मुलगी वाचवा, मुलगी शिकवा मराठी भाषण Speech on Mulgi Vachava Mulgi shikwa in Marathi

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा मराठी भाषण Speech on Mulgi Vachava Mulgi shikwa in Marathi

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा मराठी भाषण Speech Mulgi Vachava Mulgi shikwa in Marathi

विचार कर चढण्याआधी, पायरी दवाखान्याची
काय गुन्हा केला मी अशी शिक्षा देता मृत्युदंडाची! माझी सुद्धा इच्छा आहे गं जग पाहण्याची
का कळेना तुला साद तुझ्या लेकराची?
का दया येईना फुलण्याआधी कोमेजल्या कळीची? थांब आई थांब … नको करू घाई मला मारण्याची

Mulgi Vachava Mulgi shikwa

आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय परीक्षक, उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या स्पर्धक व नटखट बालमित्रांनो मी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा …………. येथे ……….. वीमध्ये शिकतो. मित्रांनो, वरील ओळींतून तुम्ही माझ्या भाषणाचा विषय नक्कीच ओळखला असेल, हो
अगदी बरोबर मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. मित्रांनो, मुलगी वाचली तरच मुलगी शिकू शकेन. आजही आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की, एखादया स्त्रीला जर मुली होत असतील तर तिचा छळ केला जातो. तिचा छळ का करायचा, ती केवळ एका मुलीला जन्म देणार आहे म्हणून? पण आपण ही विचार करायला हवा आपण ही एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहे. ना!

मुलगी वाचवा मुलगी शिकवा विकासपिडिया

आपल्याला आई पाहिजे, बहिण पाहिजे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बायकोही पाहिजे, तर मुलगी का नको ? ती मुलगी या जगात येण्यास उत्सुक असते. मुलगी म्हणते नव्या युगाची भरारी अभिमानाने घेईन मी, अबला कुणी म्हणू नका.

समर्थ मी सक्षम मी

अपयशाला पार करून, यशोमंदीर गाठणारी, सुख दुःखाने न खचता पुढे जात राहणारी, दुसऱ्याच्या सुख दुःखात ही सामील होणारी, भावना व कर्तव्याना आधी जपणारी समर्थ मी,सक्षम मी , अहो, ज्या मातीत सावित्रीबाई,इंदिरा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला यांसारख्या थोर महिला जन्म घेऊन इतिहास घडवितात. त्याच मातीत मुलगी वाचवा म्हणण्याचीवेळ यावी. किती लाजिरवाणी गोष्ट नव्हे का? ‘बेटी धन की पेटी’ ही वृत्ती समाजात रुजली पाहिजे.

ये दुनिया अगर गुलशन है

हो नारी उसका माली है

झुक जाये तो दुर्गा है

अउ जाये तो चंडी काली है.

म्हणून म्हणतो मित्रांनो जगाचा उद्धार करायचा असेल तर सर्वप्रथम मुलगी वाचली पाहिजे.

स्वातंत्र्यपूर्वकाळात मुलींना शिक्षण देणे;म्हणजे एक प्रकारचे पाप समजले जात होते. चूल आणि मूल यातच गुरफटून ठेवले जात असे. याचा परिणाम काय झाला? अहो समाजात अज्ञान, अंधश्रद्धा यांना ऊत आला. महात्मा फुले यांनी पुढाकार घेऊन स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन सन 1948 रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलीची पहिली शाळा सुरू केली. परंतु या मुलींना शिकवणार कोण ? कोणीही तयार नव्हते. शेवटी महात्मा फुले यांनी मुलींना शिकविण्यासाठी सावित्रीबाईना सुशिक्षित करून शिक्षण दिले.

मित्रांनो, आज ती परिस्थिती नाही. आपण आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविण्यासाठी तिला शिकवले पाहिजे. मुलीला कशाला शिकवायचे ही वृत्ती न बाळगता मुलगा माझा अभिमान तर मुलगी माझा स्वाभिमान’ ही वृत्ति जोपासली पाहिजे.

माझा आवडता नेता निबंध Maza Avadata Neta Nibandh

ज्याप्रमाणे १८५७ च्या उठावात आशरिया राणीने स्वत: महिमांची पलटण उभी केली आणि सिद्ध करून दाखविले की,

गुमी हुई आजादी की किस्मत सबने पहचाने थी

चमक उठी सन सत्तावन में वह तलवार पुरानी थी

बुंदेले हर हर बोलो वह झाशीवाली राणी थी

अहो आता तुम्हीच सांगा, आज सीमा सुरक्षा दानामध्ये, किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सारख्या संरक्षण दलात मुली नाहीत का ? एके ४७ सारख्या रायफली चालविणे, हात बॉम्ब फेकणे, पहाटे उठून ड्रिलसाठी हजर राहणे, मुलांइतकीच सहनशक्ती निर्माण करून मुलांच्या खांदयाला खांदा लावून या मुली प्रगतीचे, विकासाचे पाऊल टाकत आहेत. सावित्रीबाईंच्या योग्य विचारांची रूजवणूक ज्या ज्या ठिकाणी झाली; तेथे नक्कीच सकारात्मकतेची प्रचिती आली. मित्रांनो ज्या ज्या मुलींना शिक्षणाची द्वारे खुली झाली त्यांनी आकाशाला गवसणी घातली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतीच पायलट झालेली मुलगी म्हणजे भावना.

अहो १०, १२ बोर्ड परीक्षेचा विचार केला तर मुलीच बाजी मारतात. नव्या नव्या क्षेत्रात शिक्षणामुळे नावलौकिक मिळवतात. परंतु हे केव्हा साध्य होणार मुलींना शिकवले तरच . अहो मुलांना शिकवले तर संपूर्ण कुटुंबाचा सर्वदृष्ट्या विकास होईल. भावी पिढीदेखील शिक्षित व संस्काक्षम बनेल. मित्रांनो, सावित्रीबाईच्या कार्याची धुरा आपल्या खांदयावर आहे. समाजपरीवर्तन घडवायच आहे. मुलीचे शिक्षण हे देशाच्या विकासाचा, समाजपरीवर्तनाचा कणा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यासाठी समाजातील पालकांनी आपल्या मुलीला शिक्षण घेण्यासाठी स्वत: हून प्रेरणा व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

मुलगी एकटी नाही

तिला परमेश्वराची साथ आहे

तिला कसला अंधार

तीच पहाटेची सुरुवात आहे.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा मराठी निबंध/ भाषण Speech on Mulgi Vachava Mulgi shikwa in Marathi हे भाषण आपणास कसे वाटले प्रतिक्रियेत कळवा.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment