माझ्या स्वप्नातील 2047 चा भारत My vision for India in 2047

माझ्या स्वप्नातील 2047 चा भारत My vision for India in 2047

2022 या वर्षांत संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. येथून पुढील पंचवीस वर्ष भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. कारण स्वातंत्र्याची पहिली 100 वर्षे 2047 ला पूर्ण होणार आहेत. कोणत्याही देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य ही अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत निकडीची नैसर्गिक गरज आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याचा उपयोग देशाला बलशाली आणि वैभवशाली महासत्ता होण्याच्या प्रवासाची असली पाहिजेत. 2047 चा शतायुषी,स्वातंत्र्य प्राप्त असलेला भारत कसा असेल My vision for India in 2047 याविषयी माझी काही स्वप्ने आहेत.

15 ऑगस्ट 1947 या मंगल दिनी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि एका नव्या युगाला प्रारंभ झाला. दोनशे वर्षे भारतामध्ये इंग्रजांनी भारतीयांवर अनन्वित अन्याय करून देशांमधील अमाप संपत्ती लुटून नेली आणि देश कंगाल केला. भारताच्या संपत्तीचे दोहन इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच आणि मध्यपूर्व आशियातील राष्ट्रांनी अनेकदा केले. चौदाशे वर्षांपूर्वी असलेले भारताचे वैभव नष्ट झालेला भारत पुन्हा समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी भारतीय नेतृत्व प्रयत्न करीत राहिले. परंतु त्यामध्ये उल्लेखनीय म्हणावे इतके यश आले नाही असे माझे मत आहे.

2047 मध्ये असणारा भारत हा दहशतवादापासून संपूर्णतया मुक्त असेल दहशतवादी गट आणि त्यांना खतपाणी घालणारे लोक या येत्या पंचवीस वर्षांमध्ये नष्ट झालेले असतील. भारताचे लष्कर सर्व प्रकारच्या कारवायांना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तोंड देऊन दहशतवादाचा समूळ नायनाट करतील. भारताच्या शत्रूंना भारताच्या सामर्थ्याची जरब बसेल इतकी शक्ती भारताच्या सैन्यदलामध्ये असेल. त्यामुळे भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही.जगाच्या पृष्ठभूमीवर भारत एक बलाढ्य आर्थिक आणि सामरिक महासत्ता म्हणून उदयाला येईल.भारताचा पाकव्याप्त काश्मीर हा भाग हा काही वर्षातच भारताच्या पुन्हा ताब्यात येईल. चीनने बळकावलेली भूमी सुद्धा भारत आपल्या बुद्धी कौशल्याने आणि लष्करी ताकडीने पुन्हा आपल्या ताब्यात घेईल. जगाच्या कानाकोपर्‍यातून भारताच्या महासत्तेचं निर्विवादपणे स्वागत होईल.

भारत आर्थिक दृष्ट्या एक बलाढ्य आणि स्वयंपूर्ण राष्ट्र म्हणून 2047 मध्ये उदयास येईल. भारत देश एक आर्थिक स्वातंत्र्य असलेला देश म्हणून असेल. भारतातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक स्वातंत्र्याचा अनुभव घेता येईल. भारतातील गरिबी नष्ट होऊन भारत हा सर्व प्रकारच्या संपत्तीने वैभवपूर्ण आणि गौरवशाली राष्ट्र म्हणून जगाच्या क्षितिजावर नांदत असेल.जगातील महासत्ता भारताच्या शब्दांना महत्त्व देतील.भारताच्या नेतृत्वाखाली जगाचा कायापालट होईल.

भारतातील शिक्षण हे पूर्णतया व्यवसायाभिमुख राहून विद्यार्थी हे नोकरीच्या नाहीतर व्यवसायाच्या दृष्टीने आपल्या करिअरसाठी वाटा निवडतील. विद्यार्थ्यांमध्ये नोकरी करण्याची इच्छा कमी होऊन ते व्यवसाय सन्मुख होतील. जगभर असलेली सर्व संशोधने भारतामध्ये चांगल्या प्रकारे होऊन भारतातील विज्ञान क्षेत्र जगातील प्रथम क्रमांकाचे असेल. त्यामुळे कोणीही बेकार राहणार नाही. बेकारी किंवा बेरोजगारी ही समस्या संपेन. औद्योगिकदृष्ट्या भारत हा संपन्न राष्ट्र राहून पर्यावरणाला महत्त्व देऊन भारत शाश्वत विकासाचा निर्माता आणि शिल्पकार होईल.

2047 च्या भारतामध्ये स्री पुरुष समानता अतिशय चांगल्या प्रकारे निर्माण होईल. स्त्री आणि पुरुष असा भेदभाव कोणाचाही मनामध्ये राहणार नाही. शिक्षणाच्या बाबतीत देशामध्ये लिंग भेद भाव समूळ नष्ट होईल. स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असताना अमृत महोत्सवी वर्षांमध्ये मला असे वाटते की आजही आपण स्त्रिया आणि पुरुषांमध्ये भेदभाव करत आहोत हा एक प्रकारे आपल्या देशाला लागलेला महाभयानक घातकी रोग आहे या रोगाचे समूळ उच्चाटन 2047 मध्ये होईल असा प्रयत्न सर्व भारतीयांनी करून देशाला भेदभावाच्या अमंगळ दलदलीतून बाहेर काढावे.

2047 मध्ये भारत कोणत्याही जातीय, धार्मिक, लैंगिक, वांशिक, प्रांतिक, आर्थिक-सामाजिक भेदभावापासून पूर्णतया मुक्त असेल. अशा भेदभाव मुक्त भारताचे स्वप्न मी पाहतो तेव्हा माझ्या देशातील देशबांधव अशा प्रकारचे भेदभाव काय आहेत आणि त्याचे वाईट परिणाम समजून घेऊन निश्‍चितच योग्य दिशेने वाटचाल करतील 2047 मध्ये आपला भारत देश भेदभाव मुक्त होईल.

आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विषयी अनेक कायदे मंजूर झालेले आहेत. आजही आपल्या देशामध्ये अंधश्रद्धांचा प्रचंड सुळसुळाट असून लोक नको त्या फंदात पडून आपल्या जीवनाचे नकारात्मक चित्र निर्माण करीत आहेत; हे दुःखदायक आहे. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अंधश्रद्धांवर अजूनही मोठा घाव घालण्याची गरज वाटते. येत्या पंचवीस वर्षांमध्ये भारत निश्चितच यामध्ये यशस्वी होईल आणि 2047 हे वर्ष हे अंधश्रद्धा मुक्तीचे वर्ष ठरेल. समभावाची वैज्ञानिक दृष्टी आणि जीवनसरणी लोक अंगीकारतील.

2047 या वर्षापर्यंत भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या अत्युच्च बिंदूला देश पोहोचला आहे तसे चित्र दिसेल. सर्व प्रकारचे भेदभाव हे चुकीच्या गृहितकावर आधारित असल्याने प्रत्येक भारतीय नागरिक या भेदभावांना निश्चितच बाजूला करतील.सर्व प्रांत, सर्व धर्म, सर्व भाषिक, सर्व वंशाचे लोक एक राष्ट्र म्हणून भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तन-मन-धनाने निश्चितच योगदान देतील आणि राष्ट्रीय एकात्मतेचे सुंदर परिदृश्य पहायला मिळेल.

भारतामधले असलेले वनांचे प्रमाण 2047 मध्ये निश्चित वाढवून ते एकूण भूभागाच्या ते 33 टक्के पेक्षा जास्त असेल. प्रत्येक नागरिक वनांचे संरक्षण होण्यासाठी पुढे येऊन भारताला पुन्हा सस्यशामला भूमी निर्माण करेल. भारतामध्ये असलेल्या पाण्याच्या समस्या आणि तंत्रे उठून भारत ही एक सुजलाम सुफलाम भूमी म्हणून स्वर्गवत असेल.

भारताचे अंतराळ संशोधन हे उच्च क्षमतेचे होऊन भारतीय अंतराळ यांनी चंद्र मंगळ या ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण करतील. भारतीय लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने ते चंद्र-मंगळ किंवा इतर ग्रहांवर पर्यटन करण्यासाठी जातील. भारतातील अवकाश संशोधन संस्था ही जगातील प्रथम क्रमांकाची संशोधन संस्था होऊन तिच्या मार्गदर्शनाखाली जगभरच्या अवकाश संशोधन संस्था विश्वामध्ये आपली अंतराळयाने पाठवतील.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व स्वच्छ पर्यावरण निबंध Plastik Kachara Vyavasthapan V Swachha Paryavaran

सांस्कृतिक दृष्ट्या 2047 मध्ये भारत एक संपन्न राष्ट्र होऊन भारताच्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन होईल. सर्व धर्मीयांना भारताबद्दल आकर्षण निर्माण होऊन भारताचा प्राचीन वारसा अभ्यासण्यासाठी जगभरातील विद्वान भारतामध्ये संशोधनासाठी येतील. भारतीय विद्यापीठे ही जगातली पहिल्या दहा क्रमांकामध्ये असतील. तक्षशिला नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन होऊन भारत एक विद्या अलंकृत देश म्हणून पुन्हा जगाच्या नकाशावर वेगळीच छाप सोडेल. माझ्या स्वप्नातील 2047 चा भारतMy vision for India in 2047 एक प्रकारे सांस्कृतिक संदर्भांचे आणि संस्कृतींचे एक मध्यवर्ती केंद्र म्हणून उदयास येईल.

प्रधानमंत्री को लिखे पत्र 2047 के बारे मे

थोडक्यात काय तर 2047 मधील माझा भारत देश My vision for India in 2047 एक बलशाली, वैभवशाली, सुखी,संपन्न महासत्ता म्हणून जगाच्या क्षितिजावर ध्रुवतारा याप्रमाणे राहून जगावर निर्विवाद अधिराज्य गाजवेल. असा हा बलसागर झालेला भारत विश्वामध्ये पृथ्वी मातेच्या गळ्यामधील एक अनमोल अलंकार म्हणून शोभेल.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

2 thoughts on “माझ्या स्वप्नातील 2047 चा भारत My vision for India in 2047”

Leave a Comment