स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh Marathi

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh Marathi

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh marathi या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची गरज म्हणून देत आहोत.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh marathi स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त अनेक ठिकाणी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होत आहेत. त्या सर्वांना हा निबंध मार्गदर्शनपर ठरेल यात शंकाच नाही.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh marathi

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत.

भारत देश जवळजवळ चौदाशे वर्ष वेगवेगळ्या प्रांतात आणि भागात पारतंत्र्य अनुभवत होता.जागोजाग स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या होत्या.परंतु भारताच्या स्वातंत्र्यासाठी खरी क्रांतीची अग्निज्वाला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेतून आणि त्यासाठी त्यांनी सुलतानांच्या जुलमी राजवटीविरुद्ध दिलेल्या लढ्यातून खऱ्या अर्थाने निर्माण झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवरायांचे योगदान अत्यंत मुलगामी व प्रेरणादायी होते.

व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रज डच पोर्तुगीज इत्यादी युरोपीय लोकांनी भारत देश हळूहळू आपल्या जुलुमी राजवटीखाली आणला.तो कसा आणला हे भारतीयांना सुद्धा आश्चर्य वाटू लागले. वेगवेगळ्या लढा यांमधून इंग्रजांनी फोडा झोडा आणि राज्य मिळवा.राज्य करा. अशी भेदनीती अवलंबून संपूर्ण हिंदुस्तान किंवा भारतीय उपखंडच आपल्या टाचेखाली आणला.

माझ्या स्वप्नातील 2047 चा भारत My vision for India in 2047

भारत देश यापूर्वीच परकीय जुलमी रानटी सुलतानांच्या गुलामगिरीत होता आणि आता इंग्रजांच्या अन्यायकारक जुलमी सत्तेखाली आला. अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर यश न मिळता संपुष्टात आले.

भारतामध्ये इंग्रजांनी शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्यामुळे सुशिक्षित तरुणांमध्ये विचारवंत निर्माण झाले. वेगवेगळ्या विचारवंत आणि देशभक्तांनी वर्तमानपत्रे सुरू केली राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केले आहे राजा राम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये जागृती निर्माण केली महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले लोकहितवादी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्र जागृत केला देशाच्या विविध भागांमध्ये विचारांच्या जागृतीने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलने उभी राहिली.

लोकमान्य टिळकांनी देशाला जहाल नेतृत्व दिले. त्यांनी देशाला खडबडून जागे केले. बिपिन चंद्र पाल लाला लजपत राय बाळ गंगाधर टिळक या तिघांनी संपूर्ण हिंदुस्थान गदागदा हलवून स्वातंत्र्याच्या प्रेरणेने जागा केला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये पाय रोवून उभे राहिले. टिळक युगानंतर गांधी युग सुरू झाले.

महात्मा गांधींनी सत्य अहिंसा शांतता या चिरंतन मार्गांनी भारताचा स्वातंत्र्य लढा अखंडपणे सुरू ठेवला. स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्य माणसा पर्यंत नेली याच वेळी हिंदुस्तानामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर,भगतसिंग, सुखदेव,राजगुरू,सचिंद्रनाथ संन्याल, खुदीराम बोस, चंद्रशेखर आजाद,जतीनदास,अनंत कान्हेरे अशा अनेक क्रांतिकारकांनी देशभर सशस्त्र क्रांतीचा लढा सुरू करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या सर्वांची नावे आज इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत. परंतु सर्वच देशभक्त आणि क्रांतिकारक आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास सर्वांसमोर आलाच असे नाही. कारण इतिहासाची काही सोनेरी पाने अज्ञात असतात हा जणू इतिहासाला शापच असतो. भारताचे स्वातंत्र्य अखंड हिंदुस्थानचे धर्मावर आधारित दोन तुकडे होऊन प्राप्त झाले. फाळणीची भळभळती रक्ताळलेली जखम घेऊन भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आज या गोष्टीला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत.

देश स्वतंत्र झाला पण देशाच्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने देशभक्त आणि क्रांतिकारकांनी वैभव शाली आणि बलवान भारत देशाचे स्वप्न पाहिले होते; एका समता, शांतता आणि बंधुता यांनी परिपूर्ण असणाऱ्या सार्वभौम भारत राष्ट्राचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न आज साकार झाले का? असा प्रश्न प्रत्येक भारतीयांनी स्वतःला विचारला पाहिजे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने साजरा तर केलाच पाहिजे. कारण यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या अगणित ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारक आणि देशभक्त यांना खऱ्याअर्थाने आदरांजली वाहता वाहता त्यांच्यातील देशभक्तीची जाज्वल्य भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी ही अपेक्षा करता येईल. स्वातंत्र्याचा पावन मंगल दिन ज्यांनी आपल्याला दाखवला त्या महान देशभक्ताला स्मरावे; त्यांचा आदराने उल्लेख करावा; त्यांचे बलिदान व योगदान व्यर्थ गेले नाही हे आपल्या कृतीतून दाखवून द्यावे. यासाठी आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव प्रत्येक नागरिकांनी अगदी आनंदाने साजरा करावा.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज देशापुढे असलेल्या ज्वलंत समस्यांचा विचारपूर्वक आढावा घेऊन एक वैचारिक सिंहावलोकन होणे गरजेचे आहे. आज देशापुढे असलेल्या सामाजिक संरक्षण विषयक समस्या अतिशय भेदकपणे भारत राष्ट्राला पोखरत आहेत. प्रांतभेद, जातिभेद, लिंगभेद, भाषाभेद, सामाजिक असमता,आर्थिक असमता, दहशतवाद यांनी भारत देश मेटाकुटीला आला आहे.सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीवर बसलेलं दारिद्र्य पाहिलं की भारत मातेच्या डोळ्यातून किती दुःखाचे अश्रू दररोज वाहत असतील याची कल्पना येते.

1947 ला देश स्वतंत्र झाला आणि 2047 ला भारत जगामध्ये एक महासत्ता म्हणून निर्माण वाहे आज आपण स्वप्न जरुर पाहत आहोत परंतु देशभक्तांनी पाहिलेली स्वप्ने काय होती याचा आपल्याला विसर पडला नाही ना? असा प्रश्न आज माझ्या मनात निर्माण होतो. कारण आर्थिक दृष्ट्या आणि संरक्षण दृष्ट्या भारत बलवान जरी झाला तरी सर्वसामान्य भारतीय नागरिकाचे जीवनमान कितपत उंचावले आहे? हा फरक खरं विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

ए मेरे वतन के लोगो जरा आंखो मे भरलो पानी

जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी”

असे नम्रतापूर्वक प्रत्येक भारतीयाला सांगून आपल्या भारतातील सामान्यातील सामान्य देशबांधवांना स्वातंत्र्याचे फळे मिळाली पाहिजेत.यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न करावेत. यासाठी प्रेरणा निर्माण होतो आणि यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा

“आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे,

आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे” असे म्हणून थांबतो.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment