प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध Plastic mukt Bharat Marathi Nibandh

प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध Plastic mukt Bharat Marathi Nibandh

आपण या ठिकाणी प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध Plastic mukt Bharat Marathi Nibandh पाहणार आहोत.प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध Plastic mukt Bharat Marathi Nibandh हा निबंध सर्व निबंध स्पर्धा, निबंध लेखन यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.आपण हा निबंध वाचून आपल्या स्वतःच्या भाषेत निबंध लिहू शकता किंवा हा निबंध जसाच्या तसा वापरून निबंध लेखन करू शकता.

प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध Plastic mukt Bharat Marathi Nibandh

प्लॅस्टिकचा वापर हा आज दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात होत आहे. पृथ्वीवरच्या निसर्गासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. पर्यावरणाचे प्रचंड नुकसान प्लास्टिकच्या अतिवापराने आज झाले आहे होत आहे. त्यामुळे प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध Plastic mukt Bharat Marathi Nibandh होण्याची कधी नव्हे ती अतिशय ज्वलंत गरज बनली आहे.

प्लास्टिक मुक्तीची गरज

प्लॅस्टिकचा शोध ही एक गरज होती. प्लॅस्टिकच्या शोधाची गरज ही एक जीवघेणी वस्तुस्थिती बनेल असे त्यावेळी कोणाला वाटले नसेल.परंतु पर्यावरणपूरक सवयी नसल्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक वापरत आहोत. प्लॅस्टिकचा हा धोकादायक वापर संपूर्ण निसर्गासाठी अतिशय घातक ठरणार आहे असे वैज्ञानिक वारंवार इशारा देत आहेत. पर्यावरणवादी आपले विचार विविध प्रकारे आंदोलने करून,विविध व्यासपीठावर आपले विचार मांडून, प्लॅस्टिक मुक्तीची गरज सांगून जागरूक राहण्याबद्दल सर्वांना आपापल्या परीने समजावून सांगत आहेत. परंतु सर्वसामान्य माणसांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली नाही हेच दिसून येते.

प्लास्टिक मुक्त भारत अभियान

आपला भारत देश हा सुजलाम सुफलाम सस्य शामलम असा देश आहे. अशा या सुंदर आणि सौभाग्यशाली भारतामध्ये प्लॅस्टिकच्या अतिवापराने विद्रुपता आली आहे. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा असे आपण अभिमानाने म्हणत असतो. परंतु हा सुंदर असलेला भारत देश अधिकच सौंदर्याने परिपूर्ण करायचा असेल तर आपल्याला प्लॅस्टिक मुक्त भारत अशा प्रकारच्या अभियानाची नितांत गरज आहे.

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा मराठी भाषण Speech on Mulgi Vachava Mulgi shikwa in Marathi

आज आपण भाजी बाजारात जा,किराणा दुकानात जा, मॉलमध्ये जा, कापड दुकान, फेरीवाले,अन्नपदार्थ विकणारे हे आणि इतर अनेक ठिकाणी प्लॅस्टिकच्या वापराचा दुर्दैवी अतिरेक आपल्याला पाहायला मिळतो. आपण प्लॅस्टिकची बाटली पाणी पिण्यासाठी वापरतो;हे किती धोकादायक आहे हे आपल्याला माहीत नसावे. याशिवाय आपण जेवणासाठी प्लास्टिकचे डबे वापरतो. अन्नपदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिकचे वेगवेगळ्या आकाराचे डबे वापरतो. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. म्हणून प्लॅस्टिक मुक्त भारताची गरज आपल्याला दिसून येते.

प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम

प्लॅस्टिकच्या अतिवापराने केवळ मानवच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीतील प्रत्येक सजीव बाधित होणार आहे. हे ध्यानात घेऊन आपण प्रत्येकाने प्लास्टिक मुक्तीसाठी एक कार्यकर्ता या नात्याने पुढे होऊन प्लॅस्टिक मुक्तीचा ध्यास घेणे ही एक काळाची ज्वलंत आणि निगडीची गरज बनली आहे. हे प्रत्येकाने आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. प्लॅस्टिक ही आज आपल्याकडे एक भयानक व भेडसावणारी समस्या होऊन बसली आहे. ही समस्या सोडवायची असेल तर आपल्याला पावले उचलावीच लागतील.तरच प्लास्टिक मुक्त भारत होऊन जाईल.

चला तर मग आपण आज प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा करूया. मी प्लॅस्टिकचा वापर अत्यंत मर्यादित स्वरूपात करेन बाजारात गेलो तर स्वतःची सुती कापडाची पिशवी घेऊन जाईल. ज्यामुळे आपोआपच भाजी विक्रेत्यांकडून आपल्याला दिले जाणारे प्लॅस्टिकचे साठे पडून राहतील.परिणामामी आपल्या घरी प्लास्टिक येणार नाही. कचऱ्यात प्लास्टिक जाणार नाही. याची काळजी आपोआपच घेतली जाईल.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे मी प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करणार नाही हे प्रत्येकाने दृढपणे ठरवले पाहिजे. आज आपण पाहतो की जिथे तिथे पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जातो. या बाटल्या सगळीकडे पडलेल्या दिसतात. कचरावेचक त्या बाटल्या उचलतात परंतु सर्वच काही बाटल्या उचलल्या जात नाहीत. त्या पर्यावरणामध्ये सोडल्या जातात आणि पर्यावरणाची न भरून येणारी हानी होते. याशिवाय प्लास्टिकची बाटली पाण्याला वापरल्यामुळे प्लॅस्टिकचे कण आपल्या शरीरामध्ये जातात. प्लास्टिकचे आरोग्यावर होणारे परिणाम अतिशय घातक असतात. ते आपल्या आरोग्यावर प्राणघातक परिणाम करतात. म्हणून प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टील,तांबे यासारख्या धातूंच्या बाटल्या आपण वापरल्या पाहिजेत.

प्लॅस्टिक मुक्त भारत ही आजच्या 21 व्या शतकात भारत अमृत महोत्सव स्वतंत्र्य दिन साजरा करत असताना अतिशय महत्त्वाची स्थिती मानली पाहिजे. शिक्षण, प्रबोधन, विविध समाजमाध्यमे याद्वारे जाणीव जागृती करून प्लॅस्टिक वर मोठा घनाघाती घाव घालण्याची गरज आहे. हे प्लॅस्टिक आपल्या दैनंदिन वापरातून कायमची हद्दपार करणे हेच आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे.म्हणून प्लॅस्टिकला पर्यावरणस्नेही असा पर्याय आज आपण दिला नाही तर उद्याचे भविष्य अंधकारमय असणार आहे;यात शंकाच नाही. तात्पर्य असे की प्लॅस्टिक मुक्त भारत म्हणजे खरे स्वातंत्र्य मानता येईल.

प्लास्टिक मुक्त भारतासाठी केवळ समाज प्रबोधन करून चालणार नाही. तर यासाठी भारताने कठोरात कठोर कायदे निर्माण करून त्यांची अंमलबजावणी कठोरतम पद्धतीने केली पाहिजे. कायदे येतात आणि जातात.लोक पळवाटा काढून त्या कायद्यांना निष्प्रभ करतात. परंतु प्लास्टिक विषय कठोर कायदे केवळ करून भागणार नाही आणि त्यातील पळवाटा शोधणे असते तर अत्यंत चुकीचे ठरेल. मानवाला आपल्या भवितव्याचा विचार अधिक विधायक पद्धतीने करायचा असेल; तर अशा कायद्यांची अंमलबजावणी ही प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी नक्कीच केली पाहिजे. हे सर्व उद्याच्या प्लॅस्टिक मुक्त भारतासाठी अतिशय गरजेचे आहे.

प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध Plastic mukt Bharat Marathi Nibandh

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment