हुतात्मा दिन 30 जानेवारी Hutatma Din Information in Marathi

हुतात्मा दिन Hutatma Din Information in Marathi

भारतामध्ये दरवर्षी 30 जानेवारीला होतात मधील पाळला जातो. 30 जानेवारी 1948 या दिवशी भारत ज्यांना राष्ट्रपिता मानतो, त्या महात्मा गांधींचा या दिवशी निर्दयपणे खून करण्यात आला. नथुराम गोडसे नावाच्या एका माथेफिरूने हे कृत्य केले. भारत स्वतंत्र झाला. परंतु भारत मातेच्या कंठामधील अनमोल दैदिप्यमान हिरा अशा पद्धतीने काळाच्या अधीन झाला. फारच दुःखद घडले. महात्मा गांधी आपल्या कार्याने अमर झाले. तो दिवस दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो.

महात्मा गांधीं वर मराठी निबंध व भाषणे Essays and speeches on Mahatma Gandhi in Marathi

महात्मा गांधी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा अमर असा दीपस्तंभ आहे. आपल्या विचाराने सदैव धगधगणारी ती एक महान वैचारिक मशाल आहे. सत्य अहिंसा आणि शांतता या मार्गाने हिंदुस्तान आणि संपूर्ण जग सुखारी आणि समाधानी राहू शकते. हे जगाला आधुनिक काळात दाखवून देणारा जणूकाही एक ईश्वरी प्रेषित म्हणून गांधीजींना जगभर अजूनही मान्यता आहे.

एखाद्याला शरीर रूपाने या जगातून नष्ट केल्यानंतरही त्याचे विचार संपत नसतात. याउलट ते अधिकाधिक उजळून निघतात. हे महात्माजींच्या मृत्यूने वारंवार सिद्ध केले आहे.

2 ऑक्टोबर 1869 या दिवशी महात्मा गांधींचा जन्म पोरबंदर येथे झाला. एक सुसंस्कृत आणि सभ्य कुटुंबामध्ये महात्मा गांधींना उत्तम संस्कार मिळाले. लहानपणी स्वभाव भित्रा असला तरी चांगल्या गोष्टीसाठी बेडरपणे कृती करण्याची त्यांची सवय होती. एक निर्मळ मनाचा हा महात्मा महात्मा कसा झाला हे एक मोठे आश्चर्य जगभरातील लोकांना वाटले. महात्मा गांधी नावाचा हाडा माणसांचा महापुरुष या पृथ्वीवर होऊन गेला असा पुढील पिढ्यांना विश्वास वाटणार नाही असे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले होते ते काही खोटे नाही.

राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व निबंध Essay on National Integration In Marathi

इंग्लंडमध्ये वकिलीची सनद घेऊन मोहनदास करमचंद गांधी हिंदुस्थानामध्ये आले. भारतात काही दिवस वकिली केल्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेत आपल्या व्यवसायानिमित्त गेले. त्या ठिकाणी होणारे स्वतःवरील आणि भारतीयांवरील होणारे अन्याय पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले. त्यांनी लोकांना संघटित केले आणि त्या ठिकाणच्या सत्ताधारी इंग्रजांच्या विरुद्ध सनदशीर मार्गाने संघटित लढा दिला. काही प्रमाणात यशही मिळवले. सत्याच्या मार्गाने गांधीजींन लढा देण्यासाठी स्वतःची एक नियम आणि पद्धती बनवली. त्यालाच त्यांनी सत्याग्रह असे नाव दिले. सत्याग्रहाचा जन्म हे त्या ठिकाणच्या वास्तव्याचे एक यश म्हणावे लागेल.

गांधीजी भारतात परतल्यानंतर भारतीय स्वतंत्र लढ्यातील महनीय व्यक्तींना त्यांनी भेटणे सुरू केले. डॉक्टर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून त्यांनी संपूर्ण भारत फिरून पाहिला, समजून घेतला. गोपाळ कृष्ण गोखले यांचा सनदशीर मार्ग गांधीजींना जवळचा वाटला. त्याच मार्गाने पुढे जाऊन भारतीयांवरील अन्याय दूर करत,जनमत जागृत करत, स्वातंत्र्यासाठी लढा उभारण्याचे त्यांनी ठरवले.

सन 1915 मध्ये त्यांनी आपल्या भारतातील कार्याला सुरुवात केली.1917 मध्ये बिहारमधील चंपारण्य भागातील शेतकऱ्यांवरील अन्याय विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाचे रणसिंग फुंकले. त्यांनी निळीचा सत्याग्रह असे ही म्हटले जाते. गांधीजींनी 1920 यावर्षी असहकार आंदोलन सुरू केले खरे तर हे वर्ष खूप वेगळे होते. लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व काळाने हिरावून घेतले होते. संपूर्ण भारतात असंतोष पसरला होता. भारताला एका सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज असताना गांधीजींनी 1920 साली असहकार आंदोलनाला सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्य क्षितिजावर एक नेतृत्व तारा उगवला.

पुढे 1930 यावर्षी सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींचे हाती घेतली ही चळवळ अतिशय नेटाने गांधीजीनी लढवली आणि चालवली परंतु अजूनही देश सर्वंकष लढ्यासाठी सिद्ध नाही असे त्यांना वाटले.त्यामुळे अधिकाधिक जनजागृती करून इंग्रजांची सत्ता गिळंकृत करणारे जन आंदोलन उभारण्याची त्यांनी निती आखली आणि ते जनजागृती करू लागले.

दुसरे महायुद्ध चालू असताना 8 ऑगस्ट 1942 या ऐतिहासिक दिवशी मुंबईच्या गवालिया टँक येथे गांधीजींनी इंग्रजांना छोडो भारत चलेजाव असा हुकूम फर्मावला इंग्रजांनी भारत सोडून जा.आमचा देश आमच्या ताब्यात द्या. असे इंग्रजांना ठणकावून सांगितले. भारतीयांना करेंगे या मरेंगे असा संदेश दिला आणि स्वातंत्र्य चळवळीत कोट्यवधी भारतीयांनी स्वतःला झोकून दिले.

पुढे 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला परंतु अखंड भारताचे स्वप्न धुळीला मिळाले भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन विभाग झाले म्हणजेच दोन देश झाले हे गांधीजींना आवडले नव्हते काही लोकांना वाटले की गांधीजी मुळेच असे झाले आहे. परंतु देश एकत्र हवा सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने रहावे असेच गांधीजींना वाटत होते.

महात्मा गांधी

फाळणीमुळे संपूर्ण भारतभर दंगली पेटल्या होत्या. पाकिस्तानमधून भारतात येणारे लोकांवर अनन्वित अत्याचार होत होते. महात्माजी अशावेळी दंगली सजवण्यासाठी ठिकाणी फिरत होते.

30 जानेवारी 1948 या मंगल दिनी प्रार्थनेला जात असताना गोळ्या झाडून गांधीजींना मारले गेले. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. अवघे जग हळहळले.महात्मा गांधींच्या केवळ एका शब्दावर चालणारा देश दुःखाने पेटला. आजही संपूर्ण भारतभर आणि जगभर या घटनेने लोकांना दुःख होते आणि महात्माजींच्या निर्देशित मार्गाने चालण्याची लोक शपथ घेतात.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

1 thought on “हुतात्मा दिन 30 जानेवारी Hutatma Din Information in Marathi”

Leave a Comment