विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध Vidnyan Ani Apatti Vyavasthapan

विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन Vidnyan Ani Apatti Vyavasthapan

विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन Vidnyan Ani Apatti Vyavasthapan या विषयावर आपण या ठिकाणी निबंध पाहणार आहोत. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी या निबंध चा आपल्याला निश्चित उपयोग होईल.

मानवाला प्राचीन काळापासून असून वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. आपत्ती केवळ नैसर्गिक असतात असे काही नाही. तर त्या मानवनिर्मित सुद्धा असतात. नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर, दुष्काळ, चक्रीवादळे, भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी, जंगलातील आग, आकाशातील वीज सुनामी लाटा हवामानामुळे होणारे विमान अपघात वादळी जहाजे समुद्रात बुडणे इत्यादी आपत्तींचा समावेश होतो. तर मानवनिर्मित आपत्तीमध्ये आगी लावणे, अपघात घडवून आणणे, युद्ध, दहशत माजविणे, कारखान्यांमध्ये अपघात, खून, मारामाऱ्या,मोर्चे घेराव, ट्रॅफिक जाम होणे, हवा- पाणी- मृदा प्रदूषण, मालमत्तांचे नुकसान इत्यादींचा समावेश होतो. आपत्ती ही नैसर्गिक असो की मानवनिर्मित ती एक आपत्ती असते आणि त्या मुळे मानवी जीवनाबरोबरच इतर जीवसृष्टी धोक्यात येत असते.

प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध Plastic mukt Bharat Marathi Nibandh

आपत्ती मानवनिर्मित असोत की नैसर्गिक असोत त्यांचे व्यवस्थापन करणे हे ही एक निकडीची गरज होऊन बसते आणि आधुनिक युगामध्ये विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती मध्ये व्यवस्थापन करणे सहज शक्य झाले आहे.

नैसर्गिक आपत्तींमध्ये दरवर्षी हजारो लोकांचा बळी जातो. बचाव कार्यसंघ आणि मदत एजन्सी अनेकदा बचाव मोहिमा आयोजित करण्यासाठी आणि प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी विज्ञान झालेल्या संशोधन आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असतात. वर्षानुवर्षे, प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे, ज्यामुळे आपत्ती मदत निवारणात तंत्रज्ञानाची भूमिका अधिक सखोल झाली आहे.

नैसर्गिक आपत्ती पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी, संभाव्य आपत्ती आणि त्याचे परिणाम याबद्दल योग्य जागरूकता निर्माण करून, माहिती तंत्रज्ञान साधनांच्या वापराद्वारे एक योग्य इशारा प्रणाली, आपत्ती सज्जता आणि आपत्तींचे व्यवस्थापन विकसित करून हा त्रास कमी केला जाऊ शकतो.

आधुनिक काळामध्ये वातावरणामध्ये खूप बदल होत चालले आहेत. त्यामुळे पूर, चक्रीवादळे, दुष्काळ यासारख्या आपत्ती निर्माण होतात. असे असले तरी अवकाशामध्ये हवामान विषयक उपग्रह सोडलेले आहेत त्यांचा वापर करून अशा संकटांचा पूर्व अंदाज घेणे शक्य होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिकच सोपे होऊ लागले आहे. आपत्ती व्यवस्थापनाची विज्ञान हे एक नवेच शास्त्र विकसित होत आहे आणि त्यामुळे मानवी जीवन अधिक सुरक्षित होऊ लागले आहे.

एकविसाव्या शतकामध्ये विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रत्येक देशाने आपला आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज केला आहे. आपल्या देशाने सुद्धा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची स्थापना केली आहे. ज्यावेळी देशांमध्ये कुठेही काही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येतात तेव्हा हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान त्या ठिकाणी जाऊन आपत्तीचे व्यवस्थापन करण्यामध्ये मदत करतात. अशा प्रकारे मदत करण्याची कार्यप्रणाली निश्चित केली गेली आहे.

मानवाने संशोधन करून अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमुळे कोणत्याही नैसर्गिक संकटाचा पूर्व अंदाज करणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ चक्रीवादळाचा अंदाज केल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे विस्थापन होत असते. यासाठी विविध प्रकारची वाहने विज्ञानाने निर्माण केले आहेत.त्यामुळे मानवी जीविताची हानी टाळली जाते. उपग्रह दळणवळण यामुळे आजच्या मानवाच्या हातात संपर्काचे माध्यम म्हणून मोबाईल सारखी वस्तू आली आहे. त्यामुळे कोणत्याही संकटाची वस्तुस्थिती नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थेला समजते आणि निर्णय घेणे शक्य होते.

अनेक दशकांपासून संकटकाळात विज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्या कार्याची व्याप्ती आहे विस्तृत होत आहे. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळी या ठिकाणी भूस्खलनाची आपत्ती आली. ही आपत्ती नैसर्गिक होती. परंतु वेगवान माहिती संप्रेषण आणि विज्ञान निर्मित आधुनिक वाहने यांचा वापर करून त्या ठिकाणी मदत कार्य राबविण्यात आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झालेले असतानाही त्या ठिकाणी पुनर्वसन झालेले आहे. सातारा,सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये महापुराचा प्रचंड धोका नेहमीच असतो.मागील काही वर्षे या ठिकाणी प्रचंड पावसाने महापुराचा धोका निर्माण झाला. शेकडो गावी पूरग्रस्त झाली मानव विविध प्राणी पिके यांची प्रचंड हानी झाली. याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी अभूतपूर्व कामगिरी करून लोकांचे प्राण वाचवले हा विज्ञानाचा चमत्कार आहे.

सन 1993 मध्ये लातूर भागात आलेला भूकंप किंवा गुजरात मधील भुज या ठिकाणी आलेला भूकंप नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात विज्ञानाने बजावलेल्या कामगिरीमुळे व्यवस्थापन करणे शक्य झाले.उत्तराखंडमधील केदारनाथ या ठिकाणी जी नैसर्गिक आपत्ती आली. त्या ठिकाणी भारताच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जे काम केले ते अतुलनीय आहे विज्ञान या ठिकाणी देवासारखे धावून आले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान आम्हाला वातावरणीय, भूगर्भीय, जलशास्त्रीय आणि जैविक उत्पत्तीच्या नैसर्गिक धोक्यांची यंत्रणा समजून घेण्यास मदत करते जी पूर, तीव्र वादळ, भूकंप यांच्या अभ्यास, प्रयोग आणि निरीक्षणातून शिकलेल्या तथ्यांच्या व्यवस्थित प्रणालीने बनलेली असते. , भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी आणि त्यांचे मानवजातीवर आणि त्याच्या कार्यांवर होणारे परिणाम. वैज्ञानिक आणि तांत्रिक शाखांमध्ये मूलभूत आणि अभियांत्रिकी विज्ञान, नैसर्गिक, सामाजिक आणि मानवी विज्ञान यांचा समावेश आहे.

अलीकडच्या काळातील कोरोना महासाथीच्या दरम्यान विज्ञान हे एक वरदान दिसून आले. काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर धोरणावर आधारित माहितीचा वापर करून शास्त्रज्ञांनी लस शोधून काढली. जगातील कोट्यावधी लोकांना या लसीचा फायदा झाला आणि त्यांचे प्राण वाचले जात आहे आपत्ती व्यवस्थापन मध्ये अशाप्रकारे विज्ञानाचा फायदा त्यांना दिसून येत आहे.

आधुनिक विज्ञानाने निर्मित इंटरनेट, जीआयएस, रिमोट सेन्सिंग, सॅटेलाइट कम्युनिकेशन इत्यादींच्या रूपात माहिती तंत्रज्ञानातील प्रगती धोके कमी करण्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात फार मोठी मदत करू शकते. जास्तीत जास्त फायद्यासाठी, सार्वजनिक दळणवळणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे आणि या उपाययोजनांद्वारे नैसर्गिक आपत्ती कमी करण्याचे संदेश दिले गेले पाहिजेत. जीआयएस सिस्टीम नैसर्गिक धोक्यांच्या मूल्यांकनांच्या विश्लेषणाची गुणवत्ता आणि शक्ती सुधारू शकते, विकास क्रियाकलापांचे मार्गदर्शन करू शकते आणि नियोजकांना शमन उपायांच्या निवडीमध्ये आणि आपत्कालीन तयारी आणि प्रतिसाद कृतीच्या अंमलबजावणीमध्ये मदत करू शकते.

थोडक्यात सांगायचे तर वैज्ञानिक विचारसरणी ही कार्यकारण भाव असा विचार करते वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर मानव पृथ्वीवरील विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.

विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन Vidnyan Ani Apatti Vyavasthapan या विषयावरील हा निबंध आपल्याला आवडल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन असे अधिकाधिक निबंध लिहीण्यासाठी आपण निश्चित प्रोत्साहन द्याल अशी आशा करतो.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment