महात्मा गांधीं वर मराठी निबंध व भाषणे Essays and speeches on Mahatma Gandhi in Marathi

Essays and speeches on Mahatma Gandhi in Marathi

महात्मा गांधी वर मराठी निबंध व भाषणे

मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता म्हणून सन्मान पावलेले एक जगद्विख्यात व्यक्तिमत्व होते. महात्मा गांधीं विषयी प्रत्येक भारतीयाला आदर आणि अभिमान आहे. महात्मा गांधी वर मराठी निबंध व भाषणे आपण पाहणार आहोत.

महात्मा गांधी वर मराठी निबंध व भाषणे Essays and speeches on Mahatma Gandhi in Marathi {100 शब्दांत}

महात्मा गांधी हे नाव आजही साऱ्या जगात अतिशय आदराने घेतले जाते. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. महात्माजींचा जन्म पोरबंदर येथे दिनांक 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी झाला. महात्मा गांधी लहानपणी एक बुजरे आणि मध्यम बुद्दीचे विद्यार्थी होते. महात्मा गांधींचे शिक्षण बॅरिस्टर या पदवीपर्यंत झाले. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्या व्यवसायासाठी गेले. तिथे त्यांनी भारतीय लोकांना एकत्र करून इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यानंतर भारतात येऊन जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून लढा उभारला. अहिंसा आणि सत्य या दोन तत्त्वांवर गांधीजींची श्रद्धा होती. गांधीजींनी सत्याग्रहाचा वापर करून इंग्रजांविरुद्ध यशस्वी लढा दिला. भारत स्वतंत्र झाला. गांधीजींना एका माथेफिरूने 30 जानेवारी 1948 रोजी गोळ्या घालून मारले. महात्माजी त्यांच्या विचाराने अमर झाले आहेत.

महात्मा गांधी वर मराठी निबंध व भाषणे Essays and speeches on Mahatma Gandhi in Marathi {200 शब्दांत}

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रणी योद्धा म्हणून महात्मा गांधीजींचे स्थान अद्वितीय आहे. गांधीजींचा जन्म गुजरातेतील पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. कस्तुरबा यांच्याशी 1883 महात्माजींचा विवाह झाला. लग्नानंतर गांधीजी इंग्लंडला वकिलीची बॅरिस्टर ही पदवी मिळवण्यासाठी गेले. तिथे जाऊन दारू आणि मांस या गोष्टीला कधीही शिवायचे नाही आणि परस्त्रीला आई समान मानण्याची त्यांच्या आईने त्यांना शपथ दिली होती. ती त्यांनी निग्रहपूर्वक पाळली.
बॅरिस्टर अॅट लाॅ ही पदवी घेऊन महात्माजी भारतात परतले.पुढे आफ्रिकेमध्ये व्यवसायानिमित्त त्यांना जावे लागले. त्या ठिकाणीही सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने भारतीय लोकांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी लढा दिला.
भारतात आल्यानंतर महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चले जाव अशा चळवळींचे नेतृत्व करून इंग्रजांविरुद्ध फार मोठे जनआंदोलन त्यांनी उभारले.
इंग्रजांविरुद्ध लढताना सर्वसामान्य माणसांना बरोबर घेता यावे म्हणून सत्य, शांतता, अहिंसा अशा तत्त्वांचा अंगीकार करून सत्याग्रहाचे हत्यार गांधीजीनी वापरले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीत सर्वसामान्य स्री-पुरुष, मुले सहभागी होऊ शकले.
महात्माजींना लोक प्रेमाने बापू म्हणत. स्वामी श्रद्धानंद  यांनी  त्यांचा”महात्मा” असा पहिल्यांदा उल्लेख केला. स्वातंत्र्याच्या चळवळीबरोबर भारतातील अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठीही गांधीजींनी प्रयत्न केले. सर्व धर्मीयांमध्ये सुसंवाद ठेवून कार्य करण्याची त्यांची पद्धत लोकप्रिय झाली.
अशा या महात्म्याला 30 जानेवारी 1948 या दिवशी अकस्मात दुःखद अशा हत्येला सामोरे जावे लागले. महात्माजी मृत्यू पावले तरी त्यांचे विचार कोणीही नष्ट करू शकत नाही.

महात्मा गांधी वर मराठी निबंध व भाषणे Essays and speeches on Mahatma Gandhi in Marathi {300 शब्दांत}

भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ जनसामान्यांपर्यंत नेऊन त्यांच्या साथीने शेवटपर्यंत इंग्रजांशी लढा देत इंग्रजांकडून स्वातंत्र्य हिसकावून घेणारा महान योद्धा म्हणजे महात्मा गांधी होत. विसाव्या शतकातील महान नेतृत्व महात्मा गांधी होते. गांधीजींनी जगाला शांतता, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने कोणताही अन्यायाविरुद्धचा लढा कसा लढावा,याचे मार्गदर्शन स्वतःच्या आदर्शाने घालून दिले.
गांधीजींचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदरला 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी झाला. लग्नानंतर इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी वकिलीची बॅरिस्टर ही पदवी मिळवली. भारतात परतल्यानंतर काही दिवस मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय केला. त्यामध्ये त्यांना फारसे यश आले नाही. पुढे ते दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्या कामानिमित्त गेले. तिथे नाताळ इंडियन काँग्रेस या संस्थेची स्थापना केली. दक्षिण आफ्रिकेत या संस्थेच्या माध्यमातून लोक एकत्र केले आणि गांधीजींनी त्यांना आपले न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
जवळजवळ 21 वर्ष आफ्रिकेत राहिल्यानंतर महात्माजी भारतात परतले. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी त्यांनी भरून काढली. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चले जाव चळवळ त्यांनी नेटाने लढवली. स्वदेशीचा नारा त्यांनी दिला. चरख्याचा वापर करून गावोगावी स्वदेशीचा जागर केला. इंग्रजांनी मिठावर कर बसवल्यानंतर त्यांनी त्याविरुद्ध दांडी यात्रेचे नियोजन करून सत्याग्रह केला.
भारतातील सर्व धर्मियांमध्ये आणि जातीजमातीमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या साह्याने भारताचा स्वातंत्र्यलढा सर्वदूर पोहोचवला.सन 1942 च्या 8 ऑगस्ट रोजी गांधीजींनी मुंबईतून इंग्रजांना चले जाव छोडो भारत असा आदेश हजारोंच्या साक्षीने दिला. खूप मोठे आंदोलन करेंगे या मरेंगे या निग्रहाने सुरू केले. परंतु चौरीचौरा येथील दुर्दैवी घटनेमुळे त्यांना ते मागे घ्यावे लागले. या आंदोलनामुळे इंग्रज हतबल झाले. अशातच दुसरे महायुद्ध पेटले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन करून इंग्रजांशी लढा उभारला होता. त्यामुळे इंग्रजांना भारत स्वतंत्र करावा लागला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताची फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली. गांधीजींना खूप वाईट वाटले. फाळणीच्या वेळी फार मोठ्या दंगली सुरू झाल्या. या दंगली शमाव्यात म्हणून गांधीजींनी प्रयत्न केले. गांधीजींचे काही विचार आणि निर्णय काही लोकांना पटत नव्हते. त्यांच्यापैकीच एका माथेफिरुने 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींना गोळ्या झाडल्या. एका महात्म्याचा दुर्दैवी अंत झाला. परंतु त्यांचे महान विचार आजही जगाला दिशा देत आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment