिक आठवण । पुण्याची हो साठवण ।।
हरि हरि करिता जेवू । आनंदाचे धनी होऊ ।।
ज्ञाना तैसा तुकया संत । भेटो सर्वां भगवंत ।।५॥

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे।
ज्ञान वैराग्य सिद्धयर्थ भिखां देहि च पार्वति।।६॥

ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना ।।७॥

अहं वैश्र्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: ।
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥८॥

ॐ सहनाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥९॥
ॐ शांति: शांति : शांति: ॥

अवश्य वाचा.

स्वयंपाकघरातील विज्ञान

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment