8 मार्च 2022 महिला दिन थीम 8 March 2022 Mahila Din Theme

8 मार्च 2022 महिला दिन थीम 8 March 2022 Mahila Din Theme

8 मार्च 2022 महिला दिन थीम 8 March 2022 Mahila Din Theme याविषयी या ठिकाणी जाणून घेणार आहोत.प्रत्येक वर्षी 8 मार्चला जगभरामध्ये जागतिक महिला दिन साजरा केला जातो.येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी स्री पुरुष समानता ही थीम Gender equality Today For A Sustainable Tomorrow यावर्षीच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वीकारलेली आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त स्री पुरुष समानते बाबतीत चर्चा केली जाते. त्यादृष्टीने यावर्षीची थीम अतिशय उल्लेखनीय आहे.महिला दिन 2022 थीम अतिशय लक्षवेधक आहे.उज्वल भविष्यासाठी स्री पुरुष समानता ही थीम Gender equality Today For A Sustainable Tomorrow या थीमच्या निमित्ताने जांभळा, हिरवा, पांढरा असे रंग देण्यात आले आहेत.जांभळा रंग हा न्याय आणि सन्मानाचे प्रतीक समजला जातो.

एकविसाव्या शतकाच्या सुरवातीच्या टप्प्यात महिलांना अजूनही न्याय व सन्मान जितका मिळायला हा त्या प्रमाणात मिळत नाही. मात्र उज्वल व मजबूत भविष्यासाठी अजुनही काम करण्याची गरज आहे हेच यातून सुचवायचे आहे.

हिरवा रंग आशेचे प्रतीक आहे. भूतकाळावर नजर टाकली तर खूप काही गोष्टी निराशाजनक दिसून येतात.परंतु आयुष्याचा विचार करता आशावादी दृष्टिकोन ठेवून लैंगिक समानता देण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे हे या मुलांसाठी सुचित केले आहे.

पांढरा रंग हा शुद्धतेचे प्रतीक मानला जातो पांढऱ्या रंगांमधून शांतता ध्वनित होते शुद्ध भावाने आणि शांत देणे. महिलांनी महिलांच्या हक्कासाठी लढा द्यावा आणि आपल्या समानतेचे अधिकार प्राप्त करून घ्यावेत. संघर्ष करताना शाश्वत मुल्ये बाजूला होणार नाहीत याची काळजी घेत शुद्ध भावना ठेवून दिलेला लढा हा साधनशुचिता जपताना दिलेला लढा असतो. त्यामुळे पांढरा रंग या ठिकाणी शुद्धता, शांतता व साधनशुचिता ध्वनित करतो.

आंतरराष्ट्रीय महिला दिवस International Women’s Day

जांभळा हिरवा आणि पांढरा हे रंग देण्यात येण्याचे कारण आपण आत्ताच पाहिले. सर्व महिला आणि समाजातील सर्व घरातील व्यक्तींपर्यंत महिला दिनाची थीम जाणे गरजेचे आहे. त्याचा अर्थ आणि अर्थच्छटा प्रत्येक व्यक्तीला माहीत होतील अशा पद्धतीने त्यांचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. यातून महिलांच्या समानता आणि समता विषयक असणारे कार्य अधिक पुढे जाईल.

दर वर्षी महिला दिन येतो.महिला दिनाची एखादी थीम मिळते. मात्र ही थीम सर्वांपर्यंत पोहोचत नाही. तिचा अर्थ लक्षावधी लोकांना, महिलांना माहीत नसतो. मात्र या वर्षीची थीम उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता Gender equality Today For A Sustainable Tomorrow काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेतले.

8 मार्च 2022 महिला दिन थीम 8 March 2022 Mahila Din Theme

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment