गुरुदक्षिणा बोधकथा मराठी क्रमांक 5 Gurudakshina Bodhkatha

गुरुदक्षिणा बोधकथा मराठी क्रमांक 5 Gurudakshina Bodhkatha

गुरुदक्षिणा बोधकथा मराठी क्रमांक 5 Gurudakshina Bodhkatha

खूप प्राचीन काळजी गोष्ट. एकदा एका ऋषींच्या आश्रमामध्ये 100 शिष्य विद्या शिकत होते.त्यांचे गुरु शिकवत होते.शिष्य ऐकत होते. सर्व शिष्यांचे अध्ययन संपल्यानंतर दीक्षांत समारोह कार्यक्रम होता. या कार्यक्रमांमध्ये शिष्यांनी गुरुदक्षिणा द्यायचे असते.

शिष्यांनी आपल्या गुरुवर्यांना विचारले, “गुरुजी, आपण आम्हाला एवढं ज्ञान दिलं. आम्ही तुम्हाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो. पण आपण तर त्यागी आहात. तुम्हाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? आपणच सांगावे?”

तेव्हा ते गुरुवर्य म्हणाले, ” शिष्यांनो, मला अशी गुरुदक्षिणांना जी जगात कोणाच्याही उपयोगाची नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा आहे.”

मग ते सर्व शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र,पात्र,धान्य यापैकी काहीही नको. कारण या वस्तू सर्वांच्या उपयोगाच्या असतात. शिष्यांनी अनेक वस्तू शोधल्या. मात्र त्यांना एकही अशी वस्तू सापडली नाही की जी निरुपयोगी आहे. ते निरुपयोगी वस्तू शोधत शोधत शोधत पुढे जात होते.

एका लहानशा ओढ्कायाठी ते आले. त्या ओढ्याच्या प्रवाहात एक पक्षाचे भलं मोठं पीस वाहत येताना दूरवरून त्यांनी पाहिलं. एक शिष्य म्हणाला,” हे पिसेस आपण आपल्या गुरुदेवांना देऊ. ते निरोपयोगी आहे.”

पीस जवळ आल्यावर त्यांनी पाहिलं तर त्या पिसावर काही मुंग्या होत्या. त्या म्हणाल्या,” आमचं वारूळ फुटल्यावर आम्हाला पलीकडे जायचं होतं. आम्ही सर्वांनी मिळून हे पीस पाहीले आणि त्यावर बसलो हे पीस आम्हाला उपयुक्त आहे.”

आता ते सर्व शिष्य विचार करू लागले आणि मनाशी समजून चुकले की जगातील कोणतीच वस्तू निरोपयोगी नसते.शिष्य अतिशय निराश मनाने परतले. आणि आपल्या गुरुदेवांकडे जाऊन त्यांनी सर्व सांगितले,की आम्हाला कोणतीही निरोपयोगी वस्तू शोधता आली नाही.

झाडावरचे भूत मराठी बोधकथा क्रमांक 3 Bodhkatha

त्यावेळी ते गुरुजी म्हणाले,” जगात कोणतीच वस्तू निरुपयोगी नाही हे ज्ञान तुम्हाला झालं.हीच माझी गुरुदक्षिणा. जगाच्या उपयोगी पडा.जगाच्या कल्याणासाठी कार्य करत रहा.”

तात्पर्य:- जगामध्ये कोणतीही गोष्ट निरुपयोगी नाही. फक्त आपल्याला तिच्या उपयोगाचा ज्ञान होणं महत्त्वाचं आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment