Har Ghar Tiranga Abhiyan: ‘हर घर तिरंगा’ अभियान काय आहे?

Har Ghar Tiranga Abhiyan: ‘हर घर तिरंगा’ अभियान काय आहे?

Har Ghar Tiranga Abhiyan
Har Ghar Tiranga Abhiyan

दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. भारत सरकारनेही स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशात अमृत महोत्सव (Amrutmahotsav)साजरा करण्यात येत आहे.

Amrutmahotsav

या महोत्सवानिमित्त सरकारनं हर घर तिरंगा अभियान(Har Ghar Tiranga Abhiyan) हाती घेतले आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या काळात प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार आहे. प्रत्येक स्वातंत्र्य देशाचा स्वत:चा राष्ट्रीय ध्वज असतो. भारताचा राष्ट्रध्वज अशोक चक्रांकित तिरंगा आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियान Har Ghar Tiranga Abhiyan काय आहे?

तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे. यासाठी भारत सरकारने २० कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्याची सरकारची योजना आहे. आज प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबवली जात आहे, पण एक काळ असा होता की प्रत्येक घरावर तिरंगा फडकवता येत नव्हता, असे अनेक बदल घडले, ज्यानंतर सामान्य माणूस घर, कार्यालय, शाळांमध्ये तिरंगा आता फडकवू शकतो.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh Marathi

२००२ मध्ये ध्वजसंहितेत बदल केल्यानंतर सर्वसामान्यांना हा अधिकार मिळाला. आज जेव्हा प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची चर्चा होत आहे, अशा परिस्थितीत आम्ही तिरंग्याच्या ध्वज संहितेतील तरतुदींबद्दल समजून घेत आहोत. भारतीय ध्वज संहितेच्या कलम २.१ नुसार, प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक, खाजगी किंवा शैक्षणिक संस्थेत तिरंगा फडकविण्याचे स्वातंत्र्य आज आहे. असे असले तरी, तिरंगा ध्वज फडकवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण १९७१ च्या Prevention Of Insults To National Honour Act कायद्यांतर्गत काही नियम आहेत जे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजेत.

तिरंगा फडकवण्याचे काय नियम आहेत?

तिरंगा फडकवताना तिरंग्याचा आदर सर्वोतोपरी असला पाहिजे हे ध्यानात ठेवा.

● कधीही गलिच्छ किंवा फाटलेला तिरंगा झेंडा फडकवू नका.

●तिरंगा कधीही उलटा फडकवू नये.

●जेव्हा तुम्ही तिरंगा फडकावता तेव्हा वरच्या बाजूला भगवा रंग दिसला पाहिजे.

●ध्वज कुणापुढे झुकता कामा नये.

●तसेच तिरंग्याभोवती इतर कोणताही ध्वज त्याच्यापेक्षा उंच नसावा किंवा त्याच्या बरोबरीचा असू नये.

●तिरंग्याच्या खांबावर इतर काहीही ठेवू नका. यामध्ये फुलांच्या हार किंवा इतर चिन्हाचा समावेश आहे.

●तिरंगा फडकवताना तो जमिनीवर किंवा पाण्यात नसावा.

●राष्ट्रध्वजाचा वापर ड्रेस म्हणून करू नये.

● तुम्ही तुमच्या रुमाल, उशी किंवा अशा कोणत्याही वस्तूवर तिरंगा राष्ट्रध्वज वापरू शकत नाही.

● राष्ट्रध्वज तिरंग्यावर काहीही लिहिता येणार नाही.

सारांश

नियम खूपच महत्त्वाचे आहेत. कारण आपल्या देशाचा अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज हा मानाचा बिंदू आहे. ( Har Ghar Tiranga Abhiyan: ‘हर घर तिरंगा’ अभियान काय आहे?)लक्षावधी हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि देशभक्तांच्या योगदानातून स्वातंत्र्य मिळाले आणि त्या स्वातंत्र्याचे हे प्रतीक म्हणजेच अशोक चक्र तिरंगा एक अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय प्रतीक आहे. सर्वात महत्त्वाचे राष्ट्रीय प्रतीक म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे तिरंग्याचा मान प्रसंगी हा प्राण देऊनही ठेवला पाहिजे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment