झाडावरचे भूत मराठी बोधकथा क्रमांक 3 Bodhkatha

झाडावरचे भूत बोधकथा क्रमांक 3 Bodhkatha

झाडावरचे भूत बोधकथा क्रमांक 3 Bodhkatha

लहान मुलांना एखाद्या कोणत्याही गोष्टीची भीती लवकर वाटते. त्यांना भीती दाखवून मोठी माणसे गप्प बसवण्याचा प्रयत्न करतात.

नरेंद्रच्या (विवेकानंदांच्या) घराजवळ एक वयस्कर गृहस्थ राहत होते. त्यांच्या अंगणामध्ये एक मोठे चिंचेचे झाड होते. नरेंद्र आणि त्याचे सवंगडी नेहमीच त्या झाडावर खेळायला जात आणि त्या ठिकाणी धुडगूस घालीत. ते वयस्कर गृहस्थ म्हणजेच आजोबा या मुलांच्या धंद्यामुळे त्रासून गेले.या मुलांना आता आपण कशाची तरी भीती घालावी म्हणजे त्यांचे झाडावरचे खेळणे थांबेल असे वाटून एक दिवस ते आजोबा मुलांना म्हणाले,” हे बघा चिंचेच्या झाडावर खेळू नका बरं! त्या झाडावर एक मोठे भूत आहे. त्याने जर तुम्हाला धरलं ना एखाद्या दिवशी तर ते तुम्हाला खाऊन टाकेल.”

आता भूत म्हटल्यावर सगळे मुलं घाबरून लांब जाऊन उभी राहिली. पण नरेंद्र मात्र अजिबात घाबरला नाही. उलट भूत कसे असते ते आपण बघावे म्हणून झाडावर चढला फांद्यांना माकडासारखे लटकून झोके घेऊ लागला. बराच वेळ झाला अंधार पडू लागला तरी सुद्धा ते भूत काही आले नाही.

बोधकथा क्रमांक 1 मूळ स्वभाव Bodhkatha 1

हळूहळू जी घाबरलेली मुले होती त्यांच्यापैकी एक एक जण त्या झाडाजवळ आला. सर्व जण जमल्यानंतर नरेंद्र त्यांना म्हणाला,”अरे किती वेडे रे तुम्ही ! भूत बीत काही नसतं.आपण त्या झाडावर चढून गोंधळ ,धुडगूस नये म्हणून त्या आजोबांनी आपल्याला भुताची भीती दाखवली. अरे, आपण इतके दिवस त्या झाडावर किती खेळतोय. जर भूत खरोखर असतं तर ते आपल्याला इतक्या दिवसात दिसलं नसतं का?”

सगळ्या मुलांना नरेंद्र चे म्हणणे मनापासून पटले आणि अशा भाकड कथांवर म्हणजेच भूतांवर विश्वास ठेवायचा नाही हेही कळाले

तात्पर्य काही गोष्टी केवळ भीती दाखवण्यासाठी लोक सांगत असतात आपण त्याची शहानिशा करावी आणि खरे खोटे जाणून घ्यावे

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment