धाडसी नरेंद्र मराठी बोधकथा क्रमांक 4 Bodhkatha

धाडसी नरेंद्र बोधकथा क्रमांक 4 Bodhkatha

धाडसी नरेंद्र बोधकथा क्रमांक 4 Bodhkatha

ही कथा आहे स्वामी विवेकानंद सहा सात वर्षांचे असतानाची. स्वामी विवेकानंदांचे लहानपणीचे नाव नरेंद्र होते.एकदा नरेंद्र आपल्या मित्रांबरोबर शेजारच्या गावाला यात्रेला गेला. यात्रेमध्ये खेळण्याची आणि इतर वस्तूंची खूप सारी दुकाने होते. एका दुकानातील भगवान शंकराची मूर्ती नरेंद्र ला खूप आवडली. बराच वेळ त्या मूर्तीकडे तो बघत होता आणि शेवटी त्याने ती मूर्ती विकत घेतली.

हे सर्व होईपर्यंत नरेंद्रचे मित्र पुढे निघून गेले. त्यांना गाठायला म्हणून नरेंद्र झपाझप पावले टाकीत निघाला होता.घरी गेल्यानंतर आपण आणलेली शंकराची मूर्ती चौरंगावर कशी ठेवायची? तिची पूजा कशी करायची? अशी वेगवेगळी चित्रे नरेंद्र डोळ्यासमोर आणत होता.

इतक्यात नरेंद्र चे लक्ष रस्त्यावरून रांगत चाललेल्या एका लहान मुलाकडे गेले. एक घोडा गाडी अतिशय भरधाव वेगाने दौडत येत होती.ते मूल रस्त्याच्या बरोबर मध्यभागी रांगत चालले होते. एका क्षणाचाही उशीर झाला असता तर घोड्यांच्या टापाखाली आणि गाडीच्या चाकाखाली ते मुल चिरडले जाणार…. एवढ्यात नरेंद्रच्या हातातील ती लाडकी शिवाची मूर्ती गळून पडली आणि नरेंद्र एखाद्या बाणासारखा पुढे धावला. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच नरेंद्रने त्या मुलाला चटकन मागे ओढले. गाडी तशीच वेगाने पुढे निघून गेली. ते लहान बालक नरेंद्रच्या धाडसाने वाचले होते.

आता नरेंद्रचे लक्ष आपण घेतलेल्या शंकराच्या मूर्ती कडे गेले तिचे अगदी तुकडे तुकडे झाले होते. पण नरेंद्रला त्या गोष्टीचे वाईट वाटले नाही. मूर्ती फुटली यापेक्षा त्या लहान मुलाचे प्राण वाचले. याचा मोठा आनंद नरेंद्रला झाला होता.

तात्पर्य:- एखाद्या जीवाचे प्राण वाचत असतील,तर आवडत्या असलेल्या अगदी देवाच्या मूर्तीचाही आपण विचार करणे अयोग्य आहे.

धाडसी नरेंद्र बोधकथा क्रमांक 4 Bodhkatha

वाचनीय बोधकथा

झाडावरचे भूत बोधकथा क्रमांक 3 Bodhkatha

बोधकथा क्रमांक 2 सेवा हाच धर्म Bodhkatha

बोधकथा क्रमांक 1 मूळ स्वभाव Bodhkatha 1

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment