५ सप्टेंबर शिक्षक दिन भाषणे Speeches on Teachers’ Day in Marathi

५ सप्टेंबर शिक्षक दिन भाषणेSpeeches on Teachers’ Day in Marathi

५ सप्टेंबर शिक्षक दिन भाषणे Speeches on Teachers’ Day in Marathi

Speeches on Teachers day in Marathi
Speeches on Teachers’ day in Marathi

भाषण क्रमांक – १ Teachers Day Speech no. 1

Speeches on Teachers day in Marathi

शिक्षक दिन आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि यांचा जन्मदिन आहे. शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना माझा आदरयुक्त प्रणाम !

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी विसाव्या शतकामध्ये शिक्षक म्हणून जगभरात मोठ्या विद्यापीठांमध्ये काम केले. शिक्षक या पदाची उंची त्यांनी आपल्या कर्तृत्वाने वाढवली. कुलगुरू,राजदूत, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती अशी पदे असताना सुद्धा डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षक या पदाचा कधीही त्याग केला नाही.

आपल्यातील शिक्षक त्यांनी जिवंत ठेवला. शिक्षक या पदाचा गौरव वाढवला. म्हणून आपण आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. डॉ. राधाकृष्णन यांना त्यांच्या विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.

भाषण क्रमांक -२ Teachers Day Speech no. 2

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्मदिन आपण सगळे शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. राष्ट्रपतीपदावर असताना काही विद्यार्थी त्यांच्याकडे त्यांचा वाढदिवस साजरा करावा यासाठी गेले. त्यावेळी डॉ.राधाकृष्णन यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी माझा हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा असे सांगितले.

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी

5 सप्टेंबर 1962 पासून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांनी जगभरात शिक्षक म्हणून अध्यापनाचे पवित्र कार्य गेले. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करतो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्रपणे अभिवादन करतो. त्याचप्रमाणे जगभरातील माझ्या आदरणीय शिक्षकांना नम्रतापूर्वक अभिवादन करतो. आणि माझे छोटेसे भाषण याठिकाणी थांबवतो.

भाषण क्रमांक -३ Teachers Day Speech no. 3

सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज शिक्षक दिन म्हणून यांची जयंती अतिशय अभिमान पूर्वक आपण साजरी करतो. त्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी गावांमध्ये 5 सप्टेंबर 1888 या दिवशी झाला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवणे पसंत केले. आंध्र विद्यापीठ बनारस हिंदू विद्यापीठ याशिवाय इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी अध्यापन केले. शिवाय आंध विद्यापीठ,  बनारस हिंदू विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी कुलगुरुपद भूषविले.

आपला वाढदिवस साजरा न करता तो दिवस विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन म्हणून साजरा करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार 5 सप्टेंबर 1962 पासून त्यांचा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

संपूर्ण भारतात सर्व शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा होतो. शिक्षकांना विविध पुरस्काराने गौरविले जाते. शिक्षकांच्या कार्याबद्दल देशभर कृतज्ञता व्यक्त केली जाते. अशा या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सर्व शिक्षक शिक्षिकांना शिक्षक दिनी मी विनम्र अभिवादन करतो.

भाषण क्रमांक – ४, Teachers Day Speech no. 4

आज आपण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. शिक्षक दिन सर्व शाळांमध्ये दरवर्षी साजरा होतो. शिक्षक दिन साजरा करत असताना आपण सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून डॉक्टर राधाकृष्णन यांना अभिवादन करतो.

आई नंतर खरे शिक्षक हे पूजास्थानी गणले गेले आहेत. विद्यार्थ्यावर उत्तम संस्कार आणि ज्ञानाने संपन्न करणारे मार्गदर्शक आहेत.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर या दिवशी झाला. ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांनी आजन्म शिक्षक राहण्याचे व्रत पूर्ण केले. विविध पदे असूनही त्यांनी शिक्षक पदाची गौरव पूर्ण उंची वाढवली.

तत्त्वज्ञान हा विषय अतिशय सोप्या भाषेत जगभर शिकवला. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाला काही विद्यार्थी साजरा करण्याच्या बेतात होते. त्यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांनी सांगितले की असे करण्यापेक्षा माझा वाढदिवस तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करावा.

डॉ. राधाकृष्णन यांची इच्छा प्रमाण मानून विद्यार्थ्यांनी हा दिवस शिक्षक दिन म्हणून पाळला. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्णन आणि जगातील सर्व शिक्षकांना या मंगल दिनी विनम्र अभिवादन करतो.

भाषण क्रमांक – ५ , Teachers Day Speech no. 5

अध्यक्ष महोदय, आदरणीय गुरुजन वर्ग, माझ्या बाल मित्रांनो,
5 सप्टेंबर हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेलेला आहे. या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉ. राधाकृष्णन आपले शिक्षण पूर्ण करून अध्यापनाचे कार्य करत होते. त्यांचे अध्यापन अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने चाले.

डॉक्टर राधाकृष्णन विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय प्राध्यापक म्हणून गणले जात. तत्वज्ञान सारखा कठीण विषय सहज पद्धतीने ते शिकवत. आंध्र विद्यापीठ, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ या ठिकाणी त्यांनी कुलगुरू म्हणून काम केले. कुलगुरू म्हणून काम करत असतानाही त्यांनी ज्ञानदानाचे कार्य बंद केले नाही ते सुरूच ठेवले.

रशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्य करीत असताना सुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा त्या ठिकाणी त्यांनी उमटवला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून त्यांचे कार्य प्रशंसनीय होते. भारताचे दुसरे राष्ट्रपती असताना एक तत्त्वज्ञ व्यक्ती राष्ट्रपती झाला, म्हणून जगभर त्यांचे कौतुक झाले.

प्रसिद्ध तत्वज्ञान प्लेटोच्या संकल्पनेप्रमाणे एक तत्वज्ञ व्यक्ती राजा झाला. म्हणजेच आता पृथ्वीवर स्वर्गाचे राज्य सारख्या देशामध्ये निर्माण होईल अशी कल्पना जगभरातील राजनीतिज्ञ लोक मांडू लागले.

डॉक्टर राधाकृष्णन यांनी  जगभरातील विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली. एक शिक्षक म्हणून जगभर ते विख्यात होते. एक शिक्षक म्हणून डॉक्टर राधाकृष्णन यांनी आपली जीवन मुल्ये आयुष्यभर जोपासली.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक म्हणून काम करणारे भारताचे पहिले राष्ट्रपती ठरले. त्यांच्या गौरवार्थ ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. माझ्या आदरणीय शिक्षकांना या शिक्षक दिनी आदरपुर्वक प्रणाम करतो.

५ सप्टेंबर शिक्षक दिन  भाषणे Speeches on Teachers’ Day in Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment