वटपौर्णिमा 2023 मराठी Vat Purnima 2023 Date And Time in Marathi

वटपौर्णिमा 2023 मराठी Vat Purnima 2023 Date And Time in Marathi

Vat Purnima 2023 Date

वटपौर्णिमा 2023 मराठी Vat Purnima 2023 Date And Time in Marathi याबद्दल या लेखांमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वटपौर्णिमा कधी आहे?

यावर्षी वटपौर्णिमा 3 जून शनिवार या दिवशी आली आहे. पौर्णिमा सकाळी 11:17 वाजता सुरू होते. त्यानंतरच वटपौर्णिमेचे व्रत सुरू होते.चार जूनला पौर्णिमा सकाळी 9:11 वाजता संपते. त्यामुळे कॅलेंडरमध्ये दोन पोर्णिमा दाखवल्या असल्या तरी 3 जूनला येणारी पौर्णिमा हीच वटपौर्णिमा आहे. याच दिवशी वटपौर्णिमेचे व्रत साजरे करावे.

वटपोर्णिमा महत्व व शुभ मुहूर्त

पौर्णिमा तिथी प्रारंभ : ३ जून २०२३ सकाळी ११.१७पौर्णिमा तिथी समाप्ती : ४ जून २०२३ सकाळी ९.११

वटपौर्णिमा का साजरी केली जाते?

वटपौर्णिमा हिंदू धर्मियांचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे.या दिवशी हिंदू स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची श्रद्धापूर्वक पूजा करतात. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वडाची पूजा ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेला केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या नष्ट होतात आणि वैवाहिक सौख्य, सहजीवन अधिक चांगले होते.

जागतिक पर्यावरण दिन 2023 World Environment Day 2023

वटपौर्णिमेची व्रत कसे असते?

ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी सती सावित्रीने आपल्या पतीला यमाच्या पाशातून मुक्त करून पुन्हा प्राप्त केले होते. तोच हा ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जरी वटपौर्णिमेचे व्रत तीन दिवसाच्या असले तरी पौर्णिमेच्या दिवशी एकाच दिवशी व्रत साजरे केले तरी वटपौर्णिमा व्रताचे पुण्य प्राप्त होते… असे समजले जाते.

वटसावित्री व्रताचे महत्त्व

वट म्हणजे वडाचे झाड. वडाचे झाड हे दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध आहे. खूप मोठा विस्तार वडाच्या झाडाचा असतो. वडाच्या झाडाच्या आश्रयाने अनेक पशु,पक्षी, जीव राहत असतात. त्यांचे घरटेही तिथेच असते. एक प्रकारे वडाचे झाड हे एक संसारी दांपत्याचे प्रतीक आहे.

दीर्घायुष्यासाठी असणाऱ्या वडाच्या झाडाचे पूजन केल्याने आपल्याही पतीचे आयुष्य दीर्घ होते. अशी एक प्राचीन पौराणिक समजूत आहे. त्याचप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात वडाचे झाड हे पूजनीय समजले जाते. या ठिकाणी भगवान शंकराचे अस्तित्व आहे अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळे वटसावित्रीच्या व्रताचे महत्त्व खूप आहे.

वटसावित्रीच्या पौराणिक कथेनुसार सती सावित्रीने आपला पती सत्यवानाला यमराजाच्या पाशातून सोडवून आणले होते. त्याला वड साक्षीदार आहे. आणि यमराजाचा आशीर्वाद आहे की या ठिकाणी वडाच्या झाडाला सात फेरे मारून जी स्री वडाची पूजा करील त्याचे वैवाहिक जीवन सुखी समृद्ध आणि दीर्घायुष्य होईल.

वडाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवशंकर विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या फाद्यांना पारंब्या असतात… यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे.सती सावित्री ही पतिव्रता आहे.

वटपौर्णिमा श्रद्धा की अंधश्रद्धा

आधुनिक काळाचा विचार करता लोक विज्ञानवादी झाले आहेत.ते प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा मानू लागले आहेत.परंतु हिंदू धर्म शास्त्रातील व्रते आणि वैकल्ये यांना मानसशास्त्राचा भक्कम आधार आहे. एखाद्या पत्नीने किंवा पतीने एकमेकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणे, आशीर्वाद घेणे हा मानसशास्त्राचा भाग आहे. व्रतवैकल्य केल्याने मानसिक शांतता लागते. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाकडे असणारी अमर्याद ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. अशी हिंदू धर्मियांची श्रद्धा आहे.

वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर वडाच्या झाडाला जे धाग्याने बांधले जाते ते एक प्रकारे बंधनाचे प्रतीक आहे. भगवान शंकराला आणि दीर्घायुषी वडाला आपल्या वैवाहिक सुखासाठी जणूकाही बंधन घातले जाते. आशीर्वाद मागितला जातो.

Disclaimer

( Diclaimer:-वटपौर्णिमा 2023 मराठी Vat Purnima 2023 Date And Time in Marathi वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment