ग्लोबल वार्मिंग समस्या व उपाय Global warming causes and solutions

ग्लोबल वार्मिंग समस्या व उपाय

Global Warming Causes And Solutions

ग्लोबल वार्मिंग समस्या व उपाय Global warming causes and solutions

”माणसाच्या इंधन वापरामुळे आणि औधौगिक उत्पादनामुळे कार्बन डायओक्साइड , मिथेन सारखे ग्रीनहाऊस वायु वातावरणात सोडले जातात. परिणामी पृथ्वीचे तापमान वाढत आहे. याला ग्लोबल वॉर्मिंग असे म्हटले जाते.”

ग्लोबल वार्मिंग समस्या व उपाय,जगभरामध्ये हवामान बदलाच्या भयानक परिणामांनी चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. ग्लोबल वार्मिंगच्या समस्येने मानव समाजच काय एकंदरीत पृथ्वीवरील जीवसृष्टीला गंभीर इशारा दिला आहे. ग्लोबल वार्मिंग समस्या आणि उपाय यावर आपापले विचार पर्यावरण शास्त्रज्ञ मांडत आहेत.ग्लोबल वार्मिंग या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आणि ते चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी जगभर संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रयत्न चालवलेले आहेत.

कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांवर कडक कारवाईचे संकेतही दिले जात आहेत. कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड, क्लोरोफ्ल्युओरो कार्बन, मिथेन यासारखे विषारी वायूमुळे पृथ्वीवरील तापमान वाढ होत आहे. कार्बन उत्सर्जन समस्या व उपाय या मध्ये आपण यावर चर्चा करणार आहोत. कार्बन उत्सर्जन कमी करणे., एकोणीसाव्या आणि विसाव्या   शतकातील औद्योगिक क्रांतीने जगाला चांगले आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. परंतु या औद्योगिक क्रांतीने जगापुढे नव्याने काही समस्या सुद्धा आणल्या.

राष्ट्राराष्ट्रांमध्ये औद्योगिक उत्पादनाची प्रचंड स्पर्धा तयार होऊन कार्बन उत्सर्जनाला जणूकाही चालनाच मिळाली. त्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्बन उत्सर्जन झाले. त्याचा परिणाम म्हणून कार्बन डाय ऑक्साइड वायूचे प्रमाण वाढले. ओझोन वायूच्या पृथ्वीवरील आवरणाच्या कवचाला  मोठे भगदाड पडले. अतिवृष्टी, वादळे,अवेळी पडणारा पाऊस, उष्णतेच्या लाटा, समुद्राच्या पाण्याची वाढलेली पातळी यासारख्या  समस्यांनी पृथ्वी संकटात आल्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्याची किती गरज आहे हे जाणवत आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने त्यासाठी जगभरातील राष्ट्रांना इशारा देतानाच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्यक्रमही दिला आहे. त्यानुसार काम होणे गरजेचे आहे. कोणताही विकास कार्यक्रम हा सृष्टी साठी हानिकारक न ठरता पर्यावरणस्नेही पद्धतीने राबवला पाहिजे. कार्बन फूटप्रिंट कमी कशी होईल. याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे.

कार्बन डायऑक्साइडचे ऑडीट

कोणतेही अवाजवी उत्पादन आज कार्बन डाय ऑक्‍साईडच्या उत्सर्जनाच्या शिवाय होत नाही. औद्योगिक उत्पादन करताना जो काही कार्बन-डाय-ऑक्‍साईड किंवा इतर विषारी वायू यांचे उत्सर्जन होते त्याचे  ऑडिट झाले पाहिजे.  ते ऑडिट करताना त्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. त्याविषयीचे निकष आणि निष्कर्ष हे प्रत्येक कारखान्याच्या बाहेर जिथे सर्वांना दिसेल अशा ठिकाणी व्यवस्थित लावले पाहिजेत. जेणेकरून सदर कारखान्याची हा पर्यावरण काय स्थिती आहे हे सर्वांना कळून येईल.

पुनर्वापर(REUSE)

पुनर्वापर करून आपण कार्बन उत्सर्जन कमी करू शकतो.प्रत्येक वस्तू ही पुनर्वापर करून त्यापासून दुसरे उत्पादीत घेऊन आपण वापरू शकतो. त्यामुळे कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन कमी होईल .पुनर्वापर  गरजेचं आहे. कारखान्यांना अधिकचे उत्पादन करण्याची गरज पडणार नाही.प्रोडक्शन कमी झाल्यामुळे आपोआपच कार्बन उत्सर्जन नाही.ते कमी होईल. कचऱ्याची समस्या सुद्धा यातून कमी होईल.

लोकसंख्या शिक्षण

आफ्रिका, आशिया खंडातील अनेक देशांमध्ये लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट झाला आहे. अतिरिक्त वाढलेली लोकसंख्या ही अधिकच्या कार्बन उत्सर्जनाला चालना देत आहे. परिणामी हे वाढलेले कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी लोकसंख्या शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. डिजिटल विभागातील विविध समाज माध्यमांचा वापर करून याविषयी या लोकसंख्येचे शिक्षण या संकल्पनेवर काम केले गेले पाहिजे.

11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन

अतिरिक्त वाढलेली लोकसंख्या ही जरी समस्या असली तरी या लोकसंख्येला पर्यावरणाविषयी साक्षर केल्यामुळे एकविसाव्या शतकात असलेल्या ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी कार्यप्रवण करता येईल. प्रत्येक व्यक्तीला आपण काही तरी या पर्यावरणाचे देणे लागतो. या भावनेतून पर्यावरण मुल्ये आत्मसात करावी लागतील. याचा फायदा ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर उपाय शोधताना होईल.

वृक्षारोपण वृक्षसंवर्धन आणि प्राणी संवर्धन

जगभरात प्रचंड वृक्षतोड होऊन संपत्तीच्या हव्यासापोटी पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढणे गरजेचे आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील प्रचंड जंगल तोडले जात आहे. जंगलांचे अपरिमित झालेले नुकसान भरून येणे ही निकडीची बाब निर्माण झाली आहे. वृक्षारोपण तर झालेच पाहिजे, परंतु त्या वृक्षांचे संवर्धनही केले गेले पाहिजे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध

वृक्ष संवर्धन झाले तर अतिरिक्त कार्बन शोषला जाईल आणि तापमानवाढीच्या समस्येवर अंकुश लावता येईल. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील विविध प्रकारचे पशुपक्षी आणि सजीव यांच्या जाती धोक्यात येत आहेत. नष्टप्राय होत चाललेल्या आणि धोक्यात येत असलेल्या सजीवांना वाचवण्याचे जोरदार प्रयत्न होणे गरजेचे आहे. जंगलांना लागणाऱ्या आगीपासून जंगलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वाढली आहे. याआगी मधून प्रचंड कार्बन उत्सर्जन होते.जंगलांची हानी झाल्यामुळे उत्सर्जन होणारा कार्बन शोधला जात नाही.परिणामी होणारे दुहेरी नुकसान अतिशय हानिकारक आहे.

सण उत्सव आणि महोत्सव

मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे। माणसे सण-उत्सव यातून आनंद शोधत आहेत. तो आनंद अधिक वाढावा म्हणून तो प्रयत्न करतो.लग्न समारंभ यासारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी खेचतात. अशावेळी त्या समारंभाचे एखादे पर्यावरण संरक्षणाचा विचार मांडणारे ब्रीदवाक्य असेल तर त्या ठिकाणी उपस्थित असणारे लोक आपोआपच त्यादृष्टीने आपला वर्तन बदल करू शकतात. या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ स्क्रीन लावले जातील.

यावर पर्यावरण विषयक किंवा ग्लोबल वार्मिंगबाबत असणारे छोटे छोटे व्हिडीओ दाखवले जावेत. वधुवरांना शुभेच्छा देताना एखाद्या पर्यावरण तज्ञ व्यक्तीचे छोटेसे व्याख्यान आयोजित करावे .विवाह समारंभ, दिवाळी सारख्या सणाच्या वेळी प्रचंड फटाके वाजवले जातात. या फटाक्यांच्या धुरातून आणि आवाजातून तापमान वाढते. विषारी वायू उत्सर्जित होतात. परिणामी ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर संघर्ष करताना अडथळे तयार होतात .त्यामुळे हे सण समारंभ साजरे करण्याबाबत शासनाने एक पर्यावरणस्नेही नियमावली घालून दिली पाहिजे.

अभ्यासक्रम

शिक्षण व्यवस्थेमध्ये अभ्यासक्रमाची आखणी या गोष्टीला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। अभ्यासक्रमाची आखणी करताना आजच्या ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्यांवर ठळकपणे जागृती करणारे पाठ्यक्रम यांचे निर्मिती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ते प्रभावीपणे राबवले जातात की नाही याकडे पर्यवेक्षण यंत्रणेने डोळसपणे लक्ष दिले पाहिजे.

ग्लोबल वार्मिंग ही अतिशय ज्वलंत समस्या आहे. त्यामुळे बालवाडी पासूनच मुलाला या समस्येची जाणीव करून दिली, तर एक जागरूक नागरिक म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वमध्ये सकारात्मक पर्यावरण मुल्ये निर्माण. होत  जातील. शाळांमध्ये या संदर्भात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, नाट्य स्पर्धा ,समूहगीत स्पर्धा, व्हिडिओ निर्मिती स्पर्धा, पोस्टर स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले तर ही जागरूकता अधिकच वाढेल.

कचऱ्याची समस्या आणि ग्लोबल वार्मिंग

प्रत्येक व्यक्ती दररोज काही ना काही कचरा तयार करीत असते. हा तयार झालेला कचरा एक समस्या अक्राळविक्राळ रूप घेऊन आपल्यासमोर येतो. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले नाही .,तर ग्लोबल वार्मिंग उत्सर्जनाच्या चळवळीला धक्का पोहोचतो.पहिले म्हणजे कचरा निर्माण होऊ नये  याची काळजी घ्यावी. निर्माण झालेला कचरा हा  त्याचे विलगीकरण करून त्यातून उत्पादने बनवता येतात .तसेच ऊर्जा निर्मिती सुद्धा करता येते.

त्या दृष्टीने यंत्रणा निर्माण होण्याची गरज आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये विविध प्रकारचे कचरे हे ग्लोबल वार्मिंगला नकळत चालना देत आहेत. ठिकठिकाणी कचरा डेपोना आगी लागतात. महिनोन् महिने त्या आगी विझत  नाही. किती नुकसान होत असेल त्यामुळे पर्यावरणाचे ! मन विषण्ण करणारी ही बाब आहे. कचऱ्यातील प्लास्टिकसारख्या वस्तूंचे ज्यावेळी   ज्वलन होटे, त्यावेळी त्यातून भयंकर विषारी वायूंचे उत्सर्जन होते. हे उत्सर्जन ग्लोबल वार्मिंग वाढवते.

सारांश

थोडक्यात सांगायचे झाले तर ग्लोबल वार्मिंग की फार मोठी समस्या असली, तरी त्यावरही आपल्याकडे अनेक उपाय आहेत. प्रश्न इतकाच आहे की त्याकडे अधिक जागरूकतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. तसे झाले नाही तर, ग्लोबल वार्मिंगच्या दुष्परिणामांना केवळ मानव जातीलाच नव्हे तर संपूर्ण सृष्टीला सामोरे जावे लागेल आणि कोणत्याही भयानक युद्धाविना या पृथ्वीला मृत्यू पत्करावा लागेल.

ही एक प्रकारची आत्महत्या ठरेल. ग्लोबल वार्मिंग ही समस्या मानवच सोडवू शकतो. मानवाने ग्लोबल वार्मिंगकडे लक्ष नाही दिले तर, ती पृथ्वीवरील जीवनाची मृत्युघंटा ठरेल यात शंकाच नाही.

ग्लोबल वार्मिंग समस्या व उपाय Global warming causes and solutions

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment