Aaji Ajoba Diwas Grandparents Day आजी आजोबा दिवस माहिती

 Aaji Ajoba Diwas आजी आजोबा दिवस माहिती

या लेखात आपण Grandparents Day Aaji Ajoba Diwas आजी आजोबा दिवस माहिती याविषयावर माहिती घेणार आहोत.

या वर्षापासून राज्यात आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. आपल्या जीवनामध्ये आजी-आजोबांचे महत्त्व या निमित्ताने मुलांच्या मनावर ठसले जावे असा मुख्य उद्देश याचा आहे.

Aaji Ajoba Diwas

आपण दरवर्षी योग दिन, पितृदिन, मातृदिन, बालिका दिन, विज्ञान दिन, मातृभाषा दिन, पर्यावरण दिन, बाल दिन, संविधान दिन अशा प्रकारचे विविध दिनविशेष साजरे करत असतो.प्रत्येक दिनामागे काही चांगले उद्देश असतात. त्याचप्रमाणे या वर्षापासून सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी आजी आजोबा दिन साजरा केला जाणार आहे. अशा प्रकारचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे.

आजी आजोबा दिवस परिपत्रक Download

आजी आजोबा दिन साजरा करण्याच्या सूचना शासनाने परिपत्रक काढून दिल्या आहेत. राज्यस्तर, जिल्हा स्तर, तालुकास्तर आणि शाळा स्तरावर आजी आजोबा दिवस आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये साजरा करावा असे शासकीय परिपत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.

सध्याच्या शहरीकरणामुळे त्याचप्रमाणे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना पूर्वीप्रमाणे मिळत नाही. मुलांचा मायेने सांभाळ करणाऱ्या आजी-आजोबांची माया – ममता मुलांना संस्कारित होण्यास फायदेशीर ठरते हे या निमित्ताने आपल्याला आधुनिक युगातील मुलांना दाखवून द्यायचे आहे. मुलांची जडणघडण होत असताना आजी आजोबांचे प्रेम मिळणे ही एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट असते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याची आवश्यकता असते.

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा मराठी भाषण Speech on Mulgi Vachava Mulgi shikwa in Marathi

प्रत्येक वर्षाच्या सप्टेंबरमध्ये येणाऱ्या पहिल्या सोमवार नंतर येणारा रविवार हा आजी आजोबा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.या वर्षीचा आजी आजोबा दिवस 10 सप्टेंबर 2023 रोजी येत आहे. जर या ठराविक दिवशी आजी-आजोबा दिवस साजरा करता आला नाही तर शाळेने स्वतः निर्णय घेऊन वर्षातील एक दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करावा असेही परिपत्रकात म्हटलेले आहे. यानिमित्ताने शासकीय परिपत्रकाने विविध प्रकारचे उपक्रम सुचविलेले आहेत.

शाळांमध्ये आजी-आजोबांना बोलावून त्यांच्याशी हितगुज केले जाणार आहे. आजी आजोबांशी असलेले नाते अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रमशील कृती ठरणार यात शंकाच नाही. मुलांवर होणारे संस्कार आजी आजोबा यांचा त्यामधील असणारा वाटा हा अनन्यसाधारण असतो.

आजी आजोबा दिनानिमित्त पुढील प्रकारचे उपक्रम शाळांमध्ये राबवता येतील.

1. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करुन द्यावा.

2. आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत. 

3. विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ सुद्धा ठेवण्यास हरकत नाही.

4. संगीत खुर्चीसारख्या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील.

5. आजी आजोबांसोबत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा. 

6. पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी आजोबांना बोलवावे. (ही बाब ऐच्छिक असावी)

7. महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

8. शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आजी आजोबांसाठी यावेळी कलाकृती सादर कराव्यात.

9. आजीच्या बटव्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे.

10.झाडे लावणे आणि पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे.

आजी आजोबा दिवस Grandparents Day Aaji Ajoba Diwas

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment